Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 9:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 या लोकांना मार्गदर्शन करणारे त्यांची दिशाभूल करतात, आणि ज्यांना मार्गदर्शन मिळाले, ते पथभ्रष्ट झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ह्या लोकांचे नेते त्यांना बहकवणारे झाले आहेत; व त्यांचे अनुगामी ग्रासून टाकण्यात आले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 जे या लोकांस मार्गदर्शन करीतात ते त्यांना चूकीचा मार्ग दाखवतात, आणि जे त्यांच्या मागे जातात त्यांना गिळून टाकतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 9:16
15 Iomraidhean Croise  

याजक आणि लेवीय हे लोकांना आशीर्वाद देण्यासाठी उभे राहिले आणि परमेश्वराने त्यांचे ऐकले, कारण त्यांची प्रार्थना स्वर्गात, परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानापर्यंत पोहोचली.


बंदिवानांमध्‍ये लपून बसणे, किंवा मेलेल्यांमध्ये पडून राहाणे या वाचून काहीही उरणार नाही. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.


याहवेहनी त्यांच्यामध्ये भोंवळ येण्याचा आत्मा ओतला आहे; त्यामुळे इजिप्तच्या सर्व कामात ती लटपटते, जसा मद्यपी, त्याने केलेल्या ओकारी भोवती फिरतो.


तरुण माझ्या लोकांवर अत्याचार करतात, स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात. माझ्या लोकांनो, तुमचे मार्गदर्शक तुमची दिशाभूल करतात; ते तुम्हाला पथभ्रष्ट करतात.


म्हणूनच याहवेहचा क्रोध त्यांच्या लोकांविरुद्ध भडकला आहे; त्यांनी हात उगारला आहे आणि ते त्यांना मारून टाकतात. पर्वत डगमगतात, आणि मृतदेह रस्त्यांवर कचऱ्यासारखे पडलेले आहेत. हे सर्व करूनही, त्यांचा क्रोधाग्नी अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.


म्हणून त्यांच्या मुलांना दुष्काळामध्ये जाऊ द्या; त्यांना तलवारीच्या बलाच्या स्वाधीन करा. त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होऊ द्या; त्यांचे पुरुष मृत्यू पावोत, व त्यांचे तरुण लढाईत तलवारीने मारले जावोत.


“शोमरोनच्या संदेष्ट्यांमध्ये मी ही तिरस्करणीय गोष्ट बघितली: त्यांनी बआल दैवताच्या नावाने संदेश देऊन माझ्या इस्राएली लोकांना मार्गभ्रष्ट केले.


“तुमच्या मित्रांपासून सावध राहा; तुमच्या भाऊबंदावर भरवसा करू नका. कारण त्यांच्यातील प्रत्येकजण फसविणारा आहे, व प्रत्येक मित्र निंदा करणारा आहे.


याहवेह असे म्हणतात: “यहूदीयाच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी याहवेहचे नियमशास्त्र धिक्कारले आहे व त्यांचे विधी पाळले नाही. ज्या दैवतांचे अनुसरण त्यांच्या पूर्वजांनी केले होते त्या त्यांच्या खोट्या दैवतांनी त्यांची दिशाभूल केली होती,


याहवेह असे म्हणतात: “माझ्या लोकांना चुकीच्या मार्गाने नेणारे संदेष्टे, त्यांना काही खायला मिळाल्यास ते ‘शांती’ ची घोषणा करतात. परंतु जो त्यांना खाण्याचे देण्यास नकार देतो त्याच्याशी युद्ध करण्यास सुसज्ज राहतात.


त्यांच्याकडे लक्ष देऊ नका; ते आंधळे मार्गदर्शक आहेत. जर एक आंधळा मनुष्य दुसर्‍या आंधळ्याला वाट दाखवेल, तर ते दोघेही खाचेत पडतील.”


हे निर्विवाद सत्य आहे की मोठ्यांकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan