Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 9:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 लढाईत वापरलेले प्रत्येक योद्ध्याची पायतणे आणि रक्ताने माखलेले प्रत्येक वस्त्र जळण्यासाठी पूर्वनियोजित केले जाईल, जाळण्यासाठी इंधन असे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सरपण झाली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कारण युद्धाच्या गोंधळात फिरलेले प्रत्येक जोडे व रक्ताने माखलेली वस्त्रे जाळण्यात येतील ती अग्नीला भक्ष होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 9:5
29 Iomraidhean Croise  

मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनीएल असे ठेवले, कारण तो म्हणाला, “मी परमेश्वराचे मुख पाहिले आणि तरीही मी जिवंत राहिलो.”


दिगंतापर्यंत युद्धे ते बंद करतात. ते धनुष्य तोडतात आणि भाल्याचे तुकडे तुकडे करतात; ते रथांना अग्नीत भस्म करतात.


मग पर्वत लोकांना समृद्धी प्रदान करो, आणि डोंगर नीतिमत्वाची फळे उत्पादित करो.


त्याच्यापुढे सावध असा आणि तो जे काही सांगेल ते ऐका. त्याच्याविरुद्ध बंड करू नका; तो तुझ्या अपराधांची क्षमा करणार नाही, कारण माझे नाव त्याच्यामध्ये आहे.


ऐका, डोंगरावरील एक आवाज, मोठ्या लोकसमुदायासारखा आवाज! ऐका, राज्यांमध्ये चालू असलेला गोंधळ, राष्ट्रे एकत्र जमत असल्यासारखा आवाज! सर्वसमर्थ याहवेह, युद्धासाठी सैन्य जमा करीत आहेत.


ते राष्ट्रांमध्ये न्याय करतील, आणि अनेक लोकांमधील वाद मिटवतील. ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील, व भाल्यांचे आकडे बनवतील. एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही, तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत.


तोफेथ फार पूर्वीपासून तयार झालेला आहे; ते राजासाठी तयार केलेले आहे. त्याचे अग्निकुंड खोल आणि रुंद केले आहे, त्यामध्ये भरपूर अग्नी आणि लाकूड आहे; जळत्या गंधकाच्या प्रवाहासारखा, याहवेहचा श्वास ते पेटवितो.


त्या रात्री याहवेहच्या दूताने अश्शूर सैनिकांच्या छावणीत एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिक ठार केले. दुसर्‍या दिवशी सकाळी लोक उठून पाहतात—तो त्यांच्या सर्व बाजूला प्रेते पसरलेली होती.


प्रभू परमेश्वर सीयोनच्या स्त्रियांची घाण धुवून टाकतील; ते न्यायाच्या आत्म्याने आणि अग्नीच्या आत्म्याने यरुशलेममधील रक्ताचे डाग स्वच्छ करतील.


कारण जसे मिद्यानाच्या पराभवाच्या दिवसामध्ये, तुम्ही त्यांच्यावर ओझे असलेले जोखड, त्यांच्या खांद्यांवरील लोखंडाची सळई, त्यांच्यावर जुलूम करणाऱ्याची काठी मोडून टाकली आहे.


कारण आम्हासाठी एक बाळ जन्मले आहे, आमच्यासाठी एक पुत्र दिला आहे, आणि सत्ता त्यांच्या खांद्यावर असेल. आणि त्यांना अद्भुत सल्लागार, पराक्रमी परमेश्वर, सार्वकालिक पिता, शांतीचा राजकुमार असे म्हणतील.


याहवेह म्हणतात, “असे दिवस येत आहेत की, त्या समयी मी दावीदातून एक नीतिमान शाखा पुन्हा उगवेन, तो राजा सर्व देशात सुज्ञतेने, खरेपणाने आणि न्यायाने राज्य करेल.


रथांच्या आवाजाप्रमाणे, पर्वताच्या माथ्यांवर ते उड्या मारतात, भुसा भस्म करणार्‍या अग्नीप्रमाणे, युद्धासाठी सज्ज झालेल्या पराक्रमी सैन्याप्रमाणे आहे.


याहवेहसाठी अन्नार्पण म्हणून याजक या सर्वाचे वेदीवर हवन करेल.


याजक त्यांचे अन्नार्पण म्हणून वेदीवर हवन करतील, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. सर्व चरबी याहवेहसाठी आहे.


हे सैन्याच्या नगरी, आता आपल्या सैन्याला एकत्र करा, कारण आमच्याविरुद्ध वेढा पडला आहे. ते काठीने इस्राएलाच्या शासकाच्या गालावर मारतील.


चाबकांच्या फटकार्‍यांचा आवाज, चाकांचा खडखडाट, चौखूर धावणारे घोडे आणि हिसके देणारे रथ!


तो याहवेहचे मंदिर बांधेल व तो वैभवशाली वस्त्र परिधान करेल आणि राजासनावर बसेल व राज्य करेल. तो त्याच्या सिंहासनावर याजक होईल आणि या दोघात समन्वय होईल.’


योहान म्हणाला, “पश्चात्तापासाठी मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु ज्यांची पादत्राणे वाहण्यासही माझी पात्रता नाही, जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत, असे दुसरे कोणीतरी येत आहे. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करतील.


वर आकाशात व खाली पृथ्वीवर, रक्त व अग्नी व धुरांचे स्तंभ अशी विलक्षण चिन्हे मी दाखवेन.


त्यावेळी अग्नीच्या जिभांसारख्या दिसणार्‍या जिभा वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर एकएक अशा स्थिरावताना त्यांना दिसल्या.


जे परमेश्वराला ओळखत नाहीत आणि आपल्या प्रभू येशूंची शुभवार्तेचे पालन करीत नाहीत, त्यांना ते शिक्षा देतील.


याहवेहच्या दूताने उत्तर दिले, “तू माझे नाव का विचारतो? हे समजण्यापलीकडे आहे.”


शौल याजकांबरोबर बोलत असताना, पलिष्ट्यांच्या छावणीतील गोंधळ अधिकच वाढत गेला. तेव्हा शौल याजकाला म्हणाला, “थांब!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan