यशायाह 57:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 एला वृक्षाच्या झाडीत आणि प्रत्येक घनदाट वृक्षाच्या सावलीत तुम्ही कामांध होता; खोल दर्यात, खडकांच्या कड्याखाली नरबळी म्हणून आपल्या लेकरांचे बळी देता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 प्रत्येक हिरव्या झाडाखाली, एला झाडांमध्ये तुम्ही मदोन्मत्त होता, ओढ्यांतल्या खडकांच्या कपारीत मुलांना ठार मारता तेच ना तुम्ही? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तुम्ही प्रत्येक झाडा खाली, एला झाडांमध्ये मदोन्मत्त होता, तुम्ही जे सुकलेल्या नदीखोऱ्यांमध्ये, खडकांच्या कड्यांखाली मुले ठार मारता. Faic an caibideil |
जेव्हा तुम्ही तुमच्या भेटी सादर करता, म्हणजेच तुमच्या लेकरांचा अग्नीत यज्ञ करता; तुम्ही तुमच्या मूर्तींमुळे असेच स्वतःला अशुद्ध करीत राहता. अहो इस्राएल लोकहो, तुम्ही माझ्याकडे विचारपूस करावी असे मी होऊ द्यावे काय? सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, मी तुम्हाला माझ्याकडे विचारपूस करू देणार नाही.
त्यांच्या मूर्तीसमोर, त्यांच्या वेद्यांभोवती, प्रत्येक उंच टेकड्यांवर व सर्व डोंगरमाथ्यांवर, प्रत्येक गडद सावलीच्या झाडाखाली आणि दाट पाने असलेल्या प्रत्येक एला वृक्षाखाली; ज्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सर्व मूर्तींना सुवासिक धूप अर्पण केले, जेव्हा त्यांचे लोक तिथेच पडतील, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.