Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 17:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 याहवेह असे म्हणत आहेत: सावध असा, शब्बाथ दिवशी कोणतेही भार वाहू नका, यरुशलेमच्या प्रवेश व्दारातून ते नेआण करू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपणांविषयी सावध असा, शब्बाथ दिवशी काही ओझे वाहू नका, यरुशलेमेच्या वेशीतून ते आणू-नेऊ नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 परमेश्वर असे म्हणतो: तुम्ही आपला जीव जपा आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही यरूशलेमेच्या प्रवेशद्वारातून ओझी वाहून आणू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 17:21
18 Iomraidhean Croise  

शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळून त्याची आठवण ठेवा.


सर्वापेक्षा अधिक तुझ्या हृदयाचे रक्षण कर, कारण जे सर्वकाही तू करतो, ते त्यापासून निष्पन्न होते.


जो शब्बाथाच्या दिवसास अपवित्र न करता त्याचे पालन करतो, अयोग्य गोष्ट करण्यापासून स्वतःला आवरतो, या सर्व गोष्टींवर अढळ राहतो, जो असे वागतो, तो मनुष्य धन्य होय.”


“जर तुम्ही शब्बाथदिन अशुद्ध करण्यापासून तुमची पावले दूर ठेवाल आणि माझ्या पवित्र दिवशी आपलीच मनमानी करणे सोडून द्याल, जर तुम्ही शब्बाथदिनास आनंदाचा दिवस मानाल आणि तो याहवेहचा पवित्र दिवस आहे म्हणून त्याचा सन्मान कराल, आणि त्या दिवसाचा आदर करून स्वतःच्या इच्छा बाजूला साराल आणि मनमानेल असे न वागता व निरर्थक गोष्टींची चर्चा करणार नाही,


ते त्यांना पुन्हा म्हणाले, “तुम्ही जे ऐकता ते नीट ध्यानात घ्या. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल आणि त्यापेक्षा अधिक जास्त तुम्हाला देण्यात येईल.


यास्तव तुम्ही कसे ऐकता याविषयी काळजी घ्या. ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल; ज्यांच्याजवळ नाही, जे त्यांच्याजवळ आहे असे त्यांना वाटते ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.”


तुम्ही स्वतःवर आणि सर्व कळपावर लक्ष ठेवा, कारण पवित्र आत्म्याने तुम्हाला देखरेख करण्यासाठी नेमले आहे. परमेश्वराने स्वतःच्या रक्ताने ज्या मंडळीला विकत घेतले आहे, त्या परमेश्वराच्या मंडळीचे तुम्ही मेंढपाळ व्हा.


पण सावध असावे, तुम्ही इतर दैवतांची उपासना व त्यांना नमन करण्याकडे बहकून जाऊ नये.


याकरिता सावधगिरी बाळगा, कारण याहवेह तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीमधून बोलले, त्यावेळी त्यांची काहीही आकृती तुमच्या दृष्टीस पडली नाही;


तेव्हा सावधगिरी बाळगा, नाहीतर याहवेह तुमच्या परमेश्वराने मनाई केलेल्या वस्तूंची तुम्ही स्वतःसाठी कोरीव प्रतिमा कराल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराचे तुम्हाला विस्मरण होईल.


तुम्ही स्वतःबद्दल जागरूक असणे आणि स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी विसरून जाऊ नये आणि आयुष्यभर त्या तुमच्या स्मरणातून निघून जाऊ नये. तुम्ही ते तुमच्या पुत्रांना आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पुत्रांना शिकवा.


म्हणून याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करण्याबाबत फार सावध असा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan