Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 11:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 सर्वसमर्थ याहवेह, तुम्ही नीतिमत्तेने न्याय करता मन व अंतःकरणाची परीक्षा घेता, त्यांच्यावरील तुम्ही घेतलेला सूड मला स्वतःच्या नजरेने बघू द्या, कारण माझ्या समस्या मी तुमच्याकडे सोपविल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तथापि हे सत्य न्याय करणार्‍या, अंतर्याम व हृदय पारखणार्‍या, सेनाधीश परमेश्वरा, त्यांचा तू सूड घेशील तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे मांडली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 पण सेनाधीश परमेश्वर, जो तू सत्याने न्याय करतोस, जो तू हृदय व मन पारखतोस. तू त्यांच्यावर केलेला प्रतिकार मी साक्ष देईन, कारण मी आपला वाद तुझ्याजवळ उघड केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 11:20
35 Iomraidhean Croise  

ही गोष्ट तुमच्यापासून दूर असो—की तुम्ही दुष्टांच्या बरोबर नीतिमान लोकांनाही मारून टाकावे, नीतिमान आणि दुष्टांना सारखेच लेखावे हे तुमच्यापासून दूर असो! सर्व पृथ्वीचे न्यायाधीश, जे योग्य ते करणार नाहीत का?”


हिज्कीयाहला दूताद्वारे पत्र मिळाले आणि त्याने ते वाचले. त्यानंतर त्याने जाऊन याहवेहच्या मंदिरात याहवेहसमोर ते उघडून ठेवले.


“आणि तू, माझ्या पुत्रा शलोमोना, आपल्या पित्याच्या परमेश्वराचा अंगीकार कर, त्यांची सेवा पूर्ण अंतःकरणाने व स्वखुशीने कर, कारण याहवेह प्रत्येकाचे अंतःकरण पाहतात आणि त्यातील प्रत्येक इच्छा व विचार त्यांना कळतो. जर तू त्यांना शोधशील, तर ते तुला सापडतील; पण जर तू त्यांचा त्याग करशील, तर ते तुझा कायमचा त्याग करतील.


माझ्या परमेश्वरा, मी जाणतो, तुम्ही हृदयाची परीक्षा घेता आणि खरेपणाने प्रसन्न होता. मी या सर्व वस्तू स्वखुशीने व प्रामाणिक हेतूने दिल्या आहेत. आणि आता हे बघून मला आनंद झाला की तुमच्या लोकांनीही किती आनंदाने स्वखुशीने या देणग्या दिल्या आहेत.


“मी तुझ्या जागी असतो तर मी माझी बाजू परमेश्वरासमोर सादर केली असती; त्यांच्यापुढे मी आपला वाद मांडला असता.


हे परमेश्वरा, माझे परीक्षण करा आणि माझे अंतःकरण पारखून पहा; माझे चिंताग्रस्त विचार बारकाईने तपासून पाहा.


तुम्ही चिलखत आणि ढाल घ्या; व उठून माझी मदत करा.


परमेश्वर, मला निर्दोष ठरवा आणि भक्तिहीन पिढीविरुद्ध माझ्या बाजूने निकाल द्या. या दुष्ट आणि कपटी लोकांपासून माझा बचाव करा.


माझ्या परमेश्वरा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा. कारण मी तुमचा आश्रय घेतला आहे; संकटे जाईपर्यंत मी तुमच्या पंखांच्या छायेखाली आश्रय घेईन.


जेव्हा दुष्टांचा सूड घेतला जाईल, तेव्हा नीतिमान लोक आनंद मानतील; दुष्ट लोकांच्या रक्ताने ते आपले पाय धुतील.


सर्वोच्च परमेश्वर माझ्या रक्षणाची ढाल आहेत, जे सरळ मनाचे आहेत, त्यांना ते वाचवितात.


याहवेहच, सर्व मानवजातीचा न्याय करोत. माझ्या प्रामाणिकपणानुसार तुम्ही माझे समर्थन करा. हे सर्वोच्च परमेश्वरा! माझ्या धार्मिकतेनुसार माझा न्याय करा.


दुष्टांच्या दुष्टाईचा अंत करा नीतिमानाला स्थिर करा— तुम्ही, हे नीतिमान परमेश्वरा, मने व अंतःकरणे पारखणारे परमेश्वर आहात.


ते सर्व याहवेहच्या उपस्थितीमध्ये गावोत; कारण पृथ्वीचा रास्त न्याय करण्यासाठी ते येत आहेत. ते जगाचा आणि सर्व मनुष्यप्राण्यांचा न्याय त्यांच्या धार्मिकतेने व समानतेने करतील.


हे याहवेह, मी तुमच्यापुढे जेव्हा निवाड्यासाठी वाद आणतो, तेव्हा तुम्ही मला नेहमी धार्मिकतेने वागविता. तरी देखील मला तुमच्या न्यायनिवाड्याबद्धल बोलू द्या: वाईट माणसे एवढी समृद्ध का असतात? सर्व विश्वासहीन लोक सुखी का असतात?


पण याहवेह, तुम्ही मला ओळखता; मला बघता व तुमच्याबद्दल माझ्या विचारांची परीक्षा घेता. मेंढरांना कत्तलखान्याकडे फरफटत न्यावे तसे त्यांना न्या! कत्तलीच्या दिवसासाठी त्यांना वेगळे करा!


हे याहवेह, तुम्हाला सर्व कळते; माझी आठवण ठेवा व माझी काळजी घ्या. माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांचा सूड घ्या, तुम्ही सहनशील आहात—मला दूर करू नका; विचार करा तुमच्यामुळे मला किती निंदा सहन करावी लागते.


“मी याहवेह, अंतःकरणे पारखतो, आणि मनाची परीक्षा घेतो, म्हणून प्रत्येक मानवाला त्याने केलेल्या आचरणाप्रमाणे, प्रत्येकाला त्याच्या कर्मांप्रमाणे रास्त प्रतिफळ देतो.”


माझा छळ करणाऱ्यांना लज्जित करा, परंतु मला फजिती पासून सोडवा; त्यांना भयभीत करा परंतु मला भय मुक्त करा. त्यांच्यावर संकटाचे दिवस येऊ दे; त्यांच्यावर दुप्पट नाश ओढवू दे.


हे सर्वसमर्थ याहवेह, तुम्ही नीतिमानाची पारख करता अंतःकरणाची व मनाची तपासणी करता, तुम्ही त्यांचा सूड घेतांना मला पाहू द्या, कारण मी माझी फिर्याद तुमच्यापुढे सादर केली आहे.


हे प्रभू, तुम्हीच माझा वाद चालविला; तुम्ही माझ्या जीवनाची खंडणी दिली.


याहवेह, माझ्यावर झालेला अन्याय तुम्ही पाहिला आहे. तुम्हीच माझी बाजू उचलून धरा!


हे याहवेह, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल ते ज्यास पात्र आहेत, असे प्रतिफळ त्यांना द्या.


मग याहवेहचा आत्मा माझ्यावर आला आणि त्यांनी मला असे बोलावयास सांगितले: “याहवेह असे म्हणतात: इस्राएलाच्या पुढार्‍यांनो तुम्ही असेच म्हणतात, परंतु तुमच्या मनात काय सुरू आहे ते मी जाणतो.


कारण त्यांनी असा एक दिवस ठरविला आहे, त्या दिवशी ते त्यांनी नियुक्त केलेल्या मनुष्याच्या द्वारे या जगाचा न्याय नीतीने करतील. त्यांना त्यांनी मरणातून जिवंत करून या गोष्टींबाबत प्रत्येकाला खात्री करून दिली आहे.”


कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा.


आलेक्सांद्र तांबटाने माझे फार वाईट केले. प्रभू त्याला त्याच्या कामाचे योग्य फळ देतील,


जेव्हा त्यांनी त्यांचा अपमान केला, तरी त्यांनी कधी उलट उत्तर दिले नाही, जेव्हा दुःख भोगले त्यांनी धमकाविले नाही. त्यापेक्षा त्यांनी जो न्यायीपणाने न्याय करतो त्यांच्याकडे स्वतःला सोपवून दिले.


“पण हे स्वर्गा! तिचा शेवट झाला म्हणून तू आनंद कर! आणि तुम्ही, परमेश्वराच्या मुलांनो, संदेष्ट्यांनो, प्रेषितांनो, तुम्हीही आनंद करा! कारण तिने तुमच्यावर लादलेल्या न्यायाविरुद्ध परमेश्वराने तुमच्या बाजूने न्यायनिवाडा केला आहे.”


मी तिच्या लेकरांना ठार मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी मने व अंतःकरणांची पारख करणारा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईन.


परंतु याहवेह शमुवेलला म्हणाले, “त्याचे रूप किंवा त्याची उंची यानुसार जाऊ नकोस, कारण मी त्याला नाकारले आहे. मनुष्य पाहतात त्याप्रमाणे याहवेह पाहत नाहीत. मनुष्य बाहेरील रूप पाहतात, परंतु याहवेह हृदय पारखतात.”


याहवेहनेच आपला न्यायाधीश होऊन आपल्यामध्ये निवाडा करावा. त्यांनी माझा वाद लक्षात घेऊन माझा कैवार घ्यावा; व मला तुमच्या हातून सोडवून माझी सुटका करावी.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan