Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 17:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 हे याहवेह, तुम्हीच इस्राएलची आशा आहात; ज्यांनी याहवेहला सोडले आहे, ते लाजिरवाणे होतील. जे तुमच्या मार्गापासून दूर गेले आहेत, त्यांचे नाव धुळीत लिहिले जाईल कारण त्यांनी याहवेहचा त्याग केला, जिवंत पाण्याच्या झर्‍याला सोडले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 हे परमेश्वरा, इस्राएलाच्या आशाकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजीत होतील; माझ्यापासून फितणार्‍यांची नावे धुळीवर लिहिली जातील, कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 परमेश्वरा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस. तू पाण्याच्या जिवंत झऱ्याप्रमाणे आहेस. जो या भूमीवर परमेश्वरा पासून फिरेल, त्यास छेदले जाईल. कारण त्यांनी परमेश्वरास जो जिवंत पाण्याचा झरा आहे, त्यास सोडले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 17:13
40 Iomraidhean Croise  

तुमच्यावर आमच्या पूर्वजांनी भरवसा ठेवला; तुमच्यावर त्यांनी भरवसा ठेवला आणि तुम्ही त्यांना सोडविले.


मी दुःखित आणि पीडित आहे— परमेश्वर तुमचे तारणच माझी सुरक्षा आहे.


प्रभू याहवेह, केवळ तुम्हीच माझे आशास्थान आहात; तारुण्यापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे.


जे तुमच्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; तुमच्याशी विश्वासघात करणार्‍यांना तुम्ही नष्ट करता.


जे प्रतिमांची प्रौढी मिरवित होते, ते मूर्तींचे सर्व उपासक फजीत झाले. सर्व दैवतांनो, त्यांची आराधना करा!


आशीर्वाद देण्यासाठी धार्मिक मनुष्याच्या नावाचा उपयोग करतात, परंतु दुष्ट मनुष्याचे नाव सडून नाहीसे होते.


विश्वासहीनांना त्यांच्या मार्गाची फळे पूर्ण भोगावी लागतील, तसेच चांगल्या माणसांना त्यांच्या चांगुलपणाची.


परंतु बंडखोर आणि पापी या दोघांना मोडण्यात येईल, आणि ज्यांनी याहवेहचा त्याग केला, त्यांचा नाश होईल.


याहवेहची वचने ऐकून कंपित होणार्‍या लोकांनो, याहवेहची वचने ऐका: “तुमचे भाऊबंद जे तुमचा द्वेष करतात, आणि माझ्या नामाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे तुम्हाला वाळीत टाकतात, ते थट्टेने म्हणतात, ‘याहवेहचा गौरव असो, जेणेकरून, आम्ही तुमचा हर्षोल्हास बघू!’ पण ते फजीत केले जातील.


तुम्हीच इस्राएलची आशा आहात, संकटसमयीच्या आमच्या त्रात्या, तुम्ही या देशात आमच्याशी परकेपणाने का वागता, केवळ रात्रभर मुक्काम करणार्‍या वाटसरूसारखे का झाला आहात?


माझ्यासाठी तुम्ही भीतिदायक होऊ नका; संकटसमयी तुम्हीच माझे आश्रय आहात.


माझा छळ करणाऱ्यांना लज्जित करा, परंतु मला फजिती पासून सोडवा; त्यांना भयभीत करा परंतु मला भय मुक्त करा. त्यांच्यावर संकटाचे दिवस येऊ दे; त्यांच्यावर दुप्पट नाश ओढवू दे.


याहवेह असे म्हणतात: “जो मनुष्यावर विश्वास ठेवतो, जो मर्त्य मनुष्यापासून सामर्थ्य मिळवितो आणि ज्याचे अंतःकरण याहवेहपासून दूर गेले आहे, तो शापित असो.


कारण त्यांनी मला सोडले आहे आणि हे स्थान त्यांनी परक्या दैवताचे केले आहे; हे लोक अन्य दैवतांपुढे धूप जाळतात, जे त्यांच्या पूर्वजांना किंवा यहूदीयाच्या राजांना कधीही माहीत नव्हते, आणि त्यांनी ही जागा निर्दोष रक्ताने भरून टाकली आहे.


“माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत: त्यांनी जीवनदायी पाण्याच्या झर्‍याला, म्हणजे मला, सोडले आहे, आणि ज्यात पाणी राहत नाही असे फुटके, गळके हौद स्वतःसाठी बांधले आहेत.


ज्या याहवेहनी तुम्हाला योग्य मार्गाने चालविले त्या तुमच्या परमेश्वराचा त्याग करून, ही परिस्थिती तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली नाही का?


ज्यांना ते सापडले, त्यांनी त्यांना गिळंकृत केले; त्यांचे शत्रू म्हणाले, ‘आपण दोषी नाही, कारण याहवेह, त्यांचे हिरवेगार कुरण, आणि त्यांच्या पूर्वजांचे आशास्थान, यांच्याविरुद्धच ज्यांनी पाप केले आहे.’


जे खोटे दृष्टान्त पाहतात आणि लबाड शकुन उच्चारतात, मी माझा हात त्या संदेष्ट्यांच्या विरुद्ध उगारणार. ते माझ्या लोकांच्या बैठकीचा भाग नसतील किंवा इस्राएलच्या यादीत त्यांची नोंद केली जाणार नाही, ना ते इस्राएलच्या देशात प्रवेश करतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.


तुझ्यासाठी व जे सर्व तू केले त्यासाठी मी जेव्हा प्रायश्चित करेन, तेव्हा तुला आठवण होईल व लाज वाटेल आणि अवमानामुळे पुन्हा कधी आपले मुख उघडणार नाहीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”


माझी इच्छा आहे तुम्ही हे जाणावे की हे मी तुमच्यासाठी करीत नाही, सार्वभौम याहवेह जाहीर करतात की अहो इस्राएली लोकांनो तुम्ही आपल्या वर्तनामुळे लाजिरवाणी व कलंकित असावे!


पृथ्वीच्या धुळीत झोपलेले बरेच लोक जागे होतील: काहीजण सर्वकाळच्या जीवनासाठी तर काही निर्लज्जता व सर्वकाळच्या अपमानासाठी उठतील.


याहवेह सीयोनातून गर्जना करतील आणि यरुशलेमातून गडगडाट होईल; पृथ्वी व आकाश थरथर कापतील. परंतु याहवेह त्याच्या लोकांसाठी आश्रयस्थान आणि इस्राएल लोकांसाठी दुर्ग असतील.


“त्या दिवशी दावीदाच्या घराण्यातून आणि यरुशलेममधील लोकांमधून एक झरा उगम पावेल, तो त्याच्या लोकांना सर्व पापांपासून आणि अशुद्धतेपासून शुद्ध करेल.


अहो सर्व सुटकेची आशा करणाऱ्या बंदिवानांनो, तुमच्या गडात परत या; आता मी ही घोषणा करतो की, तुमची दुप्पटीने परतफेड करेन.


तरीपण दुष्टात्मे तुमची आज्ञा पाळतात, या गोष्टींचा आनंद करण्यापेक्षा तुमची नावे स्वर्गात नोंदली गेली आहेत याचा आनंद करा.”


येशू तिला म्हणाले, “परमेश्वराचे वरदान आणि मला प्यावयाला पाणी दे असे म्हणणारा कोण, हे जर तुला कळले असते तर तू त्यांच्याजवळ मागितले असते आणि त्यांनी तुला जिवंत पाणी दिले असते.”


परंतु जे पाणी मी देतो ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. खरोखर, जे पाणी मी त्यांना देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी जिवंत पाण्याचा झरा असे होईल.”


या कारणामुळे मी तुम्हाला आज येथे येण्याची विनंती केली की आपली प्रत्यक्ष भेट घ्यावी व आपल्याबरोबर बोलावे. कारण मी इस्राएलाच्या आशेमुळे या साखळीने बांधलेला आहे.”


परमेश्वर आपले तारणकर्ता व ख्रिस्त येशू आपली आशा, यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूंचे प्रेषित म्हणून नेमलेला पौल याजकडून,


जीवनाच्या पुस्तकात ज्या कोणाचे नाव लिहिलेले सापडले नाही, त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.


ते मला म्हणाले, “सर्वकाही पूर्ण झाले आहे! मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट आहे. तान्हेल्या सर्व लोकांना मी जीवनाच्या झर्‍याचे पाणी मोफत देईन.


मग देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची नदी दाखविली. तिचे पाणी स्फटिकासारखे नितळ होते. परमेश्वर आणि कोकरा यांच्या राजासनांतून ती निघाली होती.


आत्मा व वधू म्हणतात “ये!” हा शब्द ऐकणारा प्रत्येकजण म्हणो, “ये!” कोणाही तान्हेल्याने यावे आणि कोणतेही मोल न देता जीवनाचे पाणी हवे तेवढे प्यावे.


कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल, ‘ते त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झर्‍याजवळ नेईल,’ ‘आणि परमेश्वर त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकतील.’”


Lean sinn:

Sanasan


Sanasan