यिर्मया 12:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुझे नातेवाईक, तुझ्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्य— यांनी देखील तुझा विश्वासघात केला आहे; ते मोठ्याने ओरडून तुझा विरोध करतात. तुझ्याशी ते गोड गोड गोष्टी बोलले तरी त्यांच्यावर भरवसा ठेवू नकोस. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण तुझे भाऊबंद व तुझ्या बापाचे घराणे हीदेखील तुझ्याशी बेइमानपणे वागली आहेत; त्यांनीदेखील तुझ्यावर शब्दांचा भडिमार केला आहे; ती तुझ्याशी गोड बोलली तरी त्यांचा विश्वास धरू नकोस.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण तुझे भाऊबंद आणि तुझ्याच वडिलाच्या घराण्याने तुझ्याविरूद्ध विश्वासघात केला आहे आणि तुझ्याचविरूद्ध आवाज उठवीत आहे. जरी ते तुझ्याशी मित्रांसारखे बोलत असले, तरी तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस.” Faic an caibideil |
याहवेह मला असे म्हणतात: “जसा सिंह गुरगुरतो, एक मोठा सिंह त्याच्या भक्ष्यावर— आणि त्याला विरोध करण्यासाठी जरी मेंढपाळांची संपूर्ण टोळी एकत्र बोलावली जाते, तरी तो त्यांच्या ओरडण्याने घाबरत नाही किंवा त्यांच्या मोठ्या गोंधळ्याच्या आवाजाने अस्वस्थ होत नाही, म्हणून सर्वसमर्थ याहवेह सीयोन पर्वतावर आणि त्याच्या उंचीवर युद्ध करण्यासाठी खाली येतील.