Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 परंतु सर्वसमर्थ याहवेह त्यांच्या न्यायाद्वारे उच्च केले जातील, आणि पवित्र परमेश्वर त्यांच्या नीतिमान कृत्यांद्वारे पवित्र ठरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 सेनाधीश परमेश्वर तर न्यायाने उन्नत असा प्रकट होईल; पवित्र देव नीतिमत्तेने पवित्र असा प्रकट होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 सेनाधीश परमेश्वर आपल्या न्यायात उंचावला जातो, आणि देव जो पवित्र आहे आपल्या न्यायीपणा द्वारे आपणाला पवित्र प्रकट करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:16
34 Iomraidhean Croise  

याहवेह, तुमचे सामर्थ्य व महिमा महान आहे; गौरव, वैभव व ऐश्वर्य ही सदासर्वकाळ तुमचीच असो, पृथ्वीवरील व स्वर्गातील सर्वकाही तुमचेच आहे! याहवेह, हे सर्व तुमचेच राज्य आहे; तुमचे प्रभुत्व सर्वांवर आहे.


याहवेह, तुम्ही आपल्या शक्तीने उंचविले जावो; आम्ही तुमच्या सामर्थ्याचे गुणगान व स्तुतिगान करू.


ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा; राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल. पृथ्वीवर माझी महिमा होईल.”


याहवेहची नीतिपूर्ण कृत्ये हीच त्यांची ओळख आहे; दुष्ट स्वतःच्याच हस्तकर्माच्या सापळ्यात अडकले आहेत. सेला


त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “याहवेहची स्तुती करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी जे काही केले आहे ते राष्ट्रांमध्ये माहीत होऊ द्या, आणि असे घोषित करा की, त्यांचे नाव गौरवान्वित आहे.


उन्मताची नजर नमविली जाईल, आणि मनुष्याचा गर्व उतरविला जाईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.


मनुष्याचा सर्व अहंकार नमविला जाईल आणि मनुष्याचा गर्व खाली करण्यात येईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.


म्हणून या लोकांचे पतन केले जाईल आणि सर्वजण नमविले जातील— त्यांना क्षमा करू नका.


मी न्यायाला मापनदोरी आणि नीतिमत्वाला ओळंबा असे करेन. गारांनी तुमचा खोटेपणा, तुमचे आश्रयस्थान झाडून काढला जाईल, आणि पाणी तुमच्या लपण्याच्या जागेवर भरून वाहील.


जेव्हा ते त्यांच्यामध्ये त्यांची संतती, माझी हस्तकृती बघतील, तेव्हा ते माझे नाव पवित्र ठेवतील; ते याकोबच्या पवित्र परमेश्वराची पवित्रता स्वीकारतील आणि इस्राएलच्या परमेश्वराचा आदर करतील.


तरीसुद्धा याहवेह तुमच्यावर कृपा करण्यास आतुरलेले असतात; त्यामुळे तुमच्यावर दया दाखविण्यास ते उभारतील. कारण याहवेह हे न्यायी परमेश्वर आहेत. धन्य आहेत ते सर्व जे त्यांची वाट पाहतात!


याहवेह म्हणतात, “मी आता उठेन, मी आता उच्च केल्या जाईन; आता मला उंच केले जाईल.


याहवेहना उच्च केले आहे, कारण ते उच्चस्थानी राहतात; सीयोनला ते त्यांच्या न्यायाने आणि धार्मिकतेने भरून टाकतील.


जे अनंतकाळ अस्तित्वात आहेत, ज्यांचे नाम पवित्र आहे जे सर्वोच्च व परमथोर आहेत, ते म्हणतात— “मी परमोच्च व पवित्रस्थानी राहतो, परंतु जे पश्चात्तापी व आत्म्याने लीन आहेत, अशांसोबतही राहतो, मी नम्र जणांच्या आत्म्यांना ताजेतवाने करतो व पश्चात्तापी अंतःकरणाच्या लोकांना नवा धीर देतो.


आणि ते एकमेकांना म्हणत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वसमर्थ याहवेह आहेत; त्याच्या तेजाने सर्व पृथ्वी भरली आहे!”


“कारण मी याहवेह, मी न्याय प्रिय आहे; चोरी आणि अन्यायाचा मला तिटकारा आहे. माझ्या विश्वासूपणाने मी माझ्या लोकांना मोबदला देईन आणि त्यांच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन.


याहवेह जे सर्वसमर्थ आहेत, त्यांना तुम्ही पवित्र मानावे, तेच आहेत ज्यांचे तुम्ही भय धरावे, तेच आहेत ज्यांना तुम्ही घाबरावे.


जेव्हा मी तुम्हाला राष्ट्रांतून बाहेर आणेन आणि ज्या देशांमध्ये तुमची पांगापांग झाली तिथून मी तुम्हाला एकत्र करेन, तेव्हा सुवासिक धुपाप्रमाणे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुमच्याद्वारे राष्ट्रांदेखत पवित्र मानला जाईन.


आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘हे सीदोन नगरी, मी तुझ्याविरुद्ध आहे, आणि तुझ्यामध्ये मी माझे गौरव प्रकट करेन. जेव्हा मी तुला शिक्षेने पिडेन, आणि तुझ्यात मी पवित्र मानला जाईन तेव्हा तू जाणशील की मीच याहवेह आहे.


“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या राष्ट्रांमध्ये इस्राएली लोक पांगले आहेत तिथून मी त्यांना जेव्हा एकवट करेन, तेव्हा त्यांच्याद्वारे राष्ट्रांच्या देखत मी पवित्र मानला जाईन. तेव्हा जो देश मी माझा सेवक याकोबाला देऊ केला होता, ते त्यांच्या त्या स्वदेशात राहतील.


मी माझ्या महान नावाचे पावित्र्य दाखवेन, जे राष्ट्रांमध्ये अपवित्र केले गेले, ते नाव त्यांच्यामध्ये तुम्ही अपवित्र केले आहे. जेव्हा तुमच्याद्वारे त्यांच्या दृष्टीत माझे नाव पवित्र मानले जाईल, तेव्हा राष्ट्रे जाणतील की मीच याहवेह आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.


मेघांनी देशाला झाकून टाकावे, तसे तू माझ्या इस्राएली लोकांवर हल्ला करशील. येणार्‍या दिवसांत, हे गोग, मी तुला माझ्या देशाच्या विरुद्ध आणेन, म्हणजे तुझ्याद्वारे राष्ट्रांच्या दृष्टीत जेव्हा मी पवित्र मानला जाईल तेव्हा ते मला जाणतील.


अशाप्रकारे मी माझी महानता व पवित्रता दाखवेन, आणि अनेक राष्ट्रांदेखत मी स्वतःस प्रकट करेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’


आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाधिराजाची स्तुती, गौरव व सन्मान करतो, कारण ते जे काही करतात ते योग्य करतात आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. आणि जे गर्वाने चालतात त्यांना ते नम्र करण्यास समर्थ आहेत.


तेव्हा मोशे अहरोनास म्हणाला, “याहवेहने जे सांगितले ते असे: “ ‘जे माझ्याजवळ येतात त्यांना मी दाखवेन की मी पवित्र आहे; सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल.’ ” यावर अहरोन शांत राहिला.


हे मरीबाहचे पाणी होते, जिथे इस्राएली लोक याहवेहशी भांडले आणि जिथे याहवेह त्यांच्यामध्ये पवित्र असे सिद्ध केले गेले.


तुमच्या हट्टीपणामुळे आणि पश्चात्ताप विरोधी अंतःकरणामुळे, तुम्ही आपल्यासाठी परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस व नीतीचा न्याय प्रकट होईल तोपर्यंत क्रोध साठवून ठेवीत आहात.


कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे, “तुम्ही पवित्र असावे, कारण मी पवित्र आहे.”


कारण परमेश्वराची अशी इच्छा आहे की चांगली कार्ये करून तुम्ही मूर्ख लोकांची अज्ञानी बोलणी बंद करावीत.


ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात आदरणीय माना. तुमच्यामध्ये जी आशा आहे व ती का आहे, याविषयी विचारपूस करणार्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा आणि ते सौम्यतेने व आदरपूर्वक करा.


“फिलदेल्फिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे पवित्र व सत्य आहे, ज्यांच्याजवळ दावीदाची किल्ली आहे, ते जे उघडतात, ते कोणालाही बंद करता येत नाही आणि ते जे बंद करतात, ते कोणाला उघडता येत नाही, ते असे म्हणतात.


त्या चारही सजीव प्राण्यांना प्रत्येकाला सहा पंख होते. त्यांच्या पंखांभोवती आतून बाहेरून सर्वत्र डोळे होते. ते अहोरात्र अखंडपणे बोलत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र, ते सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आहेत! जे होते, जे आहेत आणि जे येणार आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan