Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील याजकांपैकी हिल्कियाहचा पुत्र यिर्मयाहचे वचन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 1:1
23 Iomraidhean Croise  

राजा अबीयाथार याजकाला म्हणाला, “तू अनाथोथ येथे आपल्या शेताकडे परत जा. वास्तविक तू सुद्धा मरण्यास पात्र आहे, परंतु मी तुला आता मारणार नाही, कारण माझे पिता दावीद याच्यासमोर तू सार्वभौम याहवेहचा कोश वाहिला आणि माझे पिता दावीदाच्या सर्व कष्टांमध्ये तू सहभागी होतास.”


बिन्यामीनच्या गोत्रास गिबोन, गेबा, आलेमेथ आणि अनाथोथ ही सर्व त्यांच्या शिवारासह. त्यांच्या घराण्यांची एकंदर सगळी नगरे तेरा होती.


यिर्मयाहने योशीयासाठी विलापगीत लिहिले आणि आजपर्यंत सर्व स्त्री-पुरुष गायक विलापामध्ये योशीयाहचे स्मरणोत्सव करतात. इस्राएलमध्ये ही एक परंपरा झाली आहे आणि विलाप गीतांमध्ये त्या लिहिलेल्या आहेत.


त्याने त्याचे परमेश्वर याहवेह यांच्या दृष्टीने जे वाईट ते केले आणि यिर्मयाह संदेष्टाने याहवेहचे वचन त्याला सांगितले, तरी त्यांच्यासमोर तो नम्र झाला नाही.


भूमीने शब्बाथाच्या विश्रांतीचा आनंद घेतला; यिर्मयाहने सांगितलेल्या याहवेहच्या वचनाच्या पूर्णतेची सत्तर वर्षे होईपर्यंत त्या भूमीने तिच्या उजाडपणाच्या सर्व वेळेत विसावा घेतला.


यिर्मयाहने सांगितलेला याहवेहचा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून पर्शियाचा राजा कोरेशच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी पुढील जाहीरनामा लिहून आपल्या संपूर्ण साम्राज्यात पाठवावा अशी इच्छा याहवेहने राजाच्या मनात निर्माण केली.


अनाथोथचे 128,


यहूदीयाचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या शासनकाळात आमोजाचा पुत्र यशायाहने यहूदीया आणि यरुशलेम संबंधी दृष्टान्त पाहिला.


गल्लीमच्या मुली, आरडाओरडा करा! ऐक, लईशाह! गरीब बिचारा अनाथोथ!


यहूदीया व यरुशलेमविषयी आमोजाचा पुत्र यशायाहने पाहिलेला दृष्टान्त:


म्हणून अनाथोथच्या लोकांविषयी, जे माझा जीव घेण्याची धमकी देतात, ते म्हणतात “याहवेहच्या नावाने भविष्यवाणी करू नको, नाहीतर आमच्या हातून तुझा जीव जाईल;”


मग तू या अनाथोथच्या यिर्मयाहला का फटकारले नाहीस, जो स्वतःला संदेष्टा म्हणवितो?


याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले:


तेव्हा यिर्मयाह शहरातून बाहेर पडू लागला व बिन्यामीन प्रांतातील त्याने विकत घेतलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी यरुशलेमहून निघाला.


बूजीचा पुत्र यहेज्केल याजक बाबिलोनी लोकांच्या देशात, खेबर नदीच्या किनाऱ्याकडे असताना याहवेहचे वचन त्याच्याकडे आले; तिथे याहवेहचा हात त्याच्यावर होता.


त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मला, दानीएलला, संदेष्टा यिर्मयाहला दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार पवित्र शास्त्रातून समजले की यरुशलेम सत्तर वर्षे उजाड अशा अवस्थेत राहील.


तकोवा येथील एक मेंढपाळ आमोसाची वचने—त्याने उज्जीयाह यहूदाहचा आणि योआश चा पुत्र यरोबोअम इस्राएलचा राजा असता, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाबद्दल जे दृष्टान्तामध्ये पाहिले ते हे.


तेव्हा बेथेलचा याजक, अमस्याहने इस्राएलचा राजा यरोबोअमाला हा निरोप पाठविला: आमोस इस्राएलच्या हृदयात तुमच्याविरुद्ध कट रचीत आहे. त्याचेही सर्व शब्द देशासाठी असह्य आहेत.


त्यांनी उत्तर दिले, “काहीजण म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीयाह म्हणतात; आणि आणखी काही यिर्मयाह किंवा संदेष्ट्यापैकी एक.”


संदेष्टा यिर्मयाह याच्याद्वारे जे सांगितले होते, ती भविष्यवाणी खरी ठरली ती अशी:


हे शेत विकत घेण्याच्या घटनेने यिर्मयाह संदेष्ट्याची भविष्यवाणी पूर्ण झाली. ती अशी: “त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली आणि इस्राएली लोकांनी त्याचे मोल ठरविले,


Lean sinn:

Sanasan


Sanasan