Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 9:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; गडद अंधकार असलेल्या देशात राहणाऱ्यांवर प्रकाश उदय पावला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 अंधकारात चालणार्‍या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्‍यांवर प्रकाश पडला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 जे अंधकारात चालत होते अशा लोकांनी मोठा प्रकाश पाहीला आहे; जे कोणी मृत्युच्छायेच्या प्रदेशात राहत होते अशावर प्रकाश पडला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 9:2
22 Iomraidhean Croise  

म्हणजे जिथून परत येणे होत नाही, जे अंधार आणि मृत्यूचे स्थान, अशा ठिकाणी जाण्यापूर्वी,


काही अंधारात आणि गडद अंधकारात बसले होते, लोखंडी साखळदंडांत यातना सहन करणारे बंदिवान होते,


त्यांना काळोखातून आणि गडद अंधकारातून बाहेर आणले, आणि त्यांचे साखळदंड तोडून टाकले.


मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात; तुमची आकडी व तुमची काठी मला धीर देतात.


मी शांतचित्ताने झोपी जाईन, कारण हे याहवेह तुम्हीच मला सुरक्षित ठेवता.


तुमच्यामध्ये कोण आहे जो याहवेहचे भय बाळगतो आणि त्यांच्या सेवकाच्या आज्ञा पाळतो? जो अंधारात चालतो, ज्याच्याकडे प्रकाश नाही, त्याने याहवेहच्या नावावर विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्या परमेश्वरावर विसंबून राहावे.


यापुढे दिवसा सूर्यप्रकाश व चंद्राचे तेज तुझ्यावर पडणार नाही, कारण तुझे याहवेहच तुझा अक्षय प्रकाश होतील व तुझे परमेश्वर तुझा गौरव होतील.


तरीसुद्धा, जे संकटात होते त्यांच्यासाठी यापुढे निस्तेज काळोखी नसेल. भूतकाळात त्यांनी जबुलून प्रांत आणि नफताली प्रांतांना नमविले होते, परंतु भविष्यामध्ये ते समुद्राच्या मार्गाकडून जाणाऱ्या यार्देनेच्या पलीकडील गालील राष्ट्रांचा सन्मान करतील—


ज्यांनी कृत्तिका नक्षत्रे व मृगशीर्ष नक्षत्रे निर्माण केले, जे मध्यरात्रीचे रूपांतर पहाटेत करतात, आणि जे दिवसाचे रूपांतर रात्रीत करतात, जे समुद्राच्या पाण्यास बोलवितात आणि ते जमिनीच्या पृष्ठभागावर ओततात— याहवेह, हे त्यांचे नाव आहे.


अंधारात राहणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला; मृत्युछायेच्या दरीत बसलेल्यांवर प्रकाश उदय पावला आहे.”


ते गैरयहूदीयांसाठी प्रकटीकरणाचा प्रकाश, आणि आपल्या इस्राएली लोकांचे गौरव आहे.”


तेव्हा येशूंनी त्यांना उत्तर दिले, “आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्याबरोबर राहील. तुम्हावर अंधकाराने मात करण्यापूर्वी प्रकाश आहे तोपर्यंत चालत राहा, कारण जो कोणी अंधारात चालतो त्याला आपण कुठे जातो हे कळत नाही.


मी या जगात प्रकाश म्हणून आलो आहे, यासाठी की जे मजवर विश्वास ठेवतात त्यांनी अंधारात राहू नये.


येशू पुन्हा लोकांशी बोलले आणि म्हणाले, “मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात चालणार नाही, परंतु त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”


कारण पूर्वी तुम्ही अंधकार होता, परंतु आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहात. प्रकाशाच्या लेकरांसारखे जगा.


परंतु तुम्ही निवडलेले लोक, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, परमेश्वराचे विशेष धन आहात, यासाठी की ज्यांनी तुम्हाला अंधारातून काढून त्यांच्या अद्भुत प्रकाशात आणले त्यांच्या स्तुतीची घोषणा करावी.


‘ते लूट शोधून वाटून तर घेत नाहीत ना: प्रत्येक पुरुषासाठी एक किंवा दोन स्त्रिया, सिसेरासाठी लूट म्हणून रंगीबेरंगी वस्त्रे, रंगीबेरंगी नक्षीदार वस्त्रे, माझ्या गळ्यात भरतकाम केलेली वस्त्रे— ही सर्व लूट म्हणून आहेत काय?’


Lean sinn:

Sanasan


Sanasan