Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 16:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 म्हणून मी तुम्हाला या राष्ट्रातून बाहेर फेकून देईन आणि तुमच्या पूर्वजांना अनोळखी अशा देशात तुम्हाला पळवून लावेन. तिथे गेल्यावर तुम्ही इतर दैवतांची रात्रंदिवस सेवा कराल, मी तुमच्यावर मुळीच कृपा करणार नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ह्याकरता जो तुम्हांला ठाऊक नाही व तुमच्या पूर्वजांनाही ठाऊक नाही अशा देशात तुम्हांला ह्या देशातून घालवून देईन; तेथे तुम्ही रात्रंदिवस अन्य देवांची सेवा करीत राहाल; कारण मी तुमच्यावर कृपा करणार नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 म्हणून मी तुम्हास देशाबाहेर काढून तुम्हास किंवा तुमच्या पूर्वजांनासुद्धा माहीत नसलेल्या देशात घालवून देईन, आणि दिवसरात्र तुम्ही तेथे दुसऱ्या देवांची पूजा कराल, कारण मी तुमच्यावर अनुग्रह करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 16:13
21 Iomraidhean Croise  

हमाथ देशातील रिब्लाह येथे बाबेलच्या राजाने त्यांचा वध केला. याप्रकारे यहूदीयाचे लोक आपल्या देशापासून दूर बंदिवासात गेले.


तर मी माझ्या देशातून जो मी त्यांना दिलेला आहे, तिथून मी इस्राएली लोकांना उपटून टाकीन आणि या मंदिराचा, जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. सर्व लोकांमध्ये मी ते थट्टा व निंदेचा विषय करेन.


म्हणूनच त्यांच्या मनास येईल तसे हट्टीपणाने मी त्यांना वागू दिले, ते स्वतःची इच्छापूर्ती करत राहिले.


कारण याहवेह असे म्हणतात: “जे या देशाचे रहिवासी आहेत त्यांना यावेळी मी तुम्हाला या देशातून बाहेर भिरकावून देईन; त्यांच्यावर महासंकटे आणेन म्हणजे ते सहजगत्या पकडल्या जातील.”


तुम्हीच इस्राएलची आशा आहात, संकटसमयीच्या आमच्या त्रात्या, तुम्ही या देशात आमच्याशी परकेपणाने का वागता, केवळ रात्रभर मुक्काम करणार्‍या वाटसरूसारखे का झाला आहात?


तेव्हा याहवेहने मला म्हटले: “जर मोशे व शमुवेल माझ्यासमोर येऊन उभे राहिले तरीसुद्धा या लोकांकरिता माझे हृदय द्रवित होणार नाही. त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालवून दे! त्यांना जाऊ दे!


जो देश तुम्हाला पूर्वी कधी माहीत नव्हता, त्या देशात मी तुम्हाला तुमच्या शत्रूंचे गुलाम करेन, कारण माझा क्रोध अग्नीप्रमाणे भडकला आहे, आणि तो तुम्हाला भस्म करून टाकील.”


यहूदीयाचा राजा हिज्कीयाहचा पुत्र मनश्शेह, याने यरुशलेममध्ये जे अनाचार केले, त्याबद्दल मी केलेले शासन पाहून सर्व जगातील राष्ट्रांना दहशत बसेल.


कारण याहवेह असे म्हणतात: “ज्या घरात मयतीचे भोजन होत आहे तिथे प्रवेश करू नको; शोक करू नको किंवा सांत्वना देऊ नको, कारण मी माझे आशीर्वाद, माझे प्रेम आणि माझी दया या लोकांपासून काढून घेतली आहेत.” याहवेहची ही घोषणा आहे,


तुमच्याच चुकीमुळे मी तुम्हास दिलेले वतन तुम्ही घालवाल. तुमच्या शत्रूंकडे, तुम्हाला माहीत नसलेल्या राष्ट्रांत मी तुम्हाला गुलाम म्हणून पाठवेन. कारण तुम्ही माझा क्रोधाग्नी पेटविला आहे आणि तो सतत जळत राहील.”


तू व तुझी माता, यांना मी अशा देशाबाहेर भिरकावून टाकेन, जिथे तुमचा जन्म झाला नव्हता आणि त्या देशात तुम्हाला मरण येईल.


हा मनुष्य, कोन्याह, फुटक्या भांड्यासारखा कोणालाही नको असलेली वस्तू नाही का? तो व त्याच्या मुलांना त्यांना माहीत नसलेल्या देशात बंदिवान करून भिरकावून का टाकले गेले.


जेव्हा तुझे लोक विचारतील, “याहवेह आम्हाला हे असे शासन का करीत आहे?” तेव्हा तू सांगशील, “तुम्ही त्यांचा त्याग केलात, आणि स्वदेशातच तुम्ही परकीय दैवतांचे भक्त झालात, तर आता परकीय लोकांच्या देशात तुम्ही त्यांची सेवा कराल.


त्यांना त्यांच्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटते का? नाही, त्यांना मुळीच लज्जा वाटत नाही; लाज वाटणे म्हणजे काय असते हे त्यांना माहीतच नाही. म्हणून ते पतन पावलेल्या लोकांमध्ये पतन पावतील; मी जेव्हा त्यांना शिक्षा देईल तेव्हा त्यांचे पतन होईल,” असे याहवेह म्हणतात.


तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांना कधीही माहीत नसलेल्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुम्हाला आणि तुम्ही स्वतःवर नेमलेल्या राजाला हद्दपार करतील. तिथे तुम्ही इतर दैवतांची उपासना कराल, जे लाकडाचे आणि दगडाचे दैवत असेल.


तेव्हा याहवेहने रागाने आणि मोठ्या क्रोधाने त्यांचे या देशातून उच्चाटन केले आणि त्यांना दूरच्या देशात घालवून दिले, जिथे ते आज देखील राहत आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan