यिर्मया 14:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तुम्ही यहूदीयाचा पूर्णपणे त्याग केला आहे काय? सीयोनाचा तुम्हाला वीट आला आहे काय? तुम्ही आम्हाला अशी वेदना का दिली म्हणजे आम्हाला कधीही आरोग्य मिळणार नाही? आम्ही शांतीची आशा केली होती पण त्यातून काहीही चांगले निष्पन्न झाले नाही, आरोग्य मिळण्याच्या ऐवजी सर्वत्र दहशतच पसरली आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तू यहूदाचा अगदी त्याग केला आहेस काय? तुझ्या जिवाला सीयोनेचा वीट आला आहे काय? आम्ही बरे होऊ नये इतके तू आम्हांला का मारले आहे? आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण हित काही होत नाही; आम्ही बरे होण्याची वाट पाहतो तर पाहा दहशत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 “काय तू यहूदाला पूर्णपणे नाकारले आहे का? तू सियोनचा राग करतोस काय? बरे न होण्या इतके तू आम्हांला का पीडलेस? आम्हांस शांती असेल ही आशा बाळगली, पण आमच्या वाट्याला काहीच चांगले आले नाही. आणि बरे होण्याची वाट पाहिली, पण पाहा, तेथे फक्त भयच आहे. Faic an caibideil |