Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 6:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि ते एकमेकांना म्हणत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वसमर्थ याहवेह आहेत; त्याच्या तेजाने सर्व पृथ्वी भरली आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.”1

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 प्रत्येकजण दुसऱ्याला हाक मारीत आणि म्हणत, “पवित्र, पवित्र, पवित्र, सेनाधीश परमेश्वर! त्याच्या गौरवाने सर्व पृथ्वी भरून गेली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 6:3
25 Iomraidhean Croise  

त्यांनी स्तुतिगान गाईले व पुढील गीत गाऊन याहवेहची उपकारस्तुती केली: “याहवेह चांगले आहेत. इस्राएलावरील त्यांची प्रीती व दया सर्वकाळ टिकणारी आहेत.” याहवेहच्या मंदिराचा पाया घातल्याबद्दल, त्यांनी मोठ्याने जयघोष करीत याहवेहची स्तुती केली.


हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत; तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.


त्यांच्या गौरवशाली नावाचा महिमा गा; ते किती अद्भुत आहेत, हे जगाला सांगा.


त्यांच्या गौरवशाली नावाचे सदासर्वकाळ स्तवन होवो; सर्व पृथ्वी त्यांच्या गौरवाने भरो. आमेन आणि आमेन.


लेकरे आणि तान्ह्या बालकांच्या स्तुतीद्वारे तुमचे शत्रू व विरोध्यांना शांत करण्यासाठी शत्रूविरुद्ध बळ स्थापित केले आहे.


तुमची गौरवशाली कृत्ये तुमच्या सेवकांना दिसो, तुमचे वैभव त्यांची मुलेबाळे बघोत.


आकाश मंडल त्यांची नीतिमत्ता जाहीर करते; संपूर्ण मानवजात त्यांचे गौरव पाहते.


राष्ट्रे तुमच्या थोर व भयावह नामाची स्तुती करोत— याहवेह पवित्र आहेत.


आपल्या परमेश्वराची थोरवी गा, आणि त्यांच्या पवित्र पर्वतावर उपासना करा, कारण आपले परमेश्वर याहवेह पवित्र आहेत.


सर्व दैवतांमध्ये हे याहवेह तुमच्यासारखे कोण आहे? पवित्रतेत ऐश्वर्यमान; वैभवात अद्वितीय, आश्चर्यकर्मे करणारे, असे तुमच्यासारखे कोण आहे?”


पृथ्वीच्या दिगंतापासून आपण हे गाणे ऐकतो: “नीतिमान परमेश्वराचा गौरव असो.” पण मी म्हणालो, “माझा नाश होत आहे, माझा नाश होत आहे! माझा धिक्कार असो! फसवणूक करणारा विश्वासघात करतो! फसवणूक करून तो विश्वासघात करतो!”


आणि याहवेहचे गौरव प्रगट होईल, आणि सर्व लोक ते एकत्र पाहतील. कारण याहवेहच्या मुखाने हे बोलले आहे.”


कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे— सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे— इस्राएलचे पवित्र परमेश्वर तुझे उद्धारकर्ता आहेत; त्यांना सर्व पृथ्वीचे परमेश्वर म्हणतात.


आणि मी इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव पूर्वेकडून येताना पाहिले. जोरदार पाण्याच्या गर्जनेप्रमाणे त्याचा आवाज होता आणि परमेश्वराच्या वैभवाने पृथ्वी प्रकाशमय झाली.


नंतर त्या मनुष्याने मला उत्तरेकडील द्वारातून मंदिरासमोर आणले. तेव्हा मंदिर याहवेहच्या वैभवाने भरत असताना मी पाहिले आणि मी तिथे उपडा पडलो.


कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहे तशीच पृथ्वी याहवेहच्या गौरवाच्या ज्ञानाने भरून जाईल.


तेव्हा याहवेह सर्व पृथ्वीचे राजा होतील. त्या दिवशी फक्त एकच याहवेह असतील व केवळ त्यांच्याच नामाची उपासना होईल.


परंतु खचितच मी जिवंत आहे आणि खचितच संपूर्ण पृथ्वी याहवेहच्या वैभवाने भरलेली आहे.


मी प्रार्थना करतो की तुमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित केले जावेत, आणि पवित्र जनांमध्ये असलेल्या गौरवशाली वतनाच्या संपत्तीच्या आशेसाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, हे तुम्ही ओळखून घ्यावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan