Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 11:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 कत्तलखान्याकडे चालविलेल्या अज्ञान कोकरासारखा मी भोळाभाबडा होतो; मलाच ठार मारण्याचा त्यांचा बेत होता याची मला जाणीवही नव्हती, ते म्हणाले, “झाडाचा त्याच्या फळांसहित नाश करू या; याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू या, म्हणजे याची नावनिशाणीही राहणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मी तर सौम्य कोकरासारखा होतो; नकळत ते मला वधण्यास नेत होते. “ह्या झाडाचा आपण फळासकट नाश करू व त्याच्या नावाचे स्मरण पुन्हा होऊ नये म्हणून त्याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू,” असा त्यांचा माझ्याविरुद्ध कट चालला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 ते माझ्याविरूद्ध योजना आखत आहेत हे मला माहीत नव्हते. मी कत्तल होण्याची वाट पाहणाऱ्या गरीब कोकरासारखा होतो. “आपण या झाडाचा आणि त्याच्या फळांचा नाश करु. आपण त्यास जीवंताच्या देशातून तोडून टाकू म्हणजे त्याचे नाव आठवणीत राहणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 11:19
28 Iomraidhean Croise  

मानवाला त्याचे मोल अवगत नाही; जिवंतांच्या भूमीत ते आढळू शकत नाही.


त्याची सर्व पितृहीन मुले मरोत; एकाच पिढीमध्ये त्याच्या वंशाचे नाव पुसून टाकले जावो.


निश्चितच, नीतिमान कधीही पथभ्रष्ट होणार नाही; त्यांना सर्वकाळ स्मरणात ठेवले जाईल.


जेणेकरून मी जिवंत लोकांमध्ये राहून, याहवेहच्या समक्षतेत चालू शकेन.


मी याहवेहचा धावा करतो; मी म्हटले, “तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात, जिवंतांच्या भूमीत तुम्हीच माझे विधिलिखित आहात.”


मला हा पूर्णपणे विश्वास आहे: की मी या जीवनातच याहवेहच्या चांगुलपणाचा अनुभव घेणार.


कारण अनेकांना कुजबुजतांना मी ऐकले आहे. “सर्व बाजूने दहशत आहे!” ते माझ्याविरुद्ध कट रचीत आहे आणि माझा जीव घेण्यासाठी ते तयार आहेत.


पण आता मी संकटात सापडलो असताना त्यांना आनंद होत आहे. माझ्यावर आक्रमण करणारे मला माहीत नसताना एकत्र येऊन, माझी एकसारखी निंदा करतात.


परंतु परमेश्वर तुला शाश्वत विनाशाकडे आणतील; तुझ्या डेर्‍यातून तुला ओढून बाहेर काढतील आणि जिवंतांच्या भूमीतून समूळ नष्ट करून तुला दूर नेतील. सेला


ते म्हणतात, “चला, आपण इस्राएली राष्ट्रांचा समूळ नाश करू या; त्यांच्या अस्तित्वाची आठवण देखील आपण नष्ट करून टाकू.”


आशीर्वाद देण्यासाठी धार्मिक मनुष्याच्या नावाचा उपयोग करतात, परंतु दुष्ट मनुष्याचे नाव सडून नाहीसे होते.


चोरासारखा नीतिमान माणसाच्या घराजवळ लपून बसू नकोस, त्यांच्या राहत्या घराची लूट करू नको;


जसा बैल कापणार्‍याकडे जातो, तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला, हरिण जसे दोर्‍यांच्या फासात पाय टाकते


बदमाश माणसे दुष्ट पद्धतीचा वापर करतात, गरजवंताची याचना वाजवी असली तरी, ते दुष्टाईच्या योजना बनवितात, ते लबाडीने गरिबांचा नाश करतात.


मी म्हणालो, “मी जिवंतांच्या देशात पुन्हा याहवेह यांना स्वतः पाहणार नाही; येथून पुढे मला माझे सहकारी दिसणार नाहीत, किंवा जे आता या जगात आहेत त्यांच्याबरोबर मी राहणार नाही.


ते तुझ्याशी युद्ध करतील, परंतु तुझ्यावर विजयी होणार नाही, कारण मी तुझ्यासह आहे आणि तुझा बचाव करेन,” असे याहवेह म्हणतात.


त्यांनी म्हटले, “चला, उठा, यिर्मयाह विरुद्ध काहीतरी कारस्थान करू; आम्हाला नियम शिकविण्यास आमचे याजक, बोध देण्यासाठी आमचे ज्ञानी लोक, आणि संदेश देण्यासाठी आमचे संदेष्टेही नष्ट होणार नाहीत. म्हणून चला, आपण त्याच्यावर वाक्बाणाचा हल्ला करू आणि तो काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नये.”


मी कित्येकांना कुजबुजतांना ऐकले आहे, “सर्व बाजूंनी दहशत! त्याला दोषी ठरवा! चला, त्याला दोषी ठरवू या!” माझे सर्व मित्रगण माझ्या हातून एखादी चूक होण्याची वाट पाहत आहेत. ते म्हणतात, “कदाचित त्याची फसवणूक होईल; मग आपण त्याच्यावर वर्चस्व करू आणि आपला सूड उगवू.”


यिर्मयाहने याहवेहची आज्ञापिलेली वचने सांगणे संपविताच याजक, संदेष्टे व मंदिरातील सर्व लोकांनी त्याला घेरून त्याला म्हटले “तू मेलाच पाहिजे!


तुम्ही माझ्याविरुद्ध असलेली सुडाची गहनता, त्यांनी रचलेले सर्व कारस्थान तुम्ही पाहिले आहे.


“एलाम तिथे आहे आणि तिच्याबरोबर तिचे मोठे सैन्य तिच्या कबरेभोवती आहेत. त्या सर्वांचा वध झाला आहे, ते तलवारीने पडले आहेत. ज्या सर्वांनी जिवंताच्या भूमीवर आतंक पसरविला ते पृथ्वीच्या खाली बेसुंत्यांबरोबर अधोलोकात गेले आहेत. जे खाली गर्तेत गेले आहेत, त्यांच्याबरोबर ते लज्जित झाले आहेत.


बासष्ट ‘सप्तके’ हा काळ संपल्यावर अभिषिक्ताचा वध करण्यात येईल आणि त्याला काही उरणार नाही. मग अधिपतीचे लोक शहराचा आणि पवित्रस्थानाचा विध्वंस करतील. शेवट महापुराप्रमाणे येईल: शेवट होईपर्यंत युद्ध चालू राहील आणि सर्वकाही ओसाड व्हावे असे ठरले आहे.


संदेष्टा माझ्या परमेश्वरासोबत, एफ्राईमचा पहारेकरी आहे, तरीही त्याच्या सर्व मार्गात सापळा त्याची वाट पाहत आहे, आणि परमेश्वराच्या भवनात शत्रुत्व आहे.


गाद वंशातील देउएलाचा पुत्र एलीआसाफ;


Lean sinn:

Sanasan


Sanasan