यशायाह 53:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मनुष्यांनी त्याला तुच्छ लेखले आणि त्याला नाकारले, कारण क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असा तो पुरुष होता. जणू एखाद्याला पाहून लोकांनी आपली तोंडे लपवावी तसा तो तिरस्कृत व खालच्या दर्जात गणलेला होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 लोकांनी तुच्छ मानलेला आणि नाकारलेला; दुःखी आणि यातनेशी परिचित तो मनुष्य होता. ज्याच्यापासून लोक आपले तोंड लपवत, असा तो तुच्छ होता; आणि आम्ही त्यास किरकोळ मानले. Faic an caibideil |
ज्याला राष्ट्रांनी तुच्छ व घृणास्पद मानलेले आहे, जो शासनकर्त्यांचा सेवक आहे, त्याला: उद्धारकर्ता आणि इस्राएलचे पवित्र परमेश्वर, याहवेह असे म्हणतात— “जेव्हा राजे तुला बघतील तेव्हा ते उठून उभे राहतील, अधिपती तुला लवून मुजरा करतील, कारण याहवेहने, जे विश्वसनीय आहेत, जे इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत, त्यांनी तुला निवडले आहे.”