Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 13:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जर तुम्ही माझे ऐकले नाही, तर मी एकांतात अश्रू ढाळेन तुमच्या गर्विष्ठपणामुळे; माझे डोळे घोर रुदन करतील, माझ्या अश्रूंचा पूर लोटेल, कारण याहवेहच्या कळपाला बंदिवान करून नेण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकान्ती शोकाकुल होईल; परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेन, माझ्या डोळ्यांतून टपटप आसवे गळतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 म्हणून जर तुम्ही ऐकणार नसाल, तर मी तुमच्या अहंकारामुळे शोकाकुल होईन. माझे डोळे खात्रीने अश्रू गाळतील आणि आसवे वाहवील. कारण परमेश्वराचा कळप बंदिस्त केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 13:17
25 Iomraidhean Croise  

माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे ओघ वाहतात, कारण तुमच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे.


इस्राएलाच्या मेंढपाळा, आमचा धावा ऐका, तुम्हीच योसेफाला मेंढरांच्या कळपाप्रमाणे चालविले. करुबांच्या मध्ये विराजमान असलेले, तुमचे तेजस्वी गौरव प्रगट करा.


मग त्यांच्या लोकांना पूर्वीचे दिवस आठवले, मोशे आणि त्यांच्या लोकांचे दिवस— ज्यांनी त्यांच्या मेंढपाळासह पूर्ण कळपाला समुद्रमार्गी बाहेर काढले, ते कुठे आहेत? त्यांच्यामध्ये आपला पवित्र आत्मा पाठविणारे ते कुठे आहेत?


“हे वचन तू त्यांना सांग: “ ‘रात्रंदिवस माझ्या नेत्रातून अश्रू वाहू दे मी माझे रडणे थांबविणार नाही; माझे लोक, कुमारी कन्या, तिच्यासाठी, कारण ती जखमांनी घायाळ होऊन तुडविली गेली आहे.


मी चैन करण्याऱ्या लोकांमध्ये मुळीच बसलो नाही, त्यांच्यासोबत कधीच आनंद केला नाही; मी एकटाच होतो, कारण तुमचा हात माझ्यावर होता आणि तुम्ही मला त्वेषाने भरले आहे.


मी तुमचा मेंढपाळ होण्यापासून पळून गेलेलो नाही; तुम्हाला ठाऊक आहे मी अशा भयंकर दिवसाची इच्छा केली नव्हती. माझ्या मुखातून काय निघाले हे तुम्हाला ठाऊक आहे.


परंतु जर तुम्ही या आज्ञेचे पालन नाही केले तर, याहवेह जाहीर करतात, मी माझी शपथ घेऊन इशारा देतो की, हा राजवाडा ओसाड होईल.’ ”


“धिक्कार असो त्या मेंढपाळांवर जे माझ्या कुरणातील मेंढरांचा नाश करतात व त्यांची पांगापांग करतात!” असे याहवेह जाहीर करतात.


म्हणून याहवेह, इस्राएलचे परमेश्वर मेंढपाळांना जे माझ्या लोकांची राखण करतात त्यांना असे म्हणतात: “कारण तुम्ही माझ्या कळपाची पांगापांग केली व त्यांना हुसकून लावले आणि त्यांची काळजी घेतली नाही, आता तुम्ही त्यांच्याशी केलेल्या दुष्टपणाबद्दल मी तुमच्यावर शिक्षांचा वर्षाव करेन.” असे याहवेह जाहीर करतात.


हाय, हाय! माझे मस्तक पाण्याचे एक स्त्रोत आणि माझे डोळे एक अश्रूंचा झरा असता! तर मी रात्रंदिवस सारखे अश्रू ढाळीत माझ्या घात केलेल्या लोकांकरिता विलाप केला असता.


“याकारणास्तव मी रडत आहे आणि माझ्या डोळ्यातून अश्रुपात होत आहे. माझे सांत्वन करण्यास माझ्याजवळ कोणीही नाही, माझा आत्मा पुनरुज्जीवित करण्यासाठी कोणीही नाही. माझी मुलेबाळे निराश्रित झाली आहेत. कारण शत्रूचे वर्चस्व झाले आहे.”


रात्रभर ती अत्यंत रडत असते; तिच्या गालांवरून अश्रू ओघळत आहेत. तिच्या सर्व प्रियकरात तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिचा विश्वासघात केला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.


तिची अशुद्धता तिच्या वस्त्राला चिकटली आहे; तिने तिच्या भविष्याचा विचार केला नाही. तिचे पतन अचंबित करून सोडणारे होते; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे याहवेह, माझी दुर्दशा पाहा, शत्रू विजयी झाला आहे.”


लोकांची अंतःकरणे. प्रभूकडे विलाप करतात. सीयोन कन्येच्या तटांनो, स्वतःला विसावा न देता, तुमचे डोळे आराम न करता एखाद्या नदीप्रमाणे तुमचे अश्रू रात्रंदिवस वाहोत.


माझ्या लोकांच्या विनाशामुळे माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह निघत आहेत.


“हे मानवपुत्रा, एका झटक्यात तुझ्या डोळ्याचा आनंद मी तुझ्यापासून काढून घेणार आहे. परंतु तू शोक करू नकोस किंवा रडू नकोस वा अश्रू गाळू नकोस.


तुम्ही माझी मेंढरे आहात, तुम्ही मानव माझ्या कुरणातील मेंढरे आहात आणि मी तुमचा परमेश्वर आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”


तिच्या नेमलेल्या सणांच्या वेळी यरुशलेममध्ये अर्पणासाठी लागतील तेवढे असंख्य कळप मी करेन. म्हणजे पडीक असलेली शहरे लोकांच्या कळपांनी भरतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.”


आणि याहवेहने त्याला म्हटले, “संपूर्ण यरुशलेम शहरातून जा आणि त्यात अमंगळ कृत्ये केल्याबद्दल जे दुःख व विलाप करतात त्यांच्या कपाळावर एक चिन्ह कर.”


जर तुम्ही ऐकले नाही आणि माझ्या नावाचे गौरव करण्याचा निश्चय केला नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवेन आणि तुमच्या आशीर्वादास शाप देईन. होय, मी ते आधीच शापित केले आहेत, कारण तुम्ही माझ्या नावाचे गौरव करण्याचा निश्चय केला नाही,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.


“मी शौलास राजा केले याबद्दल मला पश्चाताप होत आहे, कारण तो माझ्यापासून फिरला आहे आणि त्याने माझ्या आज्ञांचे पालन केले नाही.” शमुवेल फार संतापला आणि रात्रभर याहवेहकडे रडला.


शमुवेल आपल्या मरण्याच्या दिवसापर्यंत शौलाला भेटायला गेला नाही, परंतु शमुवेलने त्याच्यासाठी शोक केला. आणि आपण शौलाला इस्राएलवर राजा केले म्हणून याहवेहला पश्चाताप झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan