यिर्मया 17:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती
22 शब्बाथ दिवशी तुमच्या घरातून काही भार बाहेर नेऊ नका; किंवा कामधंदा करू नका, परंतु शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळा, जशी तुमच्या पूर्वजांना मी आज्ञा दिली होती.
22 आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून काही भार बाहेर आणू नका व काही उद्योगही करु नका, तुमच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञेप्रमाणे शब्बाथाचा दिवस पवित्र पाळा.
त्या दिवसात मी यहूदीयातील काही पुरुषांना शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडांत द्राक्षे तुडविताना व धान्यांच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादतांना, त्याचप्रमाणे द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थांचे ओझे शब्बाथ दिवशी यरुशलेमला विक्रीसाठी घेऊन जाताना पाहिले. तेव्हा मी त्यांना त्या दिवशी हे विक्री करण्यास विरोध केला.
“सहा दिवस आपले काम करावे, पण सातव्या दिवशी काम करू नये, अशासाठी की तुमच्या बैलांना व गाढवांना विसावा मिळावा, तसेच तुमच्या घरात जन्मलेले गुलाम आणि तुमच्यामध्ये राहणारा परदेशी सुद्धा ताजेतवाने होऊ शकेल.
“जर तुम्ही शब्बाथदिन अशुद्ध करण्यापासून तुमची पावले दूर ठेवाल आणि माझ्या पवित्र दिवशी आपलीच मनमानी करणे सोडून द्याल, जर तुम्ही शब्बाथदिनास आनंदाचा दिवस मानाल आणि तो याहवेहचा पवित्र दिवस आहे म्हणून त्याचा सन्मान कराल, आणि त्या दिवसाचा आदर करून स्वतःच्या इच्छा बाजूला साराल आणि मनमानेल असे न वागता व निरर्थक गोष्टींची चर्चा करणार नाही,
याहवेह म्हणतात, परंतु तुम्ही जर माझ्या आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या, आणि शब्बाथ दिवशी कोणताही भार नगरीच्या प्रवेश व्दारातून नेआण न करता, काहीही काम न करता तो पवित्र दिवस असा पाळलात,
“ ‘आठवड्यातील सहा दिवस त्यांनी कामकाज करावे, परंतु सातवा दिवस हा शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे. पवित्र मेळाव्याचा दिवस. तुम्ही कोणतेही काम करू नये; तुम्ही कुठेही राहत असाल तरी याहवेहसाठी हा शब्बाथ आहे.
तुमच्या पूर्वजांसारखे तुम्ही होऊ नका, ज्यांना पूर्वीच्या संदेष्ट्यांनी घोषणा केली: ‘आपल्या दुष्ट मार्गापासून व दुष्ट प्रथांपासून मागे वळा.’ पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याच्याकडे लक्ष दिले नाही, याहवेह जाहीर करतात.