यिर्मया 11:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 म्हणून याहवेह असे म्हणाले: ‘मी त्यांच्यावर घोर आपत्ती घेऊन येणार त्यातून त्यांची सुटका होणार नाही. ते रडून दयेसाठी आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, मी त्यांच्यावर अरिष्ट आणतो त्यातून त्यांचा निभाव लागणार नाही; ते मला आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 म्हणून परमेश्वर म्हणतो, मी त्यांना भयंकर संकटात टाकीन, ज्यातून त्यांना सुटका करून घेता येणार नाही. तेव्हा ते मदतीसाठी माझा धावा करतील, पण मी त्यांचे ऐकणार नाही. Faic an caibideil |
आणि जर त्यांनी तुला विचारले, ‘आम्ही कुठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: “ ‘ज्यांना मरणासाठी नेमले आहे, त्यांनी मरणाकडे जावे; तलवारीने ज्यांचा वध व्हावयाचा आहे, त्यांनी तलवारीकडे जावे; उपासमारीने जे मरणार आहेत, त्यांनी दुष्काळाकडे जावे; जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत, त्यांनी बंदिवासात जावे.’