Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 49:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्यांनी माझे मुख तलवारीसारखे धारदार केले आहेत, त्यांनी मला आपल्या हाताच्या छायेत लपवून ठेवले आहे; त्यांनी मला बाणाप्रमाणे तीक्ष्ण केले आहे त्यांनी मला त्यांच्या भात्यात झाकून ठेवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे केले; त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले; त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारी सारखे केले आहे, त्याने मला त्याच्या हाताच्या सावलीत लपवले आहे. त्याने मला उजळता बाण केले आहे आणि आपल्या भात्यात मला लपवून ठेवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 49:2
20 Iomraidhean Croise  

जो परमोच्चाच्या आश्रयाखाली राहतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.


माझे गौरव जवळून जात असता, मी तुला खडकाच्या कपारीत ठेवेन आणि मी पार होईपर्यंत मी तुला माझ्या हाताने झाकीन.


परंतु ते नीतिमत्त्वाने गरजवंत लोकांचा न्याय करतील, न्यायाने ते पृथ्वीवरील गरिबांसाठी निर्णय देतील. ते त्यांच्या मुखाच्या काठीने पृथ्वीवर हल्ला करतील; ते त्यांच्या ओठांच्या श्वासाने दुष्टांचा वध करतील.


“पाहा, हा माझा सेवक! याला माझे पाठबळ आहे! माझा निवडलेला, ज्याच्याविषयी मी संतुष्ट आहे; माझा आत्मा मी त्याच्या ठायी ठेवेन. राष्ट्रांना तो न्याय आणेल.


तुमच्यामध्ये कोण आहे जो याहवेहचे भय बाळगतो आणि त्यांच्या सेवकाच्या आज्ञा पाळतो? जो अंधारात चालतो, ज्याच्याकडे प्रकाश नाही, त्याने याहवेहच्या नावावर विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्या परमेश्वरावर विसंबून राहावे.


सार्वभौम याहवेहने माझ्या मुखात उपदेशात्मक जीभ दिली आहे, त्यावर थकलेल्या लोकांना पडू न देणारी वचने आहेत, ते मला रोज सकाळी जागे करतात, शिक्षण प्राप्त करणाऱ्यासाठी उघडावे, तसे ते माझे कान उघडतात.


मी माझी वचने तुमच्या मुखात घातली आहेत आणि तुम्हाला माझ्या हाताच्या सावलीत झाकून ठेवले आहे— मीच आहे, ज्याने आकाशाला स्थिर असे ठेवले, आणि सर्व पृथ्वीसाठी पाया घातला, आणि जो सीयोनला म्हणतो, ‘तुम्ही माझे आहात.’ ”


आज मी तुला तटबंदीचे नगर केले आहे, या संपूर्ण राष्ट्राविरुद्ध उभे राहण्यासाठी लोहस्तंभासारखे व भक्कम कास्य दरवाजांसारखे केले आहे—यहूदीयाचे राजे, त्यांचे अधिकारी, याजक आणि लोक या सर्वांविरुद्धच.


म्हणून माझ्या संदेष्ट्याद्वारे मी तुमचे तुकडे केले आहे, माझ्या मुखाच्या शब्दांनी तुम्हाला ठार केले— तेव्हा माझ्या न्याय सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे पुढे वाढत जातो.


तुमच्या झेप घेणाऱ्या बाणांच्या तेजाने विजेप्रमाणे चकाकणार्‍या तुमच्या भाल्याच्या प्रकाशाने सूर्य व चंद्र आकाशात स्तब्ध उभे राहिले.


तेव्हा येशूंनी पुन्हा एकदा मोठी आरोळी मारून म्हटले, “हे पित्या, मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो.” हे शब्द बोलल्यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला.


तारणाचे शिरस्त्राण, आणि आत्म्याची तरवार म्हणजे परमेश्वराचे वचन हे देखील घ्या.


कारण परमेश्वराचे वचन जिवंत व सक्रिय आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारीहून अधिक तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यांना खोलवर भेदून जाणारे व अंतःकरणातील विचार आणि वृत्ती यांचा न्याय करणारे आहे.


त्यांनी त्यांच्या उजव्या हातात सात तारे धरले होते आणि त्यांच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्यांचा चेहरा मध्यान्ह्याच्या सूर्यप्रकाशा इतका तेजस्वी होता.


“त्यांनी राष्ट्रांवर वार करावा म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण तलवार निघाली.” ते त्यावर लोह-राजदंडाने अधिकार गाजवील आणि सर्वसमर्थ परमेश्वराच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड ते तुडवतील.


“पर्गमम येथील मंडळीच्या देवदूताला लिही: ज्यांच्याजवळ तीक्ष्ण आणि दुधारी तलवार आहे, ते असे म्हणतात:


यास्तव पश्चात्ताप कर! नाही तर, मी तुमच्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणार्‍या तलवारीने त्यांच्याविरुद्ध लढेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan