Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 17:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “त्यांच्या हृदय पटलावर आणि त्यांच्या वेद्यांच्या शिंगावर यहूदीयाचे पाप जणू काही लोखंडी कलमाने एखाद्या हिरकटोकाने कोरलेल्या आहेत,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 “यहूदाचे पातक लोखंडी खचरणीने, हिरकणीच्या टोकाने लिहिले आहे; त्यांच्या हृदयपटावर, त्यांच्या वेद्यांच्या शृंगांवर खोदले आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 “यहूदाचे पाप लोखंडी लेखणीने व हिऱ्याच्या टोकाने लिहिलेले आहे. ते त्यांच्या हृदयाच्या पाटीवर आणि वेदीच्या शिंगांवर कोरले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 17:1
15 Iomraidhean Croise  

प्रीती आणि विश्वासूपणा तुला कधीही न त्यागोत; त्यांना तू आपल्या गळ्याभोवती बांध, त्यांना तुझ्या हृदयाच्या पटलावर लिहून ठेव.


तुझ्या बोटांवर त्या बांधून ठेव; तुझ्या हृदयाच्या पटलावर त्या लिहून ठेव.


पाहा, तुम्हाला मी माझ्या तळहातावर कोरले आहे व तुझे तट सदोदित माझ्यासमोर आहेत.


हे यहूदीया, जेवढी तुमची शहरे आहेत तेवढीच त्या दैवतांची संख्या; आणि तुमच्या या लाजिरवाण्या दैवतांच्या वेद्या, बआलापुढे धूप जाळण्याच्या वेद्या यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावर आहेत.’


तुम्ही स्वतःला साबणाने धुतले आणि विपुल प्रमाणात धुण्याची पावडर वापरली, तरी तुमचे कलंक माझ्यापुढे तसेच आहेत,” असे सार्वभौम याहवेह म्हणतात.


“परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा” याहवेह जाहीर करतात, “त्या वेळेनंतर मी माझा नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन, मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील.


यरुशलेम, तुमच्या अंतःकरणाची अशुद्धता स्वच्छ करा आणि तुमचे रक्षण होईल. किती काळ तुम्ही तुमचे दुष्ट विचार अंतःकरणात ठेवणार?


गिलआद दुष्ट आहे काय? त्याचे लोक निरुपयोगी आहेत! ते गिलगालात बैलांचे अर्पण करतात का? त्यांच्या वेद्या नांगरलेल्या शेतातील दगडांच्या ढिगार्‍यासारख्या असतील.


परंतु त्यांना हे कळत नाही की त्यांची सर्व वाईट कृत्ये मला स्मरण आहेत. त्यांच्या पापकर्मांनी त्यांना घेरले आहे; ते नेहमी माझ्यासमोर असतात.


“एफ्राईमने पापार्पण करण्यास पुष्कळ वेद्या बांधल्या आहेत, पण ते पाप करण्याच्या वेद्या झाल्या आहेत.


मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना ते लावावे व राहिलेले रक्त होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतून द्यावे.


त्यांनी आपली अंतःकरणे गारगोटीसारखी कठीण केली आणि सर्वसमर्थ याहवेहने आरंभीच्या संदेष्ट्यांना आपल्या आत्म्याने प्रेरित करून त्यांच्याद्वारे दिलेल्या आज्ञा किंवा वचने ऐकण्याचे त्यांनी नाकारले. म्हणूनच याहवेहला त्यांच्यावर अत्यंत क्रोध आला.


तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात, आमच्या सेवेचा परिणाम, जे शाईने लिहिलेले नाही परंतु जिवंत परमेश्वराच्या आत्म्याने, दगडी पाटीवर नसून, मानवी हृदयाच्या पाटीवर कोरलेले आहे हे दाखवा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan