यिर्मया 13:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 यहूदीयाच्या दक्षिणेकडील नेगेवप्रांतातील नगरवेशी बंद होतील, आणि त्या उघडण्यास तिथे कोणीही नसेल. संपूर्ण यहूदीयाला बंदिवासात नेण्यात येईल पूर्णपणे नेण्यात येईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 दक्षिणेतील नगरे बंद पडली आहेत ती उघडायला कोणी नाही; यहूदाला सर्वस्वी बंदिवान करून नेले आहे, तो पूर्णपणे बंदिवान झाला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 नेगेबमधील शहरे बंद केली गेली आहेत, ती उघडायला कोणी नाही. यहूदाला बंदिस्त केले आहे, तिच्यातील सर्व हद्दपार करण्यात आले आहेत. Faic an caibideil |
बिन्यामीन प्रांतात, येथे यरुशलेममध्ये, तसेच यहूदीयाच्या शहरात, डोंगराळ प्रदेशातील नगरात, पश्चिमेच्या तळवटीच्या प्रदेशात व नेगेवमध्ये देखील चांदीची नाणी देऊन खरेदीखतांवर सह्या होतील, त्यावर शिक्का मारला जाईल, साक्षीदारांच्या सह्या होतील, कारण मी त्यांची पूर्वीची समृद्धी निश्चित परत देईन, असे याहवेह जाहीर करतात.”