Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 53:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 अत्याचार करून, दोषी ठरविल्यावर ते त्याला जिवे मारण्यासाठी घेऊन गेले. तरी त्याच्या पिढीतून कोणी विरोध केला? कारण तो जिवंताच्या भूमीवरून काढून टाकण्यात आला; माझ्या लोकांच्या अपराधांसाठी त्याला शिक्षा देण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्याच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले; जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले, आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडन करण्यात आले; असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 बळजबरी करून आणि निवाडा करून त्यास दोषी ठरवून, पण त्यास जिवंतांच्या भूमीतून काढून नेले; कारण माझ्या लोकांच्या अपराधांमुळे त्याच्यावर दंड ठेवण्यात आला. त्या पिढीपासून कोणी त्याच्याबद्दल असा विचार केला काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 53:8
15 Iomraidhean Croise  

मी गावातील लोकांच्या कुत्सित चर्चेचा विषय झालो आहे आणि मी मद्यप्यांच्या गीतांचा विषय झालो आहे.


मृतांमध्ये मला असे टाकण्यात आले आहे, जसे वधलेल्यास कबरेत ठेवतात, आणि ज्यांचे तुम्हाला विस्मरण झाले आहे, ज्यांना तुमच्या आश्रयापासून दूर करण्यात आले आहे.


म्हणूनच महान लोकांसह मी त्याला वतन देईन, आणि अनेक सामर्थ्यशाली लोकांसह लूट वाटून घेईल. कारण त्याने आपले जीवन मरेपर्यंत ओतले, आणि अपराधी लोकांत त्याची गणना झाली. त्याने अनेकांचा पापाचा भार वाहिला, आणि पाप्यांसाठी मध्यस्थी केली.


परंतु तो आमच्या अपराघांमुळे भोसकला गेला, तो आमच्या पापामुळे चिरडला गेला; आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याच्यावर आली, आणि त्याच्या जखमांद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले.


कत्तलखान्याकडे चालविलेल्या अज्ञान कोकरासारखा मी भोळाभाबडा होतो; मलाच ठार मारण्याचा त्यांचा बेत होता याची मला जाणीवही नव्हती, ते म्हणाले, “झाडाचा त्याच्या फळांसहित नाश करू या; याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू या, म्हणजे याची नावनिशाणीही राहणार नाही.”


पाणी माझ्या डोक्याच्या वरपर्यंत आले, आणि मला वाटले की आता माझा नाश होणार.


बासष्ट ‘सप्तके’ हा काळ संपल्यावर अभिषिक्ताचा वध करण्यात येईल आणि त्याला काही उरणार नाही. मग अधिपतीचे लोक शहराचा आणि पवित्रस्थानाचा विध्वंस करतील. शेवट महापुराप्रमाणे येईल: शेवट होईपर्यंत युद्ध चालू राहील आणि सर्वकाही ओसाड व्हावे असे ठरले आहे.


अब्राहामाचा पुत्र दावीदाचा पुत्र, येशू ख्रिस्ताची ही वंशावळी:


तेव्हा यहूदी अधिकार्‍यांनी आग्रहपूर्वक म्हटले, “आमचे नियमशास्त्र आहे, त्यानुसार त्याने मरण पावलेच पाहिजे, कारण त्याने स्वतःला परमेश्वराचा पुत्र म्हटले आहे.”


त्याच्या लीन अवस्थेत तो न्यायापासून वंचित राहिला. त्याच्या वंशजांबद्दल कोण बोलू शकेल? कारण त्याचे जीवन पृथ्वीवरून काढून घेण्यात आले होते.”


ते आपले प्रभू येशू ख्रिस्त, जे पवित्रतेच्या आत्म्याद्वारे व मृतांच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने परमेश्वराचे पुत्र ठरविले गेले.


नीतिमान असताना अनीतिमान लोकांना, तुम्हाला परमेश्वराकडे न्यावे म्हणून ख्रिस्तानेसुद्धा पापांसाठी एकदाच दुःख सोसले, शारीरिक दृष्टीने त्यांचा मृत्यू झाला होता, परंतु आत्म्यामध्ये त्यांना जिवंत केले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan