Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 8:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण त्या मुलाला ‘माझे वडील’ किंवा ‘माझी आई’ कसे म्हणायचे हे समजून येण्याआधीच दिमिष्कची संपत्ती आणि शोमरोनची लूट अश्शूरच्या राजाकडून नेली जाईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 कारण ह्या मुलाला आई, बाबा, म्हणता येण्यापूर्वीच अश्शूरच्या राजापुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट म्हणून घेऊन जातील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण लेकराला आई, बाबा, अशी हाक देता येण्या आधीच अश्शूरचा राजा पुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट घेऊन जाईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 8:4
16 Iomraidhean Croise  

इस्राएलचा राजा पेकहा याच्या कारकिर्दीत अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याने इस्राएलवर स्वारी केली आणि इय्योन, आबेल-बेथ-माकाह, यानोहा, केदेश, हासोर, गिलआद, गालील व नफतालीचा सर्व भाग त्याने जिंकला आणि लोकांना कैद करून अश्शूरास नेले.


अश्शूरच्या राजाने त्याची मागणी ऐकली. त्याने दिमिष्कावर हल्ला केला आणि त्याला ताब्यात घेतले. तेथील लोकांना धरून कीर येथे नेले आणि रसीनलाही ठार मारले.


अश्शूरचा राजा शल्मनेसरने होशेवर हल्ला करून, त्याला जहागीरदार केले आणि त्याला कर द्यावा लागला.


दिमिष्का विरुद्ध भविष्यवाणी: “पहा, दिमिष्क आता शहर असे राहणार नाही परंतु ते नाशवंत वस्तूंचा ढिगारा असे होईल.


तटबंदी केलेले शहर एफ्राईमपासून नाहीसे होईल, आणि दिमिष्कमधून शाही सामर्थ्य नाहीसे होईल; अराम नगरातील अवशिष्ट इस्राएली लोकांच्या वैभवासारखे असतील,” असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.


ते सुकत जाणारे फूल, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेले, त्याचे तेजस्वी सौंदर्य, कापणीच्या आधी पिकलेल्या अंजिरांसारखे होईल— लोक त्यांना पाहताक्षणीच त्यांना हातात घेतात, व त्यांना गिळंकृत करतात.


याहवेह पुन्हा माझ्याबरोबर असे बोलले:


याहवेह असे म्हणतात: “दिमिष्कच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण तिने गिलआदला मळणी करण्याच्या लोखंडी काट्यांनी मळले आहे,


दिमिष्कचे प्रवेशद्वार तोडून टाकेन; आणि आवेन खोर्‍यातील राजा आणि बेथ-एदेनचा राजदंड धरणाऱ्यांना मी नष्ट करेन. अरामाचे लोक कीर येथे गुलाम म्हणून जातील.” याहवेह असे म्हणतात.


मग मी निनवेह या महान शहराची काळजी का करू नये? ज्यामध्ये एक लाख वीस हजारांहून अधिक लोक राहतात, ज्यांना त्यांच्या उजव्या आणि डाव्या हातातील फरक देखील माहीत नाही—आणि या शहरात अनेक प्राणीही आहेत.”


जुळ्या मुलांचा जन्म होण्याआधी, किंवा चांगले वाईट करण्याआधी; परमेश्वराचा उद्देश निवडीसंबंधाने कायम राहावा.


जी बालके पारतंत्र्यात जातील असे तुम्ही म्हणता, ज्यांना त्यांचे बरेवाईटही कळत नाही, त्यांना मी तो देश बहाल करेन आणि ते त्याला आपल्या ताब्यात घेतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan