Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 10:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 प्रत्येक मनुष्य असमंजस व ज्ञानहीन आहे; प्रत्येक सोनार त्याच्या मूर्तींनी लज्जित झाला आहे. त्याने घडविलेल्या प्रतिमा खोट्या आहेत. त्यांच्यामध्ये श्वास नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे; प्रत्येक मूर्तिकार मूर्तीमुळे लज्जित झाला आहे; कारण त्याने ओतलेली मूर्ती साक्षात लबाडी आहे, त्यांच्यात मुळीच प्राण नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 ज्ञानाशिवाय, प्रत्येक मनुष्य अज्ञानी झाला आहे. आपण निर्माण केलेल्या मूर्तीमुळेच सोनार लाजवले जातात. कारण त्या मूर्ती म्हणजे फक्त असत्य आहे. त्यामध्ये काही सजीवपणा नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 10:14
20 Iomraidhean Croise  

मानवांमध्ये कोणी समंजस आहे का? परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का? हे पाहण्यासाठी याहवेह स्वर्गातून खाली पाहतात.


मतिमंद लोकांना त्याचे आकलन होत नाही; मूर्खांना हे समजत नाही की,


विचार करा, या लोकांमधील मूर्खांनो; निर्बुद्ध्यांनो, तुम्हाला शहाणपण कधी येणार?


जे प्रतिमांची प्रौढी मिरवित होते, ते मूर्तींचे सर्व उपासक फजीत झाले. सर्व दैवतांनो, त्यांची आराधना करा!


मी फक्त पशुतुल्य आहे, मनुष्य नाही; मला मानवी समज नाही.


परंतु जे मूर्तींवर विश्वास ठेवतात, जे मूर्तींना म्हणतात कि, ‘तुम्ही आमची दैवते आहात,’ ते पूर्णपणे लज्जित होऊन मागे फिरतील.


हे करणारे लोक लज्जित होतील; हे सर्व कारागीर तर केवळ मानव आहेत. या सर्वांनी एकत्र यावे व सिद्ध करावे; त्यांना भयभीत करून लज्जित करण्यात येईल.


जे मूर्ती घडवितात, ते लज्जित व अपमानित होतील; ते सर्वजण एकत्र अपमानित केले जातील.


मी तुझे नीतिमत्व आणि तुझी कर्मे उघडकीस आणेन, आणि ती तुला लाभदायक होणार नाही.


ते जणू काही काकडीच्या मळ्यातील बुजगावणेच, या मूर्तीला बोलता येत नाही; तिला तर उचलून न्यावे लागते कारण तिला चालता येत नाही. त्यांना घाबरू नकोस; त्या काहीही इजा करू शकत नाही तुमचे काही भले सुद्धा करत नाही.”


लाकडाच्या व्यर्थ मूर्तींद्वारे ज्यांना शिक्षण मिळते, ते सर्व निर्बुद्ध व मूर्ख आहेत;


परमेश्वराविषयीच्या सत्याची अदलाबदल त्यांनी खोटेपणाशी केली आणि उत्पन्नकर्त्या ऐवजी उत्पन्न केलेल्या वस्तूंची उपासना व सेवा केली. तो उत्पन्नकर्ता युगानुयुग धन्यवादित आहेत. आमेन.


परंतु दुसर्‍या दिवशी पहाटे जेव्हा ते उठले तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्याचे डोके आणि हात तुटून ते दाराच्या उंबरठ्यावर पडलेले होते; फक्त त्याचे शरीर तसेच होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan