Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जे सकाळी लवकर उठतात व मद्यप्राशनाकडे धाव घेतात, रात्री उशीरा द्राक्षमद्याच्या नशेमध्ये धुंद होईपर्यंत जागे राहतात त्यांचा धिक्कार असो!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 जे पहाटेस उठून मद्याच्या पाठीस लागतात, जे अपरात्रीपर्यंत द्राक्षारस पिऊन धुंद होतात त्यांना धिक्कार असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 सकाळी उठून मद्याच्या शोधास लागणाऱ्यांनो तुम्हास हाय हाय! जे तुम्ही मद्यापानाने धुंद होऊन रात्री उशिरापर्यंत जागत राहता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:11
21 Iomraidhean Croise  

मी ऐंशी वर्षाचा आहे. कोणत्या गोष्टी मला आनंद देतील आणि कोणत्या नाही यातील फरक मला सांगता येईल काय? आपला सेवक जे काही खातो किंवा पितो याची चव तरी त्याला कळते काय? गाणारे पुरुष किंवा स्त्रियांचा आवाज मला अजूनही ऐकायला येतो काय? माझ्या स्वामीला त्यांचा सेवक एक ओझे म्हणून का असावा?


मद्य चेष्टा करते आणि मदिरा मोठमोठ्याने भांडणे काढते; तिच्यामुळे जे पथभ्रष्ट होतात ते शहाणे नाहीत.


शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते आणि ते विष फुरसे सर्पाप्रमाणे विषारी असते.


परंतु पाहा, तिथे आनंद आणि चंगळ आहे, गुरांची कत्तल आणि मेंढरांची हत्या, मांस खाणे आणि द्राक्षारस पिणे! तुम्ही म्हणता, “चला, आपण खाऊ आणि पिऊ, कारण उद्या आपण मरणार आहोत!”


गाणी म्हणत मद्यपान करणे बंद पडले आहे! मद्याचा घोट मद्यपीला कडू लागतो!


त्या मुकुटाला धिक्कार असो, जो एफ्राईमच्या दारुड्यांचा अभिमान आहे, त्या फिके पडणार्‍या फुलाला, त्याच्या तेजस्वी सौंदर्याला, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेल्या— त्या नगराला, जो मद्याने क्षीण झालेल्यांचा अभिमान आहे!


तो मुकुट, एफ्राईमच्या मद्यपींचा अभिमान, पायाखाली तुडविले जाईल.


धिक्कार असो, जे मद्य पिण्यामध्ये वीर आहेत आणि पेय मिसळण्यात जे विजयीवीर आहेत,


प्रत्येकजण म्हणतो, “या, मला मद्य आणू द्या! चला, मद्य पिऊन आपण धुंद होऊ या! आणि उद्याचा दिवसही आजसारखाच असेल, किंबहुना याहून जास्त चैनीचा असेल.”


“धिक्कार असो तुला, जो शेजाऱ्यास मद्य पाजतो, ते मद्यधुंद होईपर्यंत थेट पखालीतून ओतून पाजतो, म्हणजे तो त्यांची विवस्त्र शरीरे पाहू शकेल!


खरोखर, मद्य त्यांचा घात करते; तो उन्मत्त आहे व त्याला कधीही चैन पडत नाही. कारण तो कबरेसारखा लोभी आहे आणि मृत्यूप्रमाणे तो कधीही समाधानी होत नाही, तो अनेक राष्ट्रे गोळा करीत आहे, आणि सर्व लोकांना बंदिवान करीत आहे.


“सावध राहा! नाही तर तुमची अंतःकरणे दारुबाजी, मद्यपान आणि जीवनातील चिंता यामुळे निराश होतील आणि तो दिवस तुम्हावर अकस्मात एखाद्या पाशासारखा येईल.


दिवस आहे तोपर्यंत आपली वागणूक सभ्य असू द्या. दंगलीत, मद्याच्या धुंदीत, लैंगिक अनैतिकतेत, कामासक्तीत, कलहात व मत्सरात आपला वेळ व्यर्थ दवडू नका.


चोर, लोभी, मद्यपी, चहाडखोर आणि दरोडेखोर यांनाही परमेश्वराच्या राज्यात वाटा मिळणार नाही.


हेवा, दारुबाजी, गोंधळ आणि अशा प्रकारच्या गोष्टी ज्याबद्दल मी तुम्हाला पूर्वी सावध केले होते की जे कोणी असे जीवन जगतात त्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही.


जेव्हा अबीगईल नाबालाकडे गेली तेव्हा तो घरात होता, त्याने एका राजासारखी मेजवानी आयोजित केली होती. आणि मद्यपान करून तो फार नशेत होता, म्हणून सकाळ होईपर्यंत तिने त्याला काहीही सांगितले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan