Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 14:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 आणि हे लबाड लोक ज्यांना संदेश देतात तेही तलवारीला व दुष्काळाला बळी पडून यरुशलेमच्या रस्त्यांवर फेकून दिले जातील आणि त्यांना, पत्नी, पुत्र व कन्यांना मूठमाती द्यायलाही कोणी राहणार नाही. कारण मी त्यांच्यावर घोर विपत्ती पाठविणार ज्याला ते पात्र आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आणि ज्या लोकांना ते संदेश देतात तेही दुष्काळाने व तलवारीने मरतील व त्यांना यरुशलेमेच्या रस्त्यांनी पकडून देतील; त्यांना, त्यांच्या स्त्रियांना, त्यांच्या पुत्रांना व त्यांच्या कन्यांना कोणी पुरणार नाही; मी त्यांची दुष्टता त्यांच्यावर लोटीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 आणि ज्या लोकांस त्यांनी भवीष्य सांगितले, ते उपासमार व तलवार यामुळे यरूशलेमेच्या रस्त्यावर फेकले जातील. त्यांना व त्यांच्या स्त्रिया व मुलांना आणि मुलींना कोणी पुरणारा पण असणार नाही, कारण त्यांची दुष्टाई मी त्यांच्यावर ओतीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 14:16
23 Iomraidhean Croise  

त्यांना त्यांच्या मार्गाचे प्रतिफळ मिळेल, आणि त्यांच्या वाईट कृत्यांचे पुरेपूर परिणाम मिळतील.


कारण तुझी लेकरे ग्लानी येऊन, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात पडली आहेत, हरिणाप्रमाणे ते जाळ्यात अडकलेले आहेत. याहवेहच्या क्रोधाने आणि तुमच्या परमेश्वराच्या धमकीने भरले आहेत.


या लोकांना मार्गदर्शन करणारे त्यांची दिशाभूल करतात, आणि ज्यांना मार्गदर्शन मिळाले, ते पथभ्रष्ट झाले आहेत.


“ते भयानक रोगांना बळी पळून मरतील. त्यांच्यासाठी कोणी शोक करणार नाही, की त्यांना मूठमाती देणार नाही, तर त्यांची प्रेते जमिनीवर शेणासारखे पडून राहतील. तलवार व दुष्काळ यांनी त्यांचा अंत होईल आणि त्यांची प्रेते पक्षी आणि हिंस्र श्वापदे यांचे खाद्य होतील.”


म्हणून त्यांच्या मुलांना दुष्काळामध्ये जाऊ द्या; त्यांना तलवारीच्या बलाच्या स्वाधीन करा. त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होऊ द्या; त्यांचे पुरुष मृत्यू पावोत, व त्यांचे तरुण लढाईत तलवारीने मारले जावोत.


आणि हे पशहूरा, तू स्वतः व तुझ्यासह तुझ्या घरात राहणारे सर्वजण बाबेलमध्ये बंदिवासात जाल. तू तिथेच मरशील व पुरला जाशील, तू व ज्यांच्याकडे तू खोटी भविष्यवाणी केलीस त्या तुझ्या सर्व मित्रगणाची गतही तशीच होईल.”


याहवेह म्हणतात, ‘मी त्यांना पाठविलेले नाही, ते माझ्या नावाने खोटी भविष्यवाणी करतात. म्हणून मी तुमचा आणि या खोट्या संदेष्ट्यांचा नाश करण्यासाठी या देशातून तुम्हाला हाकलून देईन.’ ”


“तुमच्या वागणुकीमुळे व वाईट कृत्यामुळे हा प्रसंग तुम्ही स्वतःवर ओढवून घेतला आहे. तुमची ही शिक्षा आहे! किती कडू आहे हे! कसे अंतःकरण छेदून टाकले आहे!”


संदेष्टे खोटी भविष्यवाणी करतात, याजक स्वतःचेच अधिकार चालवितात, आणि माझ्या लोकांना ते आवडते. पण शेवटी तुम्ही काय करणार आहात?


नंतर या लोकांची प्रेते जंगली पशू व पक्ष्यांना खाद्य असे होतील, आणि त्यांना हाकलून लावण्यासही कोणी उरणार नाही.


“ ‘याहवेह असे म्हणतात, यहूदीयाच्या राजांची आणि अधिपतींची हाडे, याजकांची हाडे व संदेष्ट्यांची हाडे व यरुशलेमच्या लोकांची हाडे त्यांच्या कबरांतून बाहेर काढली जातील.


आणि ती हाडे चंद्र, सूर्य व तारे यांच्यापुढे पसरील. हीच माझ्या लोकांची दैवते आहेत. यांच्यावरच त्यांचे प्रेम होते, यांना ते अनुसरत होते, यांचा ते सल्ला घेत, यांचीच ते उपासना करीत असत. ही हाडे पुन्हा कोणी गोळा करणार नाहीत वा पुरणार नाहीत. जमिनीवर पडलेल्या शेणाप्रमाणे ती विखुरली जातील.


आता स्त्रियांनो, याहवेहचे शब्द ऐका! त्यांच्या मुखातील शब्द ऐकण्यासाठी तुमचे कान उघडा. तुमच्या कन्यांना विलाप करण्यास शिकवा; एकमेकींना आकांत करण्यास शिकवा.


त्यांना सांग, “याहवेह असे म्हणतात: “ ‘मृतदेह उघड्या जागांवर विष्ठेप्रमाणे पसरली जातील; कापणार्‍यांच्या मागे पेंढ्या पडाव्यात तशी ती दिसतील, आणि कोणी मनुष्य त्यांना मूठमाती देणार नाही.’ ”


देश सातत्याने शुद्ध करण्यासाठी लोकांना कामावर लावले जाईल. ते अजून इतर लोकांबरोबर देशभर पसरतील, जमिनीवर जे मृतदेह पडलेले असतील त्यांना ते पुरतील. “ ‘सात महिने संपल्यावर ते अजून बारीक शोध करतील.


“म्हणून याहवेह असे म्हणतात: “ ‘तुझी पत्नी शहरात वेश्या होईल, तुझे पुत्र व कन्या तलवारीने मरतील, तुझी जमीन मोजण्यात येईल आणि सूत्राने विभागली जाईल, आणि तू स्वत: अपवित्र देशात मरशील. इस्राएलचे लोक निश्चितच आपल्या देशातून दूर बंदिवासात गुलाम म्हणून जातील.’ ”


त्यांच्याकडे लक्ष देऊ नका; ते आंधळे मार्गदर्शक आहेत. जर एक आंधळा मनुष्य दुसर्‍या आंधळ्याला वाट दाखवेल, तर ते दोघेही खाचेत पडतील.”


नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी सात देवदूतांना म्हणतांना ऐकली, “जा, परमेश्वराच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओता.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan