Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 17:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 माझा छळ करणाऱ्यांना लज्जित करा, परंतु मला फजिती पासून सोडवा; त्यांना भयभीत करा परंतु मला भय मुक्त करा. त्यांच्यावर संकटाचे दिवस येऊ दे; त्यांच्यावर दुप्पट नाश ओढवू दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 माझा छळ करणारे फजीत होवोत, मी फजीत न व्हावे; ते घाबरे होवोत, मी घाबरे न व्हावे; त्यांच्यावर विपत्काळ आण; दुप्पट नाशाने त्यांचा नायनाट कर!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 माझा पाठलाग करणारे लाजवले जावो, परंतू मी न लाजवला जावो. ते निराश केले जावोत, परंतू मी निराश न केला जावो. अरिष्टाचा दिवस त्यांच्याविरुद्ध पाठव आणि दुप्पट नाशाने त्यांना विखरुन टाक.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 17:18
21 Iomraidhean Croise  

पुनः पुनः ते माझ्यावर हल्ला करतात; एखाद्या योद्ध्यांप्रमाणे ते माझ्यावर धावून येतात.


जे मला ठार करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांची तुम्ही धूळधाण करा; त्यांना मागे फिरवा आणि त्यांना लज्जित करा.


सर्वनाश अचानक त्यांच्यावर ओढवो— त्यांनी लावलेल्या सापळ्यात ते स्वतःच अडकोत व त्या खड्ड्यात पडोत व नष्ट होवोत.


माझ्या जीव घेऊ पाहणार्‍यांना लज्जित करा व गोंधळात पाडा; त्यांना मागे हटवून त्यांची दाणादाण करून त्यांना घालवून द्या;


माझा जीव घेऊ पाहणार्‍यांना लज्जित करा व गोंधळात पाडा; जे सर्वजण माझे विघ्नसंतोषी आहेत ते अप्रतिष्ठित होऊन माघारी फिरोत.


याहवेह, मी केवळ तुमच्या ठायी आश्रय घेतला आहे; मला लज्जित होऊ देऊ नका.


“तू स्वतःला तयार कर! उठून जा आणि मी तुला सांगतो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस, नाहीतर त्यांच्यासमोर मी तुला भयभीत करेन.


सर्वसमर्थ याहवेह, तुम्ही नीतिमत्तेने न्याय करता मन व अंतःकरणाची परीक्षा घेता, त्यांच्यावरील तुम्ही घेतलेला सूड मला स्वतःच्या नजरेने बघू द्या, कारण माझ्या समस्या मी तुमच्याकडे सोपविल्या आहेत.


पण याहवेह, तुम्ही मला ओळखता; मला बघता व तुमच्याबद्दल माझ्या विचारांची परीक्षा घेता. मेंढरांना कत्तलखान्याकडे फरफटत न्यावे तसे त्यांना न्या! कत्तलीच्या दिवसासाठी त्यांना वेगळे करा!


“हे वचन तू त्यांना सांग: “ ‘रात्रंदिवस माझ्या नेत्रातून अश्रू वाहू दे मी माझे रडणे थांबविणार नाही; माझे लोक, कुमारी कन्या, तिच्यासाठी, कारण ती जखमांनी घायाळ होऊन तुडविली गेली आहे.


त्यांच्या दुष्टतेबद्दल व पापांबद्दल मी त्यांना दुप्पट शासन करणार आहे, कारण त्यांनी त्यांच्या निर्जीव आकाराच्या निरुपयोगी प्रतिकृतींनी माझा देश भ्रष्ट केला आहे आणि माझे वतन त्यांच्या घृणास्पद मूर्तींनी भरून टाकला आहे.”


हे याहवेह, तुम्हीच इस्राएलची आशा आहात; ज्यांनी याहवेहला सोडले आहे, ते लाजिरवाणे होतील. जे तुमच्या मार्गापासून दूर गेले आहेत, त्यांचे नाव धुळीत लिहिले जाईल कारण त्यांनी याहवेहचा त्याग केला, जिवंत पाण्याच्या झर्‍याला सोडले आहे.


मी तुमचा मेंढपाळ होण्यापासून पळून गेलेलो नाही; तुम्हाला ठाऊक आहे मी अशा भयंकर दिवसाची इच्छा केली नव्हती. माझ्या मुखातून काय निघाले हे तुम्हाला ठाऊक आहे.


याहवेह मला असे म्हणाले: “जा आणि लोकांच्या प्रवेश दारावर उभा राहा. ज्या प्रवेश दारांनी यहूदीयाचा राजा प्रवेश करतो; आणि यरुशलेमच्या इतर सर्व प्रवेश दाराशी जाऊन उभा राहा.


परंतु याहवेह सामर्थ्यवान योद्ध्यासारखे माझ्यासोबत आहेत; म्हणून माझा छळ करणारे अडखळतील व वरचढ होणार नाहीत. ते पराजित होतील आणि पुरेपूर फजीत होतील; आणि त्यांची अप्रतिष्ठा कधीही विसरली जाणार नाही.


हे याहवेह, त्यांचे सर्व कौशल्य आशीर्वादित करा, आणि त्यांची हस्तकृती तुम्हाला प्रसन्न करो. त्यांच्याविरुद्ध जे उठतात त्यांना चिरडून टाका, आणि ते पुन्हा उठणार नाहीत, असे करा.”


तिने जसे तुम्हाला केले, तसेच तिला करा; तिने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल तिला दुप्पट शिक्षा करा. तिच्या प्याल्यात तिच्याच प्याल्यातून दुप्पट ओता.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan