Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 15:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मी चैन करण्याऱ्या लोकांमध्ये मुळीच बसलो नाही, त्यांच्यासोबत कधीच आनंद केला नाही; मी एकटाच होतो, कारण तुमचा हात माझ्यावर होता आणि तुम्ही मला त्वेषाने भरले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 विनोद करणार्‍यांच्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही; तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे मी एकान्ती बसलो; कारण तू मला अस्वस्थ केले आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 लोकांच्या आनंदात आणि जल्लोषात मी बसलो नाही. तुझ्या हातामुळे मी एकटाच बसून राहिलो, कारण तू मला क्रोधाने भरले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 15:17
13 Iomraidhean Croise  

धन्य ते लोक, जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत, किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत, आणि थट्टा करणार्‍यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.


मी जागाच राहतो. छपरावर एकाकी असणार्‍या पक्ष्यासारखा मी झालो आहे.


पाहा, आज मी तुझी काही राष्ट्रे आणि राज्ये उपटून टाकण्यासाठी, काहींचा नाश करण्यासाठी, तर काहींची स्थापना, त्यांचे पालनपोषण करण्यासाठी त्यांच्यावर तुझी नेमणूक करीत आहे.”


जर तुम्ही माझे ऐकले नाही, तर मी एकांतात अश्रू ढाळेन तुमच्या गर्विष्ठपणामुळे; माझे डोळे घोर रुदन करतील, माझ्या अश्रूंचा पूर लोटेल, कारण याहवेहच्या कळपाला बंदिवान करून नेण्यात येईल.


“ज्या घरात मेजवानी होत आहे, त्या घरात तू प्रवेश करू नकोस व त्यांच्याबरोबर खाण्यापिण्या करिता बसू नकोस.


परंतु मी याहवेहच्या क्रोधाने भडकलो आहे, हा क्रोध मला आवरून धरवत नाही. “मी हा क्रोध रस्तोरस्ती असलेल्या मुलांवर आणि तरुणांच्या गटांवर ओततो; दोघे पतिपत्नी त्यात अडकले जातील, आणि वयस्कर, जे वयातीत आहेत ते देखील.


कारण ते याहवेहनेच त्याच्यावर लादले आहे म्हणून त्याने एकांतात शांत बसावे.


“येथे हा विषय समाप्त होतो. मी दानीएल, आपल्या विचारांनी व्याकूळ झालो. आणि माझा चेहरा पांढराफटक पडला, परंतु मी ही गोष्ट आपल्या मनात ठेवली.”


मग याहवेहच्या दूताने म्हटले: “हे सर्वसमर्थ याहवेह, गेली सत्तर वर्षे तुम्ही यरुशलेम व यहूदीयाच्या नगरांवर संतापलेले आहात, त्यांच्यावर दया करण्याचे तुम्ही किती वेळ नाकारणार आहात?”


यास्तव, “त्यांच्यामधून निघा आणि त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा; प्रभूने म्हटले आहे त्यांच्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका, म्हणजे मी तुमचे स्वागत करेन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan