Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 8:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 युद्धाची रणगर्जना करा, हे देशांनो, तुम्ही मोडून जाल! दूर राहणाऱ्या लोकांनो ऐका, युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा! युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 अहो राष्ट्रांनो, दंगल करा, पण तुमचा चुराडा होईल; पृथ्वीवरील दूरच्या देशांनो, कान देऊन ऐका; तुम्ही आपली कंबर बांधा, पण तुमचा चुराडा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 अहो लोकांनो युध्द करा, पण तुमचा चुराडा होईल. दूरच्या सर्व देशांनो ऐका; युद्धासाठी सशस्त्र व्हा पण तुमचा चुराडा होईल; स्वतःला सुसज्ज करा पण तुमचा चुराडा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 8:9
24 Iomraidhean Croise  

इस्राएलच्या राजाने उत्तर दिले, “त्याला सांगा: ‘युद्धासाठी शस्त्रधारण करणार्‍याने शस्त्र उतरविणार्‍याप्रमाणे फुशारकी मारू नये.’ ”


याची खात्री असू दे: दुष्टाला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, परंतु जे नीतिमान आहेत त्यांची सुटका होईल.


म्हणून याहवेहचे वचन त्यांच्याकरिता असे होईल: हे करा, ते करा, यासाठी एक नियम, त्यासाठी एक नियम; थोडेसे इकडे, थोडेसे तिकडे— जेणेकरून ते मागे पडतील; ते जखमी होतील, सापळ्यात अडकतील व पकडले जातील.


त्या रात्री याहवेहच्या दूताने अश्शूर सैनिकांच्या छावणीत एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिक ठार केले. दुसर्‍या दिवशी सकाळी लोक उठून पाहतात—तो त्यांच्या सर्व बाजूला प्रेते पसरलेली होती.


जर कोणी तुमच्यावर हल्ला केला, तर ती माझी करणी नसेल; जे कोणी तुमच्यावर हल्ला करतील, ते तुम्हाला शरण जातील.


आता ज्याला तुम्ही घाबरता त्या बाबेलच्या राजाचे मुळीच भय बाळगू नका. त्याला भयभीत होऊ नका, याहवेह असे जाहीर करतात, कारण मी तुम्हासह असेन व तुम्हाला त्याच्या हातातून सोडवेन.


“तुमच्या ढाली सिद्ध करा, लहान व मोठ्या अशा दोन्ही, आणि लढाईसाठी कूच करा!


घोड्यांवर खोगीर चढवा, आणि अश्वारूढ व्हा! शिरस्त्राण घालून मोर्चा बांधा! भाल्यांना धार लावा, व चिलखते चढवा!


“तू माझ्या युद्धाचा सोटा आहेस. माझे युध्दशस्त्र— तुझ्याद्वारे मी राष्ट्रांना डळमळीत करेन, तुझ्याद्वारे मी राज्ये नष्ट करेन,


“ ‘तू व तुझ्याकडे एकत्र झालेला समूह सिद्ध व्हा; तयार राहा आणि त्यांचा नायक हो.


पुष्कळ दिवस गेल्यानंतर तुला बोलाविण्यात येईल. येत्या काळात जो देश युद्धातून परत आलेला आहे, ज्याचे लोक पुष्कळ राष्ट्रांतून इस्राएलच्या पर्वतांकडे एकत्र केले आहेत. जो पुष्कळ काळ ओसाड पडला होता. त्यांना राष्ट्रांतून बाहेर आणले गेले आणि जे आता सुरक्षिततेत राहतात, तू त्या देशावर आक्रमण करशील.


हे सर्व राजे इस्राएलाशी लढण्यासाठी एकत्र आले व मेरोम सरोवरापाशी त्यांनी आपला तळ दिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan