Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 दहा एकर द्राक्षमळ्यातून फक्त एक बथ द्राक्षारस निघेल; एक होमेर बियाणे फक्त एक एफा धान्याचे पीक देईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 दहा बिघे द्राक्षमळा दहा शेर रस देईल; एक मण बी एक पायली धान्य देईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 दहा एकर द्राक्षमळा एक बाथ रस देईल, आणि एक होमर बी केवळ एक एफा उपज देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:10
13 Iomraidhean Croise  

या सर्व कळ्या व फांद्या असून दीपस्तंभाला घडीव शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून घडविल्या होत्या.


आणि माझ्या लोकांच्या भूमीसाठीही कारण शेतात सर्वत्र काटेकुसळे व झुडपे वाढतील— होय, आनंदोत्सव करणाऱ्या तुमच्या घरांसाठी, व चैनबाजी करणार्‍या या शहरांसाठी विलाप करा.


त्या दिवशी, ज्या प्रत्येक ठिकाणी एक हजार द्राक्षवेली होत्या ज्याची किंमत एक हजार चांदीचे शेकेल होते त्या ठिकाणी तिथे फक्त काटेरी झुडपे आणि कुसळे असतील.


मोआबभूमीच्या मळ्यामधून व शेतातून आनंद व हर्ष लयास गेले आहेत. द्राक्षकुंडातून द्राक्षारसाचा प्रवाह मी बंद केला आहे; हर्षनाद करून द्राक्षे तुडविणारा कोणी नाही. ओरडणे आहे, होय पण ते आनंदाचे नाही.


जमिनीच्या ढेकळांखाली बीज कुजून जात आहे. कोठारे उद्ध्वस्त झाली आहेत आणि गोदामे मोडली आहेत, कारण धान्य करपून गेले आहे.


मी तुमच्या भाकरीचा पुरवठा बंद करेन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर भाकर भाजू शकतील आणि त्या भाकरीचे वजन करून देतील. तुम्ही खाल परंतु तृप्त होणार नाहीत.


“ ‘जर कोणी त्यांच्या वतनाच्या शेताचा काही भाग याहवेहला समर्पित करीत असतील तर त्या शेतामध्ये किती बी पेरले जाऊ शकेल त्याप्रमाणे त्या शेताची किंमत ठरविली जाईल, एक होमेर जव पेरता येईल तेवढ्या भागाचे मूल्य चांदीचे पन्नास शेकेल होतील.


तुम्ही पुष्कळ पेरणी केली, पण कापणी मात्र फारच थोडीच केली. तुम्ही जेवता, पण ते कधीही पुरेसे नसते. तुम्ही पीता, पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही वस्त्र घालता, पण तुम्हाला ऊब मिळत नाही. तुम्ही वेतन मिळविता, पण तुम्ही ते पुष्कळ भोके असलेल्या खिशांमध्ये ठेवता.”


जेव्हा कोणी वीस मापे धान्याच्या राशीची अपेक्षा केल्यास, तिथे फक्त दहा मापेच धान्य मिळत असे. जर कोणी द्राक्षकुंडातून पन्नास मापे द्राक्षारस काढला, तर त्याला वीसच मापे मिळत असे.


तुम्ही पुष्कळ बी पेराल, पण थोडक्याच पिकांची कापणी कराल, कारण टोळ ते खाऊन टाकतील.


तुम्ही द्राक्षमळे लावून त्यांची निगा राखाल; पण तुम्हाला द्राक्षे खावयाला मिळणार नाहीत किंवा द्राक्षारस प्यावयास मिळणार नाही. कारण कीड त्यांना खाऊन टाकेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan