यिर्मया 16:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यांच्या दुष्टतेबद्दल व पापांबद्दल मी त्यांना दुप्पट शासन करणार आहे, कारण त्यांनी त्यांच्या निर्जीव आकाराच्या निरुपयोगी प्रतिकृतींनी माझा देश भ्रष्ट केला आहे आणि माझे वतन त्यांच्या घृणास्पद मूर्तींनी भरून टाकला आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 प्रथमत: त्यांचे दुष्कर्म व त्यांचे पाप ह्यांचे दुप्पट प्रतिफळ मी त्यांना देईन; कारण त्यांनी आपल्या प्रेतवत व अमंगळ मूर्तींनी माझा देश भ्रष्ट केला आहे. त्यांनी आपल्या किळसवाण्या वस्तूंनी माझे वतन भरले आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मी पहिल्याने त्याच्या त्याच्या अन्यायाची आणि पापांची फेड दुपटीने करीन, कारण माझी भूमी त्यांनी आपल्या तिरस्करणीय मूर्तींच्या आकृतींनी विटाळवीली आहे. आणि माझे वतन त्यांनी आपल्या ओंगळ मूर्ती स्थापून कलंकित केले आहे. Faic an caibideil |
“पाहा, ते माझ्यासमोर लिहून ठेवलेले आहे: मी शांत राहणार नाही, पण त्याची पूर्णपणे परतफेड करेन; तुमच्या पापांचे व तुमच्या पूर्वजांच्या पापांचेही, प्रतिफळ त्यांच्या मांडीवर मोजून टाकेन,” असे याहवेह म्हणतात. “कारण त्यांनी पर्वतांवर धूप जाळला आणि टेकड्यांवर माझा अपमान केला. मी त्यांच्या पूर्वीच्या दुष्कृत्यांचे पुरेपूर वेतन त्या मापाने त्यांच्या मांडीवर टाकेन.”