Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 17:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 याहवेह असे म्हणतात: “जो मनुष्यावर विश्वास ठेवतो, जो मर्त्य मनुष्यापासून सामर्थ्य मिळवितो आणि ज्याचे अंतःकरण याहवेहपासून दूर गेले आहे, तो शापित असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 परमेश्वर असे म्हणतो, “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंत:करण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 परमेश्वर असे म्हणतो, “जो मानवजातीवर विश्वास ठेवतो, जो आपल्या देहाला आपले सामर्थ्य करतो पण त्याचे हृदय परमेश्वरापासून दूर आहे, तो शापित असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 17:5
16 Iomraidhean Croise  

त्याच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी आसा पायाच्या आजाराने त्रस्त झाला. त्याचा आजार गंभीर स्वरुपाचा होता, तरी त्या आजारपणातही त्याने याहवेहकडून मदत घेतली नाही, परंतु फक्त वैद्यांचीच मदत घेतली.


त्यांच्याबरोबर फक्त शारीरिक शस्त्र आहेत, परंतु आपल्याला मदत करण्यासाठी आणि आपले युद्ध करण्यासाठी आपले परमेश्वर याहवेह आपल्याबरोबर आहेत.” आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह जे काही बोलला त्यावरून लोकांचा आत्मविश्वास वाढला.


कारण याहवेहचे मार्ग मी पाळले आहेत; माझ्या परमेश्वरापासून दूर गेल्याचा दोष माझ्यावर नाही.


साधारण मानव श्वासमात्र आहेत; विशिष्ट मानव फक्त मिथ्या आहेत; तराजूत वजन केले की ते हलकेच भरतील; ते सर्व श्वासमात्र आहेत.


मर्त्य मनुष्यांवर भरवसा करणे बंद कर ज्यांच्या नाकामध्ये केवळ एक श्वासच आहे. त्यांना इतका बहुमान का द्यावा?


ज्यांनी कूशवर विश्वास ठेवला आणि इजिप्तबद्दल बढाई मारली ते निराश होतील आणि लज्जित होतील.


पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस. पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते.


सत्य कुठेही शोधून सापडत नाही, आणि जो कोणी दुष्टपणा टाळतो, तोच सावज बनतो. याहवेहने हे पाहिले व ते असंतुष्ट झाले कारण न्याय्य कुठेही नाही.


त्यांना सांग मी इस्राएलचा परमेश्वर याहवेह असे म्हणतो: या कराराच्या अटींचे पालन न करणारा मनुष्य शापित आहे—


मग ज्या राष्ट्रांमध्ये ते निर्वासित म्हणून जातील व जे वाचतील ते माझे स्मरण करतील; त्यांचे व्यभिचारी हृदय, जे माझ्यापासून दूर वळले आहे आणि त्यांचे डोळे, जे त्यांच्या मूर्तीमागच्या वासनांनी पेटले आहे, त्याने मला किती दुःखी केले. त्यांनी जी वाईट कृत्ये केली आणि त्यांच्या अमंगळ कृत्यांमुळे ते स्वतःचीच घृणा करतील.


जेव्हा याहवेहने प्रथम होशेयद्वारे बोलण्यास प्रारंभ केला, तेव्हा याहवेह त्याला म्हणाले, “जा आणि एखाद्या व्यभिचारी स्त्रीबरोबर विवाह कर आणि तिच्यापासून लेकरे जन्माला घाल. कारण हा देश एका व्यभिचारी पत्नीप्रमाणे याहवेहशी अविश्वासूपणाचा दोषी आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan