Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 13:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मग त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: या देशातील सर्व रहिवाशांना, अगदी दावीदाच्या राजासनावर बसणारा राजा, याजक व संदेष्टे यांच्यापासून ते सर्व यरुशलेमनिवासी यांना मी मदिरेने झिंगून टाकणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा त्यांना तू सांग, ‘पाहा, परमेश्वर म्हणतो, मी ह्या देशाचे सर्व रहिवासी म्हणजे दाविदाच्या गादीवर बसणारे राजे, याजक, संदेष्टे व सर्व यरुशलेमनिवासी ह्यांना मद्याने मस्त करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मग तू त्यांना सांग, ‘परमेश्वर असे म्हणतो, पाहा! या देशात राहणारे, दावीदाच्या सिंहासनावर बसलेले राजे, याजक, संदेष्टे आणि यरूशलेममध्ये सर्व राहणारे यांना मी मद्याच्या धुंदीने भरीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 13:13
14 Iomraidhean Croise  

तुम्ही आमच्याबाबत अतिशय कठोर झाले आहात; तुम्ही आम्हाला झोकांड्या खावयास द्राक्षारस दिला आहे.


कारण याहवेहच्या हातात मसाला मिश्रित फेसाळलेल्या द्राक्षारसाचा प्याला आहे; तो प्याला म्हणजे पृथ्वीवरील दुष्ट लोकांवर त्यांनी ओतलेला न्यायच आहे; सर्व दुष्टांना तो गाळासह निथळून प्यावा लागेल.


सुन्न व्हा आणि आश्चर्याने थक्क व्हा, तुम्ही स्वतःला अंध करा आणि दृष्टीहीन व्हा. झिंगलेले व्हा, परंतु मद्याने नव्हे, लटपटणारे व्हा, परंतु मद्याने नव्हे.


तुम्हाला पिडणाऱ्यांना मी त्यांचेच मांस खाऊ घालेन; आणि त्यांच्याच रक्ताच्या नद्यांचे रक्त पिऊन ते मद्य पिल्यासारखे धुंद होतील. मग हे सर्व मानवजातीला समजेल कि मी, याहवेह, तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता व याकोबाचा सर्वसमर्थ परमेश्वर आहे.”


ऊठ, ऊठ! अगे यरुशलेमे, जागी हो, तू, जिने क्रोधाचा प्याला याहवेहच्या हातून भरपूर प्याला आहे, दहशतीचा प्याला तू गाळासकट पिऊन टाकला आहेस, तो प्याला, जो लोकांना मद्यधुंद करून अडखळवितो.


म्हणून गांजलेल्यांनो, हे ऐका! तुम्ही धुंद झालेले आहात, मद्याने नव्हे.


क्रोधाच्या भरात मी राष्ट्रांना तुडविले; माझ्या संतापाच्या भरात मी त्यांना मद्यधुंद केले आणि त्यांचे रक्त जमिनीवर ओतले.”


“त्यांना सांग: ‘इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या.’ यावर ते जर तुला म्हणतील, ‘सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या हे आम्हाला माहीत नाही काय?’


“त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: माझ्या क्रोधाने भरलेल्या या प्याल्यातून तुम्ही प्या, धुंद होईपर्यंत प्या, आणि मग ओकारी करा, व पुन्हा कधीही न उठण्याकरिता पडा, कारण मी तुमच्यावर तलवार पाठवित आहे.’


माझे नाव धारण करणाऱ्या नगरावर मी विपत्ती आणत आहे, आणि मग तुम्ही शिक्षेवाचून राहाल काय? तुम्हाला शिक्षा चुकवता येणार नाही, कारण पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांविरुद्ध मी तलवार चालविणार आहे, असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.’


मी तिचे राज्यपाल, सुज्ञ लोक, अधिपती, सेनापती व योद्धे या सर्वांना मद्यधुंद करेन; ते झोपतील आणि पुन्हा कधीच उठणार नाहीत,” महाराज, सर्वसमर्थ याहवेह असे जाहीर करतात.


बाबिलोन याहवेहच्या हातातील सुवर्णपात्र होते; तिने संपूर्ण पृथ्वीला ते पाजून मद्यधुंद केले. सर्व राष्ट्र तिचे मद्य प्याले; म्हणून आता ते वेडे झाले आहेत.


तुम्ही गौरवाऐवजी लज्जेने भरून जाल. आता तुमची वेळ आहे, प्या व तुमची नग्नता उघडी होऊ द्या! याहवेहच्या उजव्या हातातील प्याला तुमच्याकडे येत आहे, आणि कलंक तुमचा गौरव झाकून टाकेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan