Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 10:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 ते तार्शीशहून चांदीचे पत्रे आणि उफाजहून सोन्याचे पत्रे आणून कुशल कारागीर व सोनारांकडून मूर्ती घडवून घेतात. मग त्यावर ते निळी व जांभळी वस्त्रे चढवितात— हे सर्व निष्णात कारागिरांनी तयार केलेले असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तार्शीशाहून आणलेले रुप्याचे पत्रे व उफाजचे सोने ह्यांचे कारागिराने केलेले, सोनाराच्या हाताने घडलेले काम त्या आहेत, त्यांना निळा, जांभळा पोशाख चढवतात; त्या सगळ्या कुशल कारागिरांच्या हातचे काम होत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 ते लोक तार्शीशाहून ठोकून आणलेली चांदी आणि उफाजहून आणलेले सोने, कारागिराच्या व सोनाराच्या हातचे अशे ते काम आहे. ते निळ्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे चढवितात शहाणे लोक असे देव तयार करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 10:9
12 Iomraidhean Croise  

हीरामच्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा समुद्रावर तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर घेऊन परत येत असत.


हीरामच्या सेवकांद्वारे चालविलेल्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर घेऊन परत येत असत.


पण त्या तर मानवी हातांनी बनविलेल्या चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती आहेत.


तार्शीश आणि तटवर्तीय राजे आपआपले नजराणे आणोत, शबा व सबा यांचे सर्व राजे आपले उपहार आणोत.


तार्शीश ओलांडून पलीकडे जा; बेटावरील लोकहो, आक्रोश करा.


एक धातूकाम करणारा ओतीव मूर्ती तयार करतो, आणि सोनार त्याला सोन्याने मढवितो आणि तिची चांदीच्या साखळ्यांनी सजावट करतो.


“ ‘तुझ्या महान संपत्तीमुळे तार्शीशने तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाच्या मोबदल्यात त्यांनी चांदी, लोखंड, कथील व शिसे दिली.


तुझे शीड इजिप्तचे नक्षीदार रेशमी ताग होते ते तुझा झेंडा होते; तुझे छत एलिशाह द्वीपातील निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे होते.


तेव्हा मी वर पाहिले आणि एक तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कमरेला उफाज देशाच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा पुरुष उभा होता.


ते इस्राएलाकडून आहे! हे वासरू—एका कारागिराने बनविले आहे; तो परमेश्वर नाही. शोमरोनाच्या या वासराचे तुकडे तुकडे करण्यात येतील.


परंतु योनाह याहवेहपासून पळाला आणि तार्शीशला गेला. तो पुढे खाली याफो येथे गेला, तिथे त्याला त्या बंदरात बांधलेले एक जहाज सापडले. भाडे दिल्यानंतर, तो जहाजावर चढला आणि याहवेहपासून पळून जाण्यासाठी तार्शीशकडे जहाजाचा प्रवास प्रारंभ गेला.


धिक्कार असो, जो लाकडाला म्हणतो, ‘जिवंत हो!’ किंवा निर्जीव दगडाला म्हणतो, ‘जागा हो!’ ते मार्गदर्शन करू शकतात काय? त्या सोन्याने व रुप्याने मढविलेल्या आहेत; पण त्यांच्यात श्वास नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan