Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 14:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “यहूदीया विलाप करीत आहे, तिची नगरे झुरणीला लागली आहेत; ते या भूमीसाठी शोक करीत आहेत, आणि यरुशलेममधून आक्रोश वर जात आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “यहूदा शोक करीत आहे, त्याच्या वेशी उदासवाण्या झाल्या आहेत; ते भूमीवर शोक करीत पडले आहेत; यरुशलेमेची आरोळी वर गेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “यहूदा शोक करो, तिची दारे पडून जावोत, ते देशासाठी विलाप करत आहेत, त्यांचे यरूशलेमेसाठी रडणे उंचावर गेले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 14:2
30 Iomraidhean Croise  

त्यांच्यामुळे गरिबांचे अश्रू परमेश्वरासमोर आले आहेत अशासाठी की गरजवंत लोकांचा आक्रांत ते ऐकतील.


आमची सशक्त गुरे अवजड वाहने वाहतील. आमच्या तटबंदीला भगदाडे पडणार नाहीत, आम्ही पारतंत्र्यात जाणार नाही, आमच्या रस्त्यावर दुःखाच्या आरोळ्या ऐकू येणार नाहीत.


परमेश्वराने त्यांचे रडणे ऐकले आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी त्यांनी केलेल्या कराराचे त्यांना स्मरण झाले.


माझे मन मोआबसाठी रडते; तिचे पलायन केलेले लोक सोअरपर्यंत, एग्लाथ-शलीशियापर्यंत पळतात. ते लुहिथकडे टेकडीवर जातात, जाताना ते विलाप करतात; होरोनाईमच्या वाटेवर ते त्यांच्या नाशासाठी विलाप करतात.


रस्त्यावर ते मद्यासाठी आरडाओरडा करीत आहेत; सगळा आनंद दुःखात बदलला आहे, हर्षोल्हासाचे स्वर पृथ्वीवरून नाहीसे झाले आहेत!


पृथ्वी सुकते आणि कोमेजून जाते, जग खंगून जाते आणि सुकून जाते, आकाश पृथ्वीबरोबर झुरत राहते.


नवा द्राक्षारस सुकतो आणि द्राक्षवेल कोमेजून जाते. आनंद करणारे सर्वजण विव्हळतात.


सीयोनच्या वेशी आक्रोश करतील आणि विलाप करतील; ती निराधार होऊन जमिनीवर बसलेली असेल.


भूमी शुष्क होत आहे आणि ओसाड झाली आहे, लबानोन शरमिंदा झाला आहे आणि कोमेजला आहे; शारोनची कुरणे अरबी वाळवंटसारखी झाली आहेत, आणि बाशान व कर्मेल त्यांची पाने गळून पडत आहेत.


इस्राएल राष्ट्र सर्वसमर्थ याहवेहचा द्राक्षमळा आहे, आणि यहूदीयाचे लोक, त्यांना प्रसन्न करणाऱ्या द्राक्षलता आहेत, ज्यामध्ये त्यांना आनंद होतो. आणि त्यांनी न्यायाची अपेक्षा केली, परंतु त्यांना रक्तपातच दिसून आला; नीतिमत्वाची अपेक्षा केली, परंतु पीडेचे रुदन ऐकू आले.


म्हणून याहवेह असे म्हणाले: ‘मी त्यांच्यावर घोर आपत्ती घेऊन येणार त्यातून त्यांची सुटका होणार नाही. ते रडून दयेसाठी आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही.


माझ्यापुढे कोरडा व उद्ध्वस्त करून तो ओसाड केला जाईल, संपूर्ण भूमी वैराण करण्यात येईल, कारण तिची राखण करणारे कोणीही नसेल.


किती काळ ही भूमी कोरडी ठणठणीत राहील आणि प्रत्येक कुरणातील गवत सुकलेले असेल? कारण जे या ठिकाणी राहतात ते दुष्ट आहेत, पशू व पक्षी नाहीसे झाले आहेत. त्यावर लोक म्हणतात, “परमेश्वर आमचा परिणाम बघणारही नाही.”


जेव्हा स्वारी करणारे त्यांच्यावर अचानक हल्ला करतील तेव्हा त्यांच्या घरातून आक्रोश व किंचाळ्या ऐकू येवोत, कारण मला पकडावे म्हणून त्यांनी खड्डा खणला आहे आणि माझ्या वाटेवर त्यांनी गुप्त सापळे लावले आहेत.


यास्तव पृथ्वी शोक करेल आणि आकाशात काळोख होईल, कारण मी बोललो आहे, त्यात आता बदल होणार नाही, मी निर्णय घेतला आहे आणि मागे फिरणार नाही.”


राष्ट्रे तुझ्या लज्जेची वार्ता ऐकतील; तुझ्या आक्रोशाने संपूर्ण पृथ्वी भरेल. तुझे योद्धे परस्परांवर अडखळून पडतील; दोघेही एकमेकांसोबत एकत्र पडतील.”


माझे लोक चिरडले गेले, मी चिरडलो; मी शोकाकुल झालो, भीतीने मला दहशत भरली आहे.


सीयोन कन्येच्या भिंतींना धराशायी करण्याचा याहवेहने निर्धार केला आहे. त्यांनी मापक दोरी ताणली आहे विनाश करण्यास आपला हात रोखला नाही. त्यांनी संरक्षक भिंत व तटबंदीस विलाप करण्यास लावले ते एकत्रच ढासळून पडले.


तिच्या वेशी जमिनीत धसल्या आहेत; त्यांच्या सळया मोडून नष्ट झाल्या आहेत. तिचे राजे आणि अधिपती इतर देशात बंदिवासात गेले आहेत, तिथे नियमशास्त्र राहिले नाही, आणि तेथील संदेष्ट्यांना आता याहवेहकडून दृष्टान्तही मिळत नाहीत.


आमची त्वचा भट्टीप्रमाणे तप्त झाली आहे, कारण भुकेमुळे आम्ही तापाळलेले आहोत.


म्हणूनच तुमची भूमी कोरडी पडत आहे, येथे राहणारे सर्व नाश पावत आहे; रान पशू, आकाशातील पक्षी आणि समुद्रातील मासे नाहीसे होत आहेत.


शेतांची धूळधाण झाली आहेत, भूमी कोरडी पडली आहे; धान्याचा नाश झाला आहे, नवीन द्राक्षारस सुकला आहे, जैतून तेल समाप्त झाले आहे.


अहो, शेतकर्‍यांनो, लज्जित व्हा, द्राक्षमळ्यांची मशागत करणार्‍यांनो, आकांत करा; गहू व जव याकरिता विलाप करा, कारण शेतातील पिके नष्ट झाली आहेत.


एक पवित्र उपास जाहीर करा; लोकांची एक धार्मिक सभा बोलवा. वडीलजनास व देशात राहणार्‍यांना याहवेह तुमच्या परमेश्वराच्या भवनात बोलवा, आणि याहवेहपुढे शोक करा.


त्यांच्यासमोर राष्ट्रे भयभीत होतात; हे प्रत्येक चेहरा फिका पडतो.


मी शेतावर, डोंगराळ भागांवर, धान्यावर, नव्या द्राक्षारसावर, जैतुनाच्या तेलावर व इतर सर्व ज्यांची भूमीतून उपज होते, लोकांवर आणि पशूंवर, तसेच तुमच्या हाताच्या कष्टाच्या कमाईवर मी अवर्षण बोलाविले आहे.”


“ ‘जेव्हा मी त्यांना हाक मारली, त्यांनी ऐकण्याचे नाकारले; म्हणून त्यांनी मला हाक मारली, की मी त्यांचे ऐकणार नाही, असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.


जे मरण पावले नाही ते पीडेच्या गाठींनी पीडित झाले होते व त्या शहराचा आक्रोश स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचला.


“याच वेळेस उद्या मी तुझ्याकडे बिन्यामीनच्या प्रदेशातील एक मनुष्य पाठवेन. माझ्या इस्राएल लोकांवर शासनकर्ता म्हणून त्याचा अभिषेक कर; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवेल. मी माझ्या लोकांकडे पाहिले आहे, कारण त्यांचा आकांत माझ्यापर्यंत पोहोचला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan