Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 17:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तुमचे गौरवी सिंहासन प्रारंभापासून उच्च आहे, हेच आमचे आश्रयस्थान आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 आमच्या पवित्रस्थानाचे स्थळ, सनातन काळापासून उच्च व वैभवी सिंहासन आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आमच्या मंदिराचे ठिकाण एक गौरवशाली राजासन, जे सुरुवातीपासून भारदस्त आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 17:12
13 Iomraidhean Croise  

याहवेहने स्वर्गात आपले सिंहासन प्रस्थापित केले आहे, आणि संपूर्ण विश्वावर त्यांची सत्ता आहे.


राजवैभव आणि ऐश्वर्य त्यांच्या पुढे चालतात. त्यांच्या उपस्थितीत सामर्थ्य आणि महिमा असतो.


उज्जीयाह राजा मरण पावला त्या वर्षी, मी प्रभूला सिंहासनावर बसलेले उच्चतम आणि गौरवी असे पाहिले; आणि त्यांच्या अंगरख्याच्या घोळाने मंदिर भरून गेले होते.


याहवेह असे म्हणतात: “स्वर्ग माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी निवासस्थान बांधणार ते कुठे आहे? माझे विश्रांतिस्थान कुठे असणार?


तुमच्या नामासाठी आमचा तिरस्कार करू नका; तुमच्या गौरवी राजासनाची अप्रतिष्ठा करू नका. आमच्यासह केलेल्या कराराची आठवण करा आणि तो मोडू नका.


त्यावेळी ते यरुशलेमला याहवेहचे सिंहासन असे म्हणतील, आणि याहवेहच्या नावाला आदर देण्यासाठी सर्व राष्ट्रे तिथे तिच्याकडे येतील. ते त्यांच्या हृदयाच्या हट्टीपणाने चालणार नाहीत.


त्यांच्या डोक्यावर असलेल्या घुमटावर नीलमणी रत्नाच्या सिंहासनासारखे काहीतरी होते आणि त्या सिंहासनावर उंच मनुष्याच्या आकृतिसारखा कोणी होता.


परमेश्वराने मला म्हटले: “मानवपुत्रा, हे माझ्या सिंहासनाचे स्थान, माझ्या तळपायाचे ठिकाण आहे. या ठिकाणी इस्राएली लोकांमध्ये मी सर्वकाळ राहीन. इस्राएली लोक; ते किंवा त्यांचे राजे यापुढे त्यांच्या वेश्यावृत्तीने आणि त्यांच्या राजांच्या अंत्यविधीच्या अर्पणांद्वारे माझे नाव पुन्हा कलंकित करणार नाहीत.


“जेव्हा मानवपुत्र सर्व देवदूतांना बरोबर वैभवाने येईल, त्यावेळी तो वैभवशाली सिंहासनावर बसेल.


आपण आपल्या विश्वासाचा अग्रेसर व पूर्तता करणार्‍या येशूंवर आपले नेत्र स्थिर करावे; कारण त्यांना त्याजपुढे जो आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि ते परमेश्वराच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे.


तेव्हा आपल्यावर दया व्हावी आणि गरजेच्यावेळी साहाय्य मिळण्यासाठी आपल्याला कृपा प्राप्त व्हावी, म्हणून आपण धैर्याने प्रत्यक्ष परमेश्वराच्या कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ या.


जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन, जसा मी विजय मिळवून माझ्या पित्याबरोबर त्यांच्या राजासनावर बसलो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan