मग आहाज राजाने उरीयाह याजकाला हे आदेश दिले: “या नव्या मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे अन्नार्पण, राजाची होमार्पण, अन्नार्पण आणि देशातील सर्व लोकांची होमार्पण, आणि त्यांची पेयार्पण ही अर्पण करीत जा. होमार्पणाचे सर्व रक्त आणि यज्ञाचे सर्व रक्त या वेदीवर शिंपडावे. कास्याची जुनी वेदी माझ्यासाठी शकुन पाहण्यासाठी असावी.”