Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 10:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 परंतु याहवेह हेच खरे परमेश्वर आहेत; ते जिवंत परमेश्वर आहेत, ते सनातन राजा आहेत. जेव्हा ते क्रोधित होतात, सर्व पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या प्रकोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तरी परमेश्वर सत्य देव आहे; तो जिवंत देव, सनातन राजा आहे; त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे. तोच जिवंत आणि सार्वकालीक राजा आहे. पृथ्वी त्याच्या क्रोधाने कंपन पावते आणि त्याचा कोप राष्ट्रे सहन करु शकत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 10:10
69 Iomraidhean Croise  

अब्राहामाने बेअर-शेबा येथे टमरिस्क म्हणजे एशेल नावाचे झाड लावले आणि सनातन परमेश्वर याहवेहची आराधना केली.


जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, तेव्हा ते पालथे पडून रडू लागले, “याहवेह हेच परमेश्वर आहे! याहवेह हेच परमेश्वर आहे!”


म्हणजे पृथ्वीवरील सर्व लोकांनी ओळखावे की याहवेह हेच परमेश्वर आहेत आणि दुसरा कोणीही नाही.


याहवेह, तुमचे सामर्थ्य व महिमा महान आहे; गौरव, वैभव व ऐश्वर्य ही सदासर्वकाळ तुमचीच असो, पृथ्वीवरील व स्वर्गातील सर्वकाही तुमचेच आहे! याहवेह, हे सर्व तुमचेच राज्य आहे; तुमचे प्रभुत्व सर्वांवर आहे.


आता पुष्कळ काळपर्यंत इस्राएलमध्ये खरे परमेश्वर नव्हते, शिकविण्यासाठी याजक आणि नियम नव्हते.


ते पृथ्वीला तिच्या जागेवरून हालवितात, आणि तिचे स्तंभ डळमळीत करतात.


याहवेह हे सर्वकाळचे राजा आहेत; त्यांच्या राज्यातून इतर राष्ट्रे नाहीशी झाली आहेत.


याहवेह हेच परमेश्वर आहेत, हे जाणून घ्या. ते आपले निर्माणकर्ते आहेत व तेच आपले स्वामी आहेत; आपण त्यांचे लोक, त्यांच्या कुरणातील मेंढराप्रमाणे आहोत.


कारण याहवेह चांगले आहेत आणि त्यांची प्रीती सनातन आहे; त्यांचा विश्वासूपणा पिढ्यान् पिढ्या टिकून राहतो.


त्यांच्या नेत्रकटाक्षांनी पृथ्वी थरथर कापते; ते स्पर्श करताच पर्वतातून धुराचे लोट बाहेर पडतात.


अगे पृथ्वी, तू परमेश्वराच्या समक्षतेत, याकोबाच्या देवासमोर, थरथर काप.


कारण तुमचे राज्य अनंतकाळचे राज्य आहे, तुमची सत्ता पिढ्यान् पिढ्या चालते. याहवेह आपल्या सर्व प्रतिज्ञांशी एकनिष्ठ आहेत, त्यांच्या सर्व कार्यात ते विश्वासू असतात.


कारण त्यांनीच आकाश, पृथ्वी, सागर, आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले; ते सदासर्वदा विश्वासयोग्य आहेत.


तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, आणि पर्वताचे पाये हादरले. याहवेहच्या क्रोधामुळे ते भयभीत झाले.


याहवेह जलप्रलयावर सिंहासनावर आरूढ झालेले आहेत; याहवेहच महाराज बनून सिंहासनावर सर्वकाळ स्थानबद्ध झालेले आहेत.


मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो; माझ्या विश्वासयोग्य याहवेह, तुम्ही मला मुक्त केले.


माझा जीव परमेश्वराकरिता, जिवंत परमेश्वराकरिता तहानलेला आहे. मी केव्हा परमेश्वरासमोर येऊन त्यांचे दर्शन करणार?


प्रभूने आज्ञा दिली आणि मोठ्या संख्येने महिलांनी मोठ्या आनंदाने या वार्तेचा प्रसार केला:


तेव्हा पृथ्वी थरथर कापली, परमेश्वरासमोर आकाशातून वृष्टी झाली, परमेश्वरासमोर, इस्राएलाच्या परमेश्वरासमोर सीनाय पर्वत कंपित झाला.


परमेश्वर तुम्ही पुरातन काळापासून माझे राजे आहात; पृथ्वीवर तारणाचे कार्य करणारे तुम्हीच आहात.


तुम्हीच एकटेच भयास योग्य आहात. जेव्हा आपण रागावता, तेव्हा आपल्यासमोर कोण उभा राहू शकतो?


स्वर्गातून तुम्ही आपला निर्णय जाहीर केला, तेव्हा पृथ्वीचा थरकाप उडाला आणि ती स्तब्ध झाली—


चक्रीवादळामध्ये गर्जना झाली; विजेच्या लखलखाटाने संपूर्ण जग प्रकाशित झाले; पृथ्वी थरारली आणि डळमळली.


याहवेह तुमच्या अंगणाच्या उत्कंठेने मी, मूर्छित होईपर्यंत आतुर झालो आहे; माझा जीव व माझा देह जिवंत परमेश्वराला आरोळी मारीत आहे.


ते नीतिमत्तेने जगावर राज्य करतात आणि समानतेने लोकांना रास्त न्याय देतात.


तुमच्या संतापाची भयानकता जाणू शकलो असतो, तर बरे झाले असते! तुमचा क्रोध तितकाच व्यापक आहे, जितकी त्याची भीती.


पर्वत निर्माण होण्यापूर्वी, सृष्टीची घडण होण्यापूर्वी, अनादि ते अंतापर्यंत तुम्हीच परमेश्वर आहात!


तुमचे सिंहासन अनादिकालापासून स्थापलेले आहे; तुम्ही अनंतकाळापासून आहात.


त्यांच्या विजा जगाला प्रकाश देतात; हे पाहून पृथ्वी कंपित होते.


हे याहवेह, आपले कान लावा आणि ऐका; याहवेह, आपले डोळे उघडा आणि पाहा; आणि जिवंत परमेश्वराचा उपहास करण्यास पाठविलेले सन्हेरीबचे सर्व शब्द ऐका.


कदाचित याहवेह तुमचे परमेश्वर सेनाप्रमुखाचे शब्द ऐकतील, त्याचा स्वामी अश्शूरच्या राजाने आपल्या जिवंत परमेश्वराची निंदा करण्यास पाठविले आहे आणि हे शब्द ऐकून याहवेह तुमचे परमेश्वर त्याचा निषेध करतील. म्हणून जे थोडके उरलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”


राष्ट्रे ही निश्चितच बादलीतील थेंबासारखी आहेत; त्यांना तराजूवर असलेली धूळ समजले जाते; बेटांना ते असे तोलतात, जणू ते धूलिकण आहेत.


तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही ते कधी ऐकले नाही काय? याहवेहच सनातन परमेश्वर आहेत, पृथ्वीच्या दिगंताचे उत्पन्नकर्ता तेच आहेत. ते कधी थकणार वा कंटाळणार नाहीत, त्यांची आकलन शक्ती अगम्य आहे.


जे अनंतकाळ अस्तित्वात आहेत, ज्यांचे नाम पवित्र आहे जे सर्वोच्च व परमथोर आहेत, ते म्हणतात— “मी परमोच्च व पवित्रस्थानी राहतो, परंतु जे पश्चात्तापी व आत्म्याने लीन आहेत, अशांसोबतही राहतो, मी नम्र जणांच्या आत्म्यांना ताजेतवाने करतो व पश्चात्तापी अंतःकरणाच्या लोकांना नवा धीर देतो.


जो कोणी या भूमीवर आशीर्वादासाठी धावा करतो तो खऱ्या परमेश्वराद्वारेच करेल; जो कोणी या भूमीवर शपथ घेतो तो खऱ्या परमेश्वराचीच घेईल. कारण जुने त्रास विसरण्यात येतील, आणि माझ्या नजरेपासून लपविल्या जातील.


परंतु ‘परमेश्वराचा संदेश’ हा शब्दप्रयोग तुम्ही पुन्हा करू नये, कारण तुम्हा प्रत्येकाचे वचन तुमचा व्यक्तिगत संदेश होतो. म्हणून तुम्ही जिवंत परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, आपले परमेश्वर यांच्या वचनाचा विपर्यास करता.


आणि जर सत्यतेने, न्यायीपणाने आणि नीतिमार्गाने चालशील, ‘जिवंत याहवेहची शपथ वाहशील,’ तर मग राष्ट्रे याहवेहच्या द्वारे आशीर्वादित होतील. आणि याहवेहच्या नामामध्ये त्यांचा गौरव करतील.”


मी पर्वतांकडे पाहिले, ते कंपायमान झालेले होते; सर्व डोंगर डळमळत होते.


बाबेलच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल; त्याचा आक्रोश राष्ट्रांत प्रतिध्वनित होईल.


भूमी थरथरत व वेदनांनी तळमळत आहे, कारण याहवेहने बाबेलविरुद्ध केलेला संकल्प कायमचा आहे— बाबेलची भूमी ओसाड होईल जेणेकरून तिथे कोणीही राहणार नाही.


किती महान त्यांनी प्रकट केलेली चिन्हे, किती थोर त्यांनी केलेले चमत्कार! त्यांचे राज्य सदासर्वकाळचे आहे; त्यांचे प्रभुत्व पिढ्यान् पिढ्या राहणारे आहेत.


निर्धारित कालखंडाच्या शेवटी, मी, नबुखद्नेस्सरने माझी नजर वर स्वर्गाकडे वळवली आणि माझी बुद्धी मला पुन्हा लाभली. मग मी परात्पर परमेश्वराची महिमा केली; त्यांना आदर आणि गौरव दिला, जे सदासर्वकाळ जिवंत आहेत, त्यांची सत्ता शाश्वत आहे. त्यांचे साम्राज्य पिढ्यान् पिढ्या राहणारे आहे.


“माझ्या राज्याच्या प्रत्येक भागातील लोकांनी दानीएलच्या परमेश्वराचे भय बाळगावे आणि आदर करावा. “कारण ते जिवंत परमेश्वर आहे आणि ते सर्वकाळ टिकणारे आहेत; त्यांच्या राज्याचा कधीच नाश होणार नाही व त्यांचे प्रभुत्व कधीही संपणारे नाही.


ते सुटका करतात व ते वाचवितात; ते आकाशात आणि पृथ्वीवर चिन्ह आणि चमत्कार करतात. त्यांनीच दानीएलला सिंहांच्या तावडीतून सोडविले आहे.”


त्याला अधिकार, गौरव व सार्वभौम सामर्थ्य देण्यात आले; सर्व राष्ट्रांनी आणि प्रत्येक सर्व भाषा बोलणार्‍यांनी त्याची उपासना केली. त्याचे सामर्थ्य शाश्वतचे आहे, जे कधीही ढळणार नाही आणि त्याचा कधी अंत होत नाही आणि म्हणून त्याचे राज्य हे असे राज्य आहे, ज्याचा कधीही नाश होणार नाही.


याहवेह आपल्या सैन्यापुढे गर्जना करीत चालतात; त्यांचे सैन्य असंख्य आहेत, आणि त्यांची आज्ञा मानणारे बलवान सैन्य आहे. याहवेहचा दिवस महान आहे; अति भयंकर दिवस आहे. त्यास कोण सहन करू शकेल?


त्यांच्या पायाखाली पर्वत वितळतात जसे अग्नीपुढे मेण, जसे पाणी उतारावरून खाली येते, तशा दऱ्या दुभंगतात.


त्यांच्यासमोर पर्वत कंपित होतात व टेकड्या विरघळतात. पृथ्वी आणि जग व त्यात राहणारे सर्वजण त्यांच्या समक्षतेत थरकापतात.


संतप्त याहवेहपुढे कोणाचा निभाव लागेल? त्यांचा क्रोध कोण सहन करू शकेल? त्यांचा उग्र क्रोध अग्नीसारखा ओतला जातो; त्यांच्यापुढे खडक ढासळून पडतात.


पर्वतांनी हे पाहिले आणि ते कंपित झाले. पाण्याचा प्रखर प्रवाह झपाट्याने आला; खोल समुद्र गरजला आणि त्याने आपल्या लाटा उंच उफाळल्या.


ते थांबले व त्यांनी पृथ्वीस हालवून टाकले; त्यांनी बघितले व देशास थरकाप आणला. पुरातन पर्वतांचा चुराडा झाला प्राचीन डोंगर ढासळले— परंतु ते सर्वकाळ मार्गस्थ आहेत.


पण त्यांच्या येण्याचा दिवस कोण सहन करू शकेल? त्यांच्या आगमनास कोण सामोरा जाऊ शकेल? कारण तो मौल्यवान धातू शुद्ध करणार्‍या धगधगत्या अग्नीसारखा आहे आणि मलीन वस्त्रे धुणाऱ्या साबणासारखा असेल.


शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त, जिवंत परमेश्वराचे पुत्र आहात.”


पण येशू शांत राहिले. नंतर महायाजकाने त्यांना विचारले, “जिवंत परमेश्वराच्या नावाने शपथ घालून मी तुला विचारतो की, परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस का?”


आता सार्वकालिक जीवन हेच आहे: जे तुम्ही एकच सत्य परमेश्वर आहात त्या तुम्हाला व ज्यांना तुम्ही पाठविले, त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.


“मित्रांनो, तुम्ही हे कशासाठी करीत आहात? आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच माणसे आहोत. आम्ही तुमच्यासाठी जी शुभवार्ता आणली आहे ती तुम्हाला सांगतो, यासाठी की तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून देऊन, ज्याने आकाश, पृथ्वी, सागर व त्यातील सर्वकाही निर्माण केले त्या जिवंत परमेश्वराकडे वळावे.


तेच आमचे खडक आहेत, त्यांचे कार्य परिपूर्ण आहे. आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य असतात. विश्वासयोग्य परमेश्वर, जे कधीच चूक करीत नाही, ते न्यायी आणि सत्यनिष्ठ आहेत.


कारण जिवंत परमेश्वर अग्नीतून बोलत असताना त्यांची वाणी ऐकून जिवंत राहिला आहे, असा सर्व नश्वर मानवात आमच्याशिवाय कोण आहे?


कारण ते स्वतः अहवाल देतील की आमचे स्वागत तुम्ही कशाप्रकारे केले आणि जे जिवंत व खरे परमेश्वर आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी तुम्ही मूर्तीपासून कसे दूर झाला आहात.


जे सर्वकाळचे राजा, अविनाशी व अदृश्य असे एकच परमेश्वर यांना सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव असो. आमेन.


जगातील श्रीमंतांना निक्षून सांग की त्यांनी गर्विष्ठ आणि उद्धट होऊ नये; त्या धनावर विसंबून राहू नये. तर परमेश्वर जे आपल्या उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतात, त्याचा अभिमान बाळगा व त्यांच्यावर भरवसा ठेवा.


जिवंत परमेश्वराच्या हातात सापडणे फार भयंकर आहे.


यहोशुआ म्हणाला, अशाप्रकारे तुम्हाला कळेल की जिवंत परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत व कनानी, हिथी, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसींना ते खचितच तुमच्या समोरून घालवून देतील.


आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की, परमेश्वराचे पुत्र ख्रिस्त आले आहेत आणि आपण खर्‍या परमेश्वराला ओळखावे यासाठी त्यांनी आपल्याला बुद्धी दिली आहे. त्यांचे पुत्र येशू ख्रिस्तामध्ये असल्याने, जे खरे आहेत त्यांच्यामध्ये आपण आहोत. तेच एकमेव खरे परमेश्वर आहेत आणि तेच सार्वकालिक जीवन आहेत.


मग एक भव्य शुभ्र राजासन व त्यावर बसलेला एकजण माझ्या दृष्टीस पडला. तेव्हा पृथ्वी व आकाशांनी त्यांच्या समोरून पळ काढला आणि त्यांना कुठेही जागा मिळाली नाही.


“जेव्हा याहवेह तुम्ही सेईरातून बाहेर निघाले, जेव्हा तुम्ही एदोमाच्या भूमीतून चालत गेले, पृथ्वी थरारली, आकाशाने जल ओतले, ढगांनी जलबिंदू खाली ओतले.


दावीदाने त्याच्या बाजूला उभे असलेल्या पुरुषांना विचारले, “जो या पलिष्टी मनुष्याला मारेल आणि इस्राएलची ही अप्रतिष्ठा काढून टाकेल, त्याला काय करण्यात येईल? हा बेसुंती पलिष्टी मनुष्य कोण आहे की त्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला चेतावणी द्यावी?”


आपल्या दासाने सिंह व अस्वल हे दोन्ही मारले; हा बेसुंती पलिष्टीही त्यापैकी एकासारखा असेल, कारण त्याने जिवंत परमेश्वराच्या सेनेचा उपहास केला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan