Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 15:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 हे माझ्या आई, हाय हाय, तू मला जन्म दिला, मी या सर्व राष्ट्राच्या दृष्टीने झगडा आणि विद्रोह करणारा झालो आहे! मी कोणाही कडून कर्ज घेतलेले नाही, ना कोणी माझ्याकडून घेतलेले आहे, तरीपण प्रत्येकजण मला श्राप देतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 अगे माझ्या आई! हायहाय! सर्व जगाबरोबर झगडा व विवाद करणार्‍या अशा मला तू जन्म दिला आहेस. मी कोणाशी वाढीदिढीचा व्यवहार केला नाही व कोणी माझ्याशी केला नाही; तरी सर्व मला शाप देतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 माझ्या आई, मला हाय हाय! कारण सर्व पृथ्वीला वाद आणि यूक्तिवादाचा पुरुष असे तू मला जन्म दिला आहे. मला कोणाचे देणे नाही, किंवा त्यांनी मला काही देणे नाही, तरी पण ते सर्व मला शाप देतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 15:10
32 Iomraidhean Croise  

अहाब एलीयाहला म्हणाला, “हे माझ्या वैर्‍या, शेवटी तू मला शोधलेच!” तो म्हणाला, “मी तुला शोधलेच, कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास तू स्वतःस विकून टाकले आहेस.


इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “ज्याच्याद्वारे आपण याहवेहचा सल्ला घेऊ शकतो असा एक संदेष्टा अजूनही आहे, परंतु तो माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही, नेहमीच वाईट संदेश देतो, म्हणून मला त्याचा तिरस्कार वाटतो. तो इम्लाहचा पुत्र मिखायाह आहे.” यहोशाफाटने उत्तर दिले, “राजाने असे बोलू नये.”


त्या सर्वांनी शाप दिले तरी तुम्ही मला आशीर्वादित करा; जे माझ्यावर हल्ला करतात, ते लज्जित होवोत, पण मी, तुमचा सेवक मात्र हर्षभरित होवो.


जो व्याज न आकारता पैसे उसने देतो; जो निष्पाप लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही, जो कोणी या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.


माझा विनाकारण द्वेष करणार्‍यांची संख्या माझ्या डोक्यावरील केसांपेक्षा अधिक आहेत; पुष्कळ लोक विनाकारण माझे शत्रू झाले आहेत. मला नष्ट करण्याची त्यांची इच्छा आहे. मी जे चोरले नाही, त्याची भरपाई करण्याची माझ्यावर बळजबरी होत आहे.


“तुमच्यामध्ये असलेल्या माझ्या गरजवंत लोकांना जर तुम्ही उसने पैसे दिले, तर त्यांच्याशी सावकारी व्यवहार करू नका; व व्याज लावू नका.


जशी फडफडणारी चिमणी निसटून जाते किंवा निळवी उडून जाते, तसाच गैरवाजवीपणे दिलेल्या शापाचा प्रभाव होत नाही.


मी तुला या लोकांसाठी भिंत बनवेन, कास्याच्या तटबंदीची भिंत; ते तुझ्याशी युद्ध करतील परंतु ते तुझ्यावर प्रभावी होणार नाहीत, तुला सोडविण्यास व तुझा बचाव करण्यास मी तुझ्यासोबत आहे,” याहवेह असे म्हणतात.


परमेश्वराची भीती बाळगावी आणि तुमच्या बंधूला तुमच्या घरात राहू द्यावे. त्याला उसने म्हणून दिलेल्या पैशावर तुम्ही व्याज घेऊ नये.


तुम्ही त्यांना व्याजाने पैसे देऊ नयेत किंवा जे खाद्यपदार्थ तुम्ही त्यांना विकाल त्यावर नफा घेऊ नये.


तुम्ही मला अन्यायाकडे का पहायला लावता? तुम्ही चुकीचे कार्य का सहन करता? विनाश आणि हिंसाचार माझ्यापुढे होत आहे; वाद व कलह वाढत आहेत.


“छळ करण्यासाठी आणि जिवे मारण्याकरिता तुम्हाला धरून दिले जाईल आणि माझ्यामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील.


पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.


मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि बाळाची आई मरीयाला म्हणाला: “इस्राएलमध्ये अनेकांचे पतन व पुन्हा उठणे आणि ज्या विरुद्ध लोक बोलतील, हा असे चिन्ह होईल, यासाठी या बालकाला नेमून ठेवले आहे.


मानवपुत्रामुळे जेव्हा लोक तुमचा द्वेष करतात, तुमच्यावर बहिष्कार टाकतात आणि तुमचा अपमान करतात, दुष्ट म्हणून तुमचे नाव नाकारतात, तेव्हा तुम्ही धन्य.


परंतु आम्हाला तुमचे विचार ऐकायला हवे आहेत, कारण या पंथाच्या विरुद्ध सर्वत्र लोक बोलत आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan