Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 12:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तुम्हीच त्यांचे रोपण केले आणि ते मुळावले; ते वाढतात व फलवंत होतात. तुमचे नाव सतत त्यांच्या मुखात असते परंतु त्यांच्या अंतःकरणापासून तुम्ही फार दूर असता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तू त्यांना लावले आहेस, त्यांनी मूळ धरले आहे; ते वाढून त्यांना फळे येतात; तू त्यांच्याजवळ त्यांच्या मुखात असतोस पण त्यांच्या अंतर्यामापासून तू दूर असतोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तू त्यांना लावले आणि ते मुळावले. ते वाढतात आणि फळे देतात. तू त्यांच्या मुखात त्यांच्या जवळ आहे, पण त्यांच्या मनापासून तू फार दूर आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 12:2
15 Iomraidhean Croise  

मरणासन्न असलेल्‍यांचे कण्हणे शहरातून ऐकू येते, आणि घायाळ झालेल्यांचा मदतीसाठी आक्रोश चालू आहे. तरी देखील परमेश्वर कोणालाही दोष देत नाही.


मी मूर्खाला मूळ धरताना पाहिले, परंतु अचानक त्याचे घर शापित झाले.


मी एक वाईट व क्रूर मनुष्य पाहिला आहे. तो सुपीक जमिनीतील हिरव्यागार झाडासारखा पसरलेला होता.


प्रभू असे म्हणतात: “हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.


सर्वसमर्थ याहवेह, ज्यांनी तुमचे रोपण केले, त्यांनी तुमचा सर्वनाश करण्याची आज्ञा दिली आहे, कारण इस्राएल व यहूदीया या दोन्ही लोकांनी दुष्टपणा केला आहे आणि बआलापुढे धूप जाळून माझा क्रोधाग्नी भडकविला आहे.


हे सगळे घडून सुद्धा तिची अविश्वासू बहीण, यहूदीया, तिच्या संपूर्ण हृदयाने माझ्याकडे परतली नाही, परंतु तिच्यात खोटेपणाच दिसला,” असे याहवेह म्हणतात.


परंतु याहवेहने मला तुला हे सांगण्यास म्हटले, ‘याहवेह असे म्हणतात: जे मी बांधलेले आहे ते मी नष्ट करेन, संपूर्ण पृथ्वीवर मी जे पेरले, ते मीच उपटून टाकेन.


नियमाप्रमाणे येतात तसे माझे लोक तुझ्याकडे येतात आणि तुझे वचन ऐकण्यासाठी तुझ्यासमोर बसतात, परंतु ते त्याप्रमाणे अनुसरण करीत नाहीत. ते मुखाने प्रीतीविषयी बोलतात, परंतु त्यांची हृदये अन्यायाने लाभ मिळविण्यासाठी लोभी आहेत.


ते मला त्यांच्या हृदयापासून हाक मारत नाहीत, परंतु त्यांच्या बिछान्यांवर विलाप करतात. ते धान्य आणि नवीन द्राक्षारसासाठी त्यांच्या दैवतांकडे भीक मागून स्वतःला जखमा करतात, पण ते माझ्यापासून दूर राहतात.


तुमची दृष्टी इतकी पवित्र आहे की ती कोणतीही दुष्टता पाहू शकत नाही; तुम्ही कोणत्याही स्वरुपातील पातक सहन करू शकत नाही. मग या विश्वासघातकी लोकांना तुम्ही कसे सहन करता? जेव्हा दुष्ट लोक त्यांच्याहून नीतिमान लोकांना गिळंकृत करतात, तेव्हा तुम्ही स्तब्ध कसे राहता?


“ ‘हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.


त्यांनी उत्तर दिले, “यशायाह संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे; कारण असे लिहिलेले आहे: “ ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांची हृदये माझ्यापासून दूर आहेत.


ते परमेश्वराला ओळखतात असा दावा करतात, परंतु त्यांच्या कृत्याने ते चुकीचे सिद्ध होते. ते घृणास्पद, आज्ञा न पाळणारे आणि कोणत्याही चांगल्या कार्यासाठी अयोग्य आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan