यिर्मया 11:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु त्यांनी ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट प्रत्येकजण आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टीपणाने करीत राहिला. परंतु माझ्या ज्या आज्ञा पाळण्यास त्यांना सांगितले होते ते नाकारले म्हणून करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व श्राप मी त्यांच्यावर आणले.’ ” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पण ते ऐकेनात, आपला कान लावीनात, तर आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे ते चालत गेले; मी त्यांना ह्या कराराची वचने पाळण्यास सांगितले असून त्यांनी ती पाळली नाहीत, म्हणून त्या करारात सांगितलेले सर्व मी त्यांच्यावर आणले.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि लक्ष दिले नाही. ते दुराग्रही हृदयाचे बनले आणि आवडेल तेच त्यांनी केले. म्हणून मी त्यांना माझ्या आज्ञा पाळण्यास सांगितले, पण त्यांनी ते ऐकले नाही, म्हणून करारात उल्लेखलेल्या सर्व शापित गोष्टी मला त्यांच्याबाबत कराव्या लागल्या.” Faic an caibideil |
“त्यांनी तुमच्या आज्ञांकडे परत वळावे म्हणून तुम्ही त्यांना ताकीद दिली, पण ते गर्विष्ठ झाले व त्यांनी तुमच्या आज्ञा मोडल्या. त्यांनी तुमच्या आदेशाविरुद्ध पाप केले, ज्यात तुम्ही म्हटले होते, ‘जो या आदेशानुसार वागेल तो मनुष्य जगेल.’ दुराग्रहाने त्यांनी तुमच्याकडे पाठ फिरविली, गर्विष्ठ बनले व तुमचे ऐकण्याचे नाकारले.
पुन्हापुन्हा मी तुमच्याकडे माझे सेवक संदेष्टे पाठविले. ते म्हणाले, “तुम्हा प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून मागे वळावे व आपल्या आचरणात सुधारणा करावी; इतर दैवतांची सेवा करणे सोडून द्यावे. तर मी जो देश तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिला होता, त्या देशात तुम्ही सुखरुपपणे राहाल.” परंतु तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही वा माझे ऐकले नाही.
आम्ही जे करणार असे म्हटले होते, तसे आम्ही निश्चितच करू. आम्ही आकाशराणीस धूप जाळू आणि तिला पेयार्पण करू, जसे आम्ही व आमच्या पूर्वजांनी, आणि आमचे राजे व अधिपती यांनी यहूदीयाच्या नगरात, यरुशलेमच्या रस्त्यात नेहमी केले, तसेच आम्हीही करू. कारण त्या दिवसात आमच्याकडे विपुल अन्न होते आणि आम्ही सुखात होतो व आम्हाला काहीही इजा झाली नाही.