Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 माझी ज्यांच्यावर प्रीती आहे त्यांच्या द्राक्षमळ्याबद्दल मी गीत गाईन: सुपीक डोंगराळ भागावर माझ्या प्रियाचा एक द्राक्षमळा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मी आपल्या वल्लभाप्रीत्यर्थ गाणे गाईन; आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक शृंगावर होता;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मला माझ्या प्रियासाठी गाणे गाऊ द्या, माझ्या प्रियाच्या द्राक्षमळ्याविषयीचे हे गीत आहे. माझ्या प्रियाचा द्राक्षमळा अतिशय सुपीक डोंगरावर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:1
23 Iomraidhean Croise  

हे याहवेह, तुमची प्रीती आणि न्याय याविषयी मी गीत गाईन; मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.


माझे हृदय एका चांगल्या गोष्टीने ओसंडून जात आहे! राजाकरिता लिहिलेली कविता मी म्हणून दाखवितो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी बनली आहे.


आम्हाला वाचवा आणि तुमच्या उजव्या हाताने मदत करा म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर प्रीती करता त्यांचे तारण होईल.


तुम्ही एक द्राक्षवेल इजिप्त देशातून आणली; इतर राष्ट्रांना तिथून हाकलून तिला रुजविले.


माझा प्रियतम माझा, आणि मी त्याची आहे; कमळांमध्ये तो आपला कळप चारीत आहे.


त्याचे मुख परममधुर आहे; तो सर्वस्वी सुंदर आहे. यरुशलेमच्या कन्यांनो, हाच माझा प्रियकर, हाच माझा मित्र आहे.


मी झोपले होते परंतु माझे हृदय जागेच होते. ऐका! माझा प्रियकर दरवाजा ठोकीत आहे: “माझ्यासाठी उघड, माझ्या भगिनी, माझ्या प्रिये, माझी कबुतरी, माझ्या सर्वांग सुंदरी. माझे डोके दवबिंदूने चिंब भिजले आहे, माझे केस रात्रीमुळे ओलसर झाले आहे.”


मी माझ्या प्रियकराची आहे, आणि माझा प्रियकर माझाच आहे; कमळिनीमध्ये तो फुले शोधित आहे.


अनेक मेंढपाळ माझ्या द्राक्षमळ्यांची नासाडी करतील मळा पायाखाली तुडवतील; ते माझा रमणीय मळा ओसाड करतील.


मी तुम्हाला एका उत्तम द्राक्षवेलीप्रमाणे लावले होते उत्कृष्ट व विश्वसनीय असे खोड दिले होते. मग तुम्ही माझ्याविरुद्ध का झालात भ्रष्ट व रानटी लता का झालात?


“मानवपुत्रा, द्राक्षवेलीचे लाकूड व वनातील इतर झाडांच्या फांद्यांमध्ये काय फरक आहे?


“ ‘तुमची आई तुमच्या द्राक्षमळ्यात पाण्याजवळ लावलेल्या द्राक्षवेलीप्रमाणे होती; विपुल पाण्यामुळे ती फलदायी व फांद्यांनी भरलेली होती.


इस्राएल एक पसरणारा द्राक्षवेल होता. त्याने स्वतःसाठी फळे आणली. जसे त्याचे फळ वाढले, तसे त्याने आणखी वेद्या बांधल्या; जसा त्याचा देश समृद्ध झाला, तसे त्याने त्याच्या पवित्र दगडांना सुशोभित केले.


“दुसरा एक दाखला ऐका: एका जमीनदाराने एक द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली व त्यात द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन दुसर्‍या ठिकाणी राहवयास गेला.


मग येशू त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागले: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली, द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन तो दुसर्‍या ठिकाणी राहवयास गेला.


नंतर लोकांकडे वळून येशूंनी त्यांना हा दाखला सांगितला, “एका मनुष्याने एक द्राक्षमळा लावला. तो मळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन तो बर्‍याच दिवसासाठी दूर निघून गेला.


“मी खरी द्राक्षवेल आहे आणि माझे पिता माळी आहेत.


जेव्हा तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल, याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला उत्तम देश दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद करा.


कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला उत्तम अशा देशात नेणार आहेत—त्यात नद्या, झरे व ओहोळ हे डोंगरात उगम पावून खोर्‍यांमधून वाहत आहेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan