यिर्मया 13:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 ज्यांचे संगोपन करून त्यांना आपले विशेष मित्र बनविले त्यांनाच याहवेहने तुझ्यावर सत्ता दिली, तर मग तू काय म्हणशील? तेव्हा तू प्रसूती वेदनांनी तळमळणाऱ्या स्त्रीप्रमाणे तळमळणार नाही का? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ज्यांचा स्नेह संपादन करण्याचा प्रयत्न तू केला त्यांना त्याने तुझ्या शिरावर ठेवले तर तू काय म्हणशील? प्रसववेदना लागलेल्या स्त्रीप्रमाणे तुला क्लेश होणार नाहीत काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 ज्यांना तू आपले मित्र होण्यास शिकवले, त्यांच्यावर देव जेव्हा तुला ठेवणार, तेव्हा तू काय करशील? जसे प्रसुतपावणाऱ्या स्त्रीला वेदना वेढतात, त्याचप्रमाणे हा तुझ्या वेदनांचा प्रारंभ नाही काय? Faic an caibideil |
तुमच्या यहूदीयाच्या राजाच्या राजवाड्यात उरलेल्या सर्व स्त्रियांना बाहेर आणून बाबिलोनच्या सरदारांच्या स्वाधीन केले जाईल, तेव्हा त्या स्त्रिया तुम्हाला म्हणतील: “ ‘त्यांनी तुला चुकीच्या मार्गावर नेले व तुझ्यावर मात केली— ते तुझे विश्वसनीय मित्र. तुझी पावले आता गाळात रुतली आहेत; त्यांनी टाकून दिले आहे.’