Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 51:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “माझ्या लोकांनो, माझे ऐका; माझ्या देशा, माझ्याकडे लक्ष दे: माझाकडूनच तुम्हाला उपदेश प्राप्त होईल. माझा न्याय राष्ट्रांसाठी प्रकाश बनेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 माझ्या लोकांनो, माझ्याकडे लक्ष द्या; माझ्या प्रजे, माझ्याकडे कान दे; कारण माझ्यापासून नियमशास्त्र निघेल व राष्ट्रांना प्रकाश प्राप्त व्हावा म्हणून मी आपल्या न्यायाची संस्थापना करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 “माझ्या लोकांनो, माझ्या कडे लक्ष द्या, माझ्या लोकांनो माझ्या कडे आपला कान लावा, कारण नियम माझ्यापासूनच निघेल, आणि मी माझे न्यायीपण राष्ट्रांना प्रकाश असे करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 51:4
27 Iomraidhean Croise  

म्हणजे तुम्ही निवडलेल्यांच्या समृद्धीत मलाही वाटा मिळेल, आणि तुमच्या राष्ट्रांच्या सर्व आनंदामध्ये मीही सहभागी होईन, आणि तुमच्या वारसांसह मी देखील तुमचे स्तुतिगान करेन.


इतर कोणत्याही राष्ट्राकरिता त्यांनी असे केले नाही; ते त्यांच्या आज्ञांबाबत अज्ञानी आहेत. याहवेहचे स्तवन करा.


ज्या राष्ट्रांचे परमेश्वर याहवेह आहेत, ज्या लोकांना त्यांनी स्वतःच्या वतनाकरिता निवडले ते धन्य.


“ऐका, माझ्या लोकांनो ऐका, मी बोलत आहे; इस्राएला, मी तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहे: मी परमेश्वर, तुझा परमेश्वर आहे.


अहो माझ्या लोकांनो, माझे विधिनियम ऐका; माझ्या मुखातून निघणार्‍या वचनाकडे कान द्या.


तरी तुम्हीच मला याजकीय राज्य; पवित्र राष्ट्र असे व्हाल.’ तू इस्राएली लोकांना सांगावयाच्या याच गोष्टी आहेत.”


जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट असाल, तर मला तुमचे मार्ग शिकवा, यासाठी की मी तुम्हाला जाणून तुमच्या दृष्टीत कृपा पावावी. हे स्मरणात असू द्या की हे राष्ट्र तुमचे लोक आहेत.”


कारण ही आज्ञा एक दीपक आहे, आणि हे शिक्षण म्हणजे प्रकाश आहे; आणि ही सुधारणा व बोधवचने जीवनाचे मार्ग आहेत.


सीयोन न्यायाने, आणि तिचे पश्चात्तापकर्त्ये नीतिमत्त्वाने सोडविले जातील.


अनेक लोक येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.


वेशी उघडा जेणेकरून नीतिमान राष्ट्र, जे राष्ट्र कायम विश्वास ठेवते, ते प्रवेश करेल.


होय, याहवेह, तुमच्या नियमांना अनुसरून चालत असताना, आम्ही तुमची वाट पाहतो; तुमचे नाव आणि किर्ती हीच आमच्या अंतःकरणाची इच्छा आहे.


कारण याहवेह आमचे न्यायाधीश आहेत, याहवेह आम्हाला कायदा प्रदान करणारे आहेत, याहवेह आमचे राजा आहेत; तेच आम्हाला वाचविणार आहेत.


त्यांच्या नीतिमत्तेप्रीत्यर्थ त्यांचे नियमशास्त्र महान व गौरवित केल्याने याहवेह प्रसन्न होतात.


“मी, याहवेहने, नीतिमत्वात तुम्हाला पाचारण केले आहे; मी तुमचा हात धरून तुम्हाला पाठिंबा देईन, मी तुमचे संगोपन करेन आणि तुम्हाला कराराच्या पूर्ततेचे लोक बनवेन आणि इतर राष्ट्रांना प्रकाश देणारे,


ते म्हणतात, “याकोबाच्या कुळांना पुनर्स्थापित करणे आणि माझ्या अवशिष्ट इस्राएलच्या लोकांना परत आणणे, हे करण्यासाठी माझा सेवक होणे, हे काम फारच लहानसे आहे, तर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत माझे तारण पोचवावे यासाठी मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश व्हावा असेही करेन.”


माझे ऐका आणि मजकडे या; लक्ष द्या, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन, माझ्या विश्वासू प्रीतीचे वचन मी दावीदाला दिलेले आहे.


ते म्हणाले, “ते निश्चितच माझे लोक आहेत, जी लेकरे माझ्याशी एकनिष्ठ राहतील;” म्हणून ते त्यांचे तारणकर्ता झाले.


अनेक राष्ट्रे येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.


ते गैरयहूदीयांसाठी प्रकटीकरणाचा प्रकाश, आणि आपल्या इस्राएली लोकांचे गौरव आहे.”


ज्यांना नियमशास्त्र नाही, त्यांना जिंकून घेता यावे म्हणून मीही त्यांच्यासाठी नियमशास्त्र नसल्यासारखा झालो. परमेश्वराच्या नियमांपासून मी बंधमुक्त नाही परंतु ख्रिस्ताच्या नियमांनी बांधला गेलो आहे.


त्यांच्या भाऊबंदांतून मी त्यांच्यासाठी तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करेन आणि मी माझी वचने त्याच्या मुखात घालेन. मी त्याला ज्याकाही आज्ञा देईन त्या सर्व तो त्यांना सांगेल.


परंतु तुम्ही निवडलेले लोक, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, परमेश्वराचे विशेष धन आहात, यासाठी की ज्यांनी तुम्हाला अंधारातून काढून त्यांच्या अद्भुत प्रकाशात आणले त्यांच्या स्तुतीची घोषणा करावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan