Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 माझ्या ऐकण्यात आले, सर्वसमर्थ याहवेहनी असे जाहीर केले आहे: “मोठमोठी घरे निश्चितच निर्जन होतील, उत्तम महालांमध्ये कोणी रहिवासी नसेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 सेनाधीश परमेश्वराने माझ्या कानात सांगितले : “बहुत मोठी व सुंदर घरे खरोखर ओसाड व लोकरहित होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 सेनाधीश परमेश्वर माझ्याशी बोलला, “तेथे खूप घरे रिकामी होतील, मोठी व सुंदर घरे राहणाऱ्यांशिवाय ओसाड पडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:9
14 Iomraidhean Croise  

भूमीने शब्बाथाच्या विश्रांतीचा आनंद घेतला; यिर्मयाहने सांगितलेल्या याहवेहच्या वचनाच्या पूर्णतेची सत्तर वर्षे होईपर्यंत त्या भूमीने तिच्या उजाडपणाच्या सर्व वेळेत विसावा घेतला.


पडीक नगरांमध्ये तो वास्तव्य करेल, कोणी राहत नाही अशा ठिकाणी, तुकडे पडलेल्या घरामध्ये त्याचा डेरा असेल.


गिळून टाकावे असे आता काही उरले नाही; त्याची समृद्धी दीर्घकाल टिकणार नाही.


लोभी माणसे त्यांच्या परिवारांवर विनाश आणतात, परंतु जो लाच घेणे घृणित मानतो, तो जगेल.


सर्वसमर्थ याहवेहनी माझ्या ऐकण्यात हे प्रकट केले आहे: “तुझ्या मरणाच्या दिवसापर्यंत या पापाचे प्रायश्चित्त केले जाणार नाही,” असे प्रभू सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.


तटबंदीचे शहर उजाड झाले आहे, टाकून दिलेले आवास, टाकून दिलेल्या अरण्यासारखी आहे; तिथे वासरे चरतात, तिथे ती झोपतात, ते त्याच्या फांद्या खाऊन निष्पर्ण करतात.


मी ती जमीन उजाड करेन, तिथे छाटणी किंवा नांगरणी करणार नाही, आणि तिथे कुसळे व काटेरी झुडपे वाढतील. मी ढगांना आज्ञा देईन की, त्यांच्यावर पाऊस पाडू नका.”


सार्वभौम याहवेह आपल्या सेवक संदेष्ट्यांना त्याच्या योजना प्रकट केल्याशिवाय निश्चितच काहीही करणार नाही.


तुम्ही गरिबांच्या पेंढ्यावरही कर लावता आणि त्यांच्या धान्यावरही कर लावता. म्हणून जरी स्वतःसाठी चिरेबंदी भवन बांधले असतील तरी त्यामध्ये कधीही राहणार नाही, किंवा तुम्ही लावत असलेल्या भरघोस पीक देणार्‍या रमणीय जरी तुम्ही कसदार द्राक्षमळा लावला तरी त्यातील द्राक्षारस कधीच पिऊ शकणार नाही.


कारण याहवेहने अशी आज्ञा दिली आहे, आणि ते मोठ्या घरांचे तुकडे तुकडे आणि लहान घरांना चक्काचूर करतील.


राजाला खूपच राग आला. त्याने आपले सैन्य पाठवून दासांना ठार करणार्‍यांचा नाश केला. त्यांची शहरे जाळून टाकली.


आणि पाहा! आताच तुझे घर ओसाड पडले आहे.


पाहा! ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली, त्यांचे वेतन तुम्ही दिले नाही ते तुमच्याविरुद्ध आक्रोश करीत आहेत. कापणी करणार्‍यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानावर गेला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan