Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 13:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 “वार्‍यांनी भूस उडून जावे तसे मी तुला उडवून लावेन जणू वाळवंटी वाऱ्याने उडणारी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ह्यास्तव रानातल्या वार्‍यापुढे भूस उडते तसे मी त्यांना उडवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 यास्तव वाळवंटातील उडून जाणाऱ्या भुसकटाप्रमाणे मी त्यांचा नाश करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 13:24
19 Iomraidhean Croise  

परंतु दुष्ट तसे नाहीत. ते वार्‍याने उडून जाणार्‍या भुश्यासारखे आहेत.


जरी लोक उचंबळणाऱ्या पाण्याप्रमाणे गर्जना करतात, जेव्हा याहवेह त्यांना दटावतात, तेव्हा ते दूर पळून जातात, टेकड्यांवरील भुश्याप्रमाणे वार्‍याने पुढे ढकलून दिले जातात, जणू काही वावटळीची धूळ वादळी वाऱ्यासमोर जाते.


तुम्ही त्यांना पाखडाल व वारा त्यांना उडवून नेईल, आणि वावटळ त्यांना विखरून टाकेल; मग तुम्ही याहवेहमध्ये आनंद कराल इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचा तुम्ही गौरव कराल.


जसा पूर्वेकडील वारा धूळ उडवितो, त्याप्रमाणे मी त्यांना त्यांच्या शत्रूंपुढे उडवेन; त्यांच्या दुर्दशेच्या दिवशी मी माझे मुख नव्हे, तर त्यांच्याकडे पाठ फिरवेन.”


जे त्यांच्या पूर्वजांना माहीत नाही, अशा देशात मी त्यांची पांगापांग करेन, तिथे सुद्धा त्यांचा पूर्ण नायनाट करेपर्यंत माझी तलवार त्यांची पाठ सोडणार नाही.”


“माझ्यामध्ये असलेल्या सर्व योद्ध्यांना प्रभूने नाकारले आहे; माझ्या तरुणांना चिरडून टाकण्यासाठी प्रभूंनी एका मोठ्या सैन्यास हजर राहण्यास फर्माविले आहे. त्यांच्या द्राक्षकुंडात प्रभूंनी कुमारी कन्या यहूदीयास तुडविले आहे.


त्याचे सर्व उत्तम सैन्य तलवारीने पडेल आणि त्यातून जे वाचतील ते वार्‍याच्या दिशेने पसरतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेह हे बोललो आहे.


तुमच्यातील एकतृतीयांश लोक मरीने किंवा तुमच्यामध्ये येणार्‍या दुष्काळाने मरतील; एकतृतीयांश लोक तुझ्या भिंतींच्या बाहेर तलवारीने पडतील; आणि एकतृतीयांश मी वार्‍यावर पसरवीन व उपसलेल्या तलवारीने त्यांचा पाठलाग करेन.


जेव्हा तुझे वेढ्याचे दिवस संपतील, तेव्हा केसांचा तिसरा भाग शहरामध्ये जाळ. मग केसांचा तिसरा भाग शहराभोवती तलवारीने कापत जा. आणि तिसरा भाग वार्‍यावर उडव, कारण मी आपली तलवार उपसून त्यांचा पाठलाग करेन.


“ ‘परंतु मी काहींना वाचवेन, कारण जेव्हा तुम्ही देशात व राष्ट्रात पांगविले जाल तेव्हा तुमच्यातील काही तलवारीपासून वाचतील.


म्हणून ते सकाळच्या धुक्यासारखे, पहाटेच्या लवकर उडून जाणार्‍या दहिवरासारखे, खळ्यातून उडून जाणार्‍या भुशासारखे, धुराड्यातून निघणार्‍या धुराप्रमाणे होतील.


मी तुमची राष्ट्रांमध्ये पांगापांग करेन आणि मी माझी तलवार उगारून तुमच्या पाठीस लागेन. तुमचा देश उजाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल.


फर्मानाचा प्रभाव सुरू होण्याआधी आणि तो दिवस वाऱ्याने उडालेल्या भुशासारखा उडून जाण्यापूर्वी, याहवेहचा भयंकर संताप तुझ्यावर कोसळण्यापूर्वी, याहवेहच्या भयानक क्रोधाचा दिवस, तुझ्यावर कोसळण्यापूर्वी एकत्र ये.


काही तलवारीमुळे पडतील आणि काहींना सर्व राष्ट्रांमध्ये कैद करून नेण्यात येईल आणि गैरयहूदीयांचा काळ पूर्ण होईपर्यंत यरुशलेम शहरास गैरयहूदी पायाखाली तुडवतील.


पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत असलेल्या निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुमची पांगापांग करतील. तिथे तुम्ही किंवा तुमच्या पूर्वजांनी ज्यांची कधीही उपासना केली नाही—अशा लाकडाच्या आणि दगडाच्या दैवतांची तुम्ही उपासना कराल.


मी असे म्हटले असते, मी त्यांना दूरच्या देशात पांगविणार आणि त्यांची आठवणसुद्धा मानवी स्मरणातून पुसली जाईल,


याहवेह, तुमची इतर राष्ट्रांमध्ये पांगापांग करतील आणि ज्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुम्हाला घेऊन जातील त्यांच्यापैकी फक्त काही लोकच मागे उरतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan