Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 10:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 माझा तंबू धुळीला मिळाला आहे; त्याच्या सर्व दोऱ्या तुटल्या आहेत. माझी मुले माझ्यापासून दूर गेली आहेत आणि नाहीशी झाली आहेत; माझा तंबू उभारण्यासाठी कोणीही राहिले नाही, माझे निवासस्थान पुन्हा बांधण्यास कोणीही नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 माझा डेरा लुटला आहे, माझे सर्व दोर तुटले आहेत; माझे पुत्र निघून गेले आहेत; ते नाहीत; माझा डेरा ताणायला कोणी नाही, माझ्या कनाती लावायला कोणी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 माझ्या तंबूचा नाश झाला आणि माझ्या तंबूचे सर्व दोर तुटले आहेत. माझी मुले मला सोडून निघून गेली आहेत. माझा तंबू उभारायला एकही मनुष्य उरला नाही. माझा निवारा बांधायला एकही मनुष्य शिल्लक नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 10:20
12 Iomraidhean Croise  

जे मला आता पाहतात ते मला आणखी पाहणार नाहीत; तुम्ही मला शोधाल पण मी अस्तित्वहीन असेन.


दुर्जन उलथून टाकले जातात आणि ते नाहीसे होतात, परंतु नीतिमानाचे घराणे स्थिर उभे असते.


मी माझी वचने तुमच्या मुखात घातली आहेत आणि तुम्हाला माझ्या हाताच्या सावलीत झाकून ठेवले आहे— मीच आहे, ज्याने आकाशाला स्थिर असे ठेवले, आणि सर्व पृथ्वीसाठी पाया घातला, आणि जो सीयोनला म्हणतो, ‘तुम्ही माझे आहात.’ ”


तिने जन्माला घातलेल्या लेकरांपैकी तिचे मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नव्हते; तिने संगोपन केलेल्या लेकरांपैकी तिचा हात धरून चालविण्यासाठी कोणीही नव्हते.


“आपले तंबू प्रशस्त कर, तुझ्या तंबूच्या कनातीचा विस्तार वाढव, हात आवरू नको; दोरबंद लांब कर, खुंट्या मजबूत कर.


मी तुझे आरोग्य पुनर्स्थापित करेन आणि तुझ्या जखमा बर्‍या करेन,’ याहवेह जाहीर करतात, ‘कारण तू बहिष्कृत म्हणविली जात होती, सीयोन नगरी, जिची कोणासही चिंता नाही.’


याहवेह असे म्हणतात: “रामाह मधून आवाज ऐकू येत आहे, शोक आणि घोर आकांत, राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे. ती सांत्वन पावण्यास नकार देते, कारण ते आता राहिले नाहीत.”


एका आपत्तीच्या पाठोपाठ दुसरी आपत्ती येते; सर्व राष्ट्र उद्ध्वस्त झाले आहे. माझा तंबूचा एका क्षणात नाश झाला आहे, क्षणार्धात माझे निवासस्थान जमीनदोस्त झाले आहे.


तिचे प्रतिपक्षी तिचे मालक बनले आहेत; तिचे शत्रू सुखात आहेत. याहवेहने तिला दुःख दिले आहे, कारण तिने अनेक पापे केली आहेत. तिचे बालक बंदिवासात गेले आहेत. ते तिच्या शत्रूचे गुलाम झाले आहेत.


तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या सुखी घरातून हाकलून देतात. तुम्ही त्यांच्या मुलांकडून माझे आशीर्वाद कायमचे हिरावून घेता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan