Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 10:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 कारण याहवेह असे म्हणतात: “जे या देशाचे रहिवासी आहेत त्यांना यावेळी मी तुम्हाला या देशातून बाहेर भिरकावून देईन; त्यांच्यावर महासंकटे आणेन म्हणजे ते सहजगत्या पकडल्या जातील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी ह्या प्रसंगी ह्या देशाचे रहिवासी गोफणीतून भिरकावतो, मी त्यांना अशी पीडा करतो की ती त्यांना जाणवेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, यावेळी, मी देशात राहणाऱ्यांना बाहेर फेकून देईन. आणि त्यांना धडा शिकवावा म्हणून त्यांना दु:ख देईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 10:18
11 Iomraidhean Croise  

“हे बलवान पुरुषा, याहवेहच तुला घट्ट पकडून ठेवणार आहेत आणि आता तुला झुगारून फेकणार आहेत.


म्हणून मी तुम्हाला या राष्ट्रातून बाहेर फेकून देईन आणि तुमच्या पूर्वजांना अनोळखी अशा देशात तुम्हाला पळवून लावेन. तिथे गेल्यावर तुम्ही इतर दैवतांची रात्रंदिवस सेवा कराल, मी तुमच्यावर मुळीच कृपा करणार नाही.’


तू व तुझी माता, यांना मी अशा देशाबाहेर भिरकावून टाकेन, जिथे तुमचा जन्म झाला नव्हता आणि त्या देशात तुम्हाला मरण येईल.


याहवेहच्या अंतःकरणाचा उद्देश पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा महाभयंकर क्रोध शांत होणार नाही. पुढे येणाऱ्या दिवसात तुला ते अगदी स्पष्टपणे कळेल.


आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे; त्यांच्यावर हे अरिष्ट आणेन अशी धमकी मी निरर्थकच दिली नाही.


“मी सर्व लोकांवर अशा विपत्ती आणेन, ते मार्ग शोधणार्‍या एखाद्या आंधळ्या माणसाप्रमाणे चाचपडतील, कारण त्यांनी याहवेहविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे ओतले जाईल व त्यांच्या आतड्या शेणासारख्या विखुरतील.


पण माझी वचने व माझे नियम जे मी माझ्या सेवक संदेष्ट्यांना आज्ञापिले होते, त्यांनी तुमच्या पूर्वजांना मागे टाकले आहे ना? “तेव्हा त्यांनी पश्चात्ताप केला व ते म्हणाले, ‘आमचे वागणे व प्रथांमुळे याहवेहकडून आम्हाला जी शिक्षा मिळाली, त्यास आम्ही पात्र आहोत. जी करण्याचा त्यांनी निर्धार केला होता.’ ”


ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालेल आणि तुमचे सर्व उंच व मजबूत तट, ज्यावर तुमची भिस्त आहे, ते पाडून टाकतील. याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या देशातील सर्व शहरांना ते वेढा घालतील.


जरी कोणा मनुष्याने तुमचा जीव घेण्यासाठी तुमचा पाठलाग केला, तरी माझ्या धन्याचा जीव याहवेह तुमचा परमेश्वर यांच्याजवळ जिवंतांच्या गाठोड्यामध्ये सुरक्षित राहेल, परंतु जसे गोफणीच्या झोळीतून फेकावे तसे याहवेह तुमच्या शत्रूंचे प्राण भिरकावून देतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan