Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 7:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तरीही सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘तसे होणार नाही, तसे घडणार नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 प्रभू परमेश्वर म्हणतो : हे सफळ व्हायचे नाही, हे घडायचे नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 प्रभू परमेश्वर म्हणतो, असे काही होणार नाही; असे काही घडणार नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 7:7
14 Iomraidhean Croise  

परंतु याहवेहच्या योजना सर्वकाळ स्थिर राहतात; त्यांच्या हृदयातील हेतू प्रत्येक पिढीसाठी कायमस्वरूपी असतात.


खचित तुमचा मनुष्यावरचा क्रोध तुमच्या स्तुतीस कारणीभूत होईल, आणि तुमच्या रोषाने उर्वरितांना रोखण्यात आले.


मनुष्याचे कोणतेही सुज्ञान, बुद्धिमत्ता, कोणत्याही योजना याहवेहविरुद्ध यशस्वी होऊ शकत नाहीत.


मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द केला जाईल; अधोलोकाशी केलेला तुमचा करार टिकणार नाही. जेव्हा दुःखदायक अरिष्ट झाडून काढते, तेव्हा तुम्हाला त्याच्याकडून तुडविले जाईल.


कारण तू माझ्यावर संतापतो व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे, मी तुझ्या नाकात वेसण अडकवेन व तुझ्या तोंडात लगाम घालेन आणि मग तू आलास त्याच वाटेने तुझ्याच देशात तुला परत नेईन.


जेव्हा यहूदीयाचा राजा आहाज, जो योथामचा पुत्र, जो उज्जीयाहचा पुत्र होता, अरामचा राजा रसीन आणि इस्राएलचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकहने यरुशलेमवर हल्ला केला, परंतु त्यांच्यावर ते विजय मिळवू शकले नाहीत.


“चला, आपण यहूदीयावर हल्ला करू; चला आपण ते तोडून त्याचे तुकडे करू आणि आपसात वाटून ते घेऊ आणि ताबीलच्या पुत्राला त्यावर राजा बनवू.”


तुमची रणनीती तयार करा, परंतु ती उलथवून टाकली जाईल; तुमची योजना सुचवा, परंतु ती चालणार नाही, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहेत.


प्रभूने परवानगी दिल्याशिवाय बोलून तसे घडविण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे?


पृथ्वीवरील सर्व लोक कवडीमोलाचे आहेत. स्वर्गातील शक्तींमध्ये आणि पृथ्वीवरील रहिवाशांमध्ये त्यांना जे योग्य वाटते तेच ते करतात. त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही अथवा त्यांना बोलू शकत नाही: “तुम्ही हे काय केले?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan