Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 57:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मोलखाला तू जैतुनाचे तेल वाहिले व तुझी सुगंधी अत्तरे वाढवून अर्पण केलीस. तू तुझ्या दूतांना दूरवर पाठविले; अगदी प्रत्यक्ष मृतलोकांच्या राज्यापर्यंत गेलीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तू तेलाने माखून राजाकडे गेलीस, पुष्कळ सुगंधी द्रव्ये तू वाढवलीस, आपले जासूद दूरदूर पाठवलेस, अधोलोकापर्यंत तुझ्या नीचतेचा पल्ला गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेल घेऊन तू राजा समोर गेलीस; आणि आपली सुगंधी द्रव्ये पुष्कळ केलीस. तुझे दूत तू अति दूर पाठवले, आणि तू अधोलोकात गेलीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 57:9
12 Iomraidhean Croise  

ऊद, जटामांसी व दालचिनी यांनी मी माझी शय्या सुवासिक केली आहे.


म्हणून या लोकांचे पतन केले जाईल आणि सर्वजण नमविले जातील— त्यांना क्षमा करू नका.


प्रत्येक वेश्येस भेट मिळते, परंतु तू आपल्या सर्व प्रियकरांना भेट देतेस, त्यांनी चहूकडून तुझ्या अश्लील वासना पुरविण्यासाठी यावे म्हणून त्यांना लालूच देतेस.


ती चित्रे पाहताच त्यांची वासना तिला झाली आणि खास्द्यांच्या देशात त्यांच्याकडे दूत पाठवले.


“जी माणसे दुरून आली होती त्यांना देखील त्यांनी बोलाविणे पाठवले आणि जेव्हा ते आले त्यांच्यासाठी तू स्नान केले, डोळ्यात काजळ घातले आणि आपले दागिने चढविले.


“राजा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागेल; सर्व दैवतांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे तो म्हणेल. तो देवाधिदेवाचीही निंदा करेल आणि त्याची महासंकटकाळाच्या शेवटपर्यंत भरभराट होईल. कारण जे ठरवून दिले आहे ते नक्कीच घडेल.


एफ्राईम वाऱ्यावर चरतो; तो दिवसभर पूर्वेकडील वाऱ्याचा पाठलाग करतो आणि खोटेपणा व हिंसाचार वाढवितो. तो अश्शूरसोबत करार करतो आणि इजिप्तला जैतून तेल पाठवितो.


“एफ्राईम एखाद्या खुळ्या पारव्यासारखा बुद्धिहीन आणि सहज फसणारा आहे— तो आता इजिप्तला हाक मारतो; आता तो अश्शूराकडे धाव घेतो.


जो कोणी व्यर्थ नम्रतेचा देखावा करण्यात संतोष पावतो आणि देवदूतांची उपासना करतो, त्यांनी तुम्हाला अपात्र ठरवू नये. असा मनुष्य पाहिलेल्या गोष्टींचे विस्तारपूर्वक वर्णन करतो आणि दैहिक विचारांनी, आत्मिक नसलेल्या हृदयाने उगीचच फुगून जातो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan